Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

brahman भटाला कन्यादान, मेंढरा समान – ज्ञानेश महाराव

1 Mins read

brahman भटाला कन्यादान, मेंढरा समान

ज्ञानेश महाराव

      ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे ’स्टार वक्ते’ आणि विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी ह्यांचे ‘भार्या समर्पयामि’ हे नक्कलयुक्त विधान वादग्रस्त ठरले.

पुण्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या कार्यालयावर brahman ‘ब्राह्मण महासंघा’च्या पुरोहितांनी आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेला. तसेच, अमोल मिटकरींच्या वक्तव्याबद्दल पंढरपूरच्या brahman ब्राह्मण कार्यकर्त्यांनी पक्षनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना अडवून जाब विचारला.

मिटकरी इस्लामपुरात ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या मेळाव्यात बोलले. तेव्हा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे मंचावर होते. ते दोघेही मिटकरी यांच्या नकलेवर हसले, म्हणून ‘मीडिया’ने त्यांना धारेवर धरले. त्यासरशी दोघांनी ‘मिटकरी जे बोलले, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे,’ असे सांगून मोकळे झाले.

या सार्‍या झटकाझटकीतून बड्या लोकांवरही brahman भटोबाची भीती किती ठाण मांडून आहे, ते स्पष्ट होतं. आमदार मिटकरी जे बोलले, ते अस्थानी असू शकते. पण ते खोटे नाही.

भारतात हिंदू बहुसंख्याक आहेत आणि यातील बहुसंख्याक विवाह हे शास्त्रशुद्ध शब्दांत सांगायचे; तर ‘देवाब्राह्मणाच्या साक्षी’ने होतात. तरीही कायद्यानुसार ‘मॅरेज सर्टिफिकेट’ आवश्यक ठरते.

असो. वधू-वरांप्रमाणेच त्यांच्या पालकांना व मानपानासाठी रुसवे-फुगवे करणाऱ्यांनाही लग्नविधीची पुरेशी माहिती नसते. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, आंतरजातीय-धर्मीय विवाह, ‘कोर्ट’ ऊर्फ रजिस्टर मॅरेज; इतकीच माहिती असते.

तथापि, ‘मनुस्मृती’नुसार ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस व पैशाच असे विवाहाचे आठ प्रकार आहेत. त्यातल्या कुठल्या प्रकारात आपला विवाह होतोय वा झालाय, ते समजून घेण्याची तसदी लाखात एखादाच घेत असेल. तेच लग्नविधी मंत्राबाबतचे आहे.

      लग्नच नव्हे तर सर्वच धार्मिक विधीत brahman भट- ब्राह्मण काय बोलतो; ते समजले असते, तर त्याची गरज कशाला लागली असती? ज्याचे त्यानेच पाठ करून म्हटले असते! धार्मिक विधी करताना यजमानाने जे बोलायचे असते; ते भट-ब्राह्मण बोलतो.

यजमानाने त्याला ‘मम’ म्हणून मान्यता द्यायची असते. ह्यातला ‘कन्यादानाचा संकल्प मंत्र’ असा आहे – ममपुत्रिममुक नाम्नी कन्या वरार्थिनी श्रीरुपिणी प्रजापती दैवत्यां प्रजोत्पादनार्थ तुम्यंमहं संप्रदे न मम कन्या पतिगृण्हात कवान्॥

     अर्थात, ‘माझी कन्या अमुक नावाची वरार्थिनी (पतीची इच्छा करणारी) श्रीस्वरूपी प्रजापती देवतेची कन्या प्रजोत्पादन करण्यासाठी मी तुला देत आहे. ही तुझी आहे; माझी नाही. आपण कन्येचा स्वीकार करावा.’ असा हा मंत्र brahman भटजी कन्येच्या वडिलांकडून वदवून घेतो. ह्याचा अर्थ काय होतो ?

असाच प्रकार कन्यादान आणि वराने वधूचा स्वीकार करण्याच्या ‘पाणिग्रहण’ मंत्रोच्चाराच्या वेळेस होतो. ”हे स्त्रिये, तू मला पती करून, माझ्या संगतीने राहून वृद्धावस्था संपादन करणार आहेस. म्हणून तुला सौभाग्य प्राप्त होण्याकरिता मी तुझा हात धरितो.

भग अर्यमा, सविता, व पूषा या चार देवांनी गृहस्थाश्रमातील सर्व कर्मे चालविण्याकरिता तुला माझ्या स्वाधीन केले आहे!” हा ‘पाणिग्रहण’ मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र आधी brahman भट-ब्राह्मण बोलतो. ते ‘वर’ बोलण्याचा प्रश्नच नाही.

त्याच्या वाणीला संस्कृताचे वळणच नसल्याने तो भटाने सूचित केल्यानुसार ‘मम’ बोलून ‘तू जे बोललास ते मान्य’ अशी संमती देतो. आणखी बराच तपशील आहे. हा शब्दश: प्रकार ‘भार्या समर्पयामि’ असाच असतो.

त्याबाबत इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ ह्या ग्रंथात सविस्तर लिहिलंय. त्यातील ‘अग्रोपभोगाचा हक्क’ देवासमान समजणारे ‘भूदेव’ ऊर्फ brahman भट- ब्राह्मण; यजमानाच्या ‘भार्या समर्पयामि’द्वारे कशाप्रकारे प्रत्यक्षात बजावत होते, याची संतापकारी माहिती आहे.

       या सर्व वैदिक छिनालबाजीला अमोल मिटकरी यांनी प्रथम वाचा फोडली असे नाही. या विषयावर अमरावतीच्या ‘दाढी’ गावचे शामराव सीताराम कुलट लिखित ४८ पानांची ”भटजीच वधूचा नवरा” या शीर्षकाची पुस्तिका १९३१ मध्ये प्रकाशित झाली आहे.

त्यांचा ह्या शीर्षकाचा लेख मुकुंदराव पाटील संपादित ‘दीनमित्र’ ह्या वर्तमानपत्रात ४ मे १९२७ रोजी प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी लोकहितार्थ अधिक माहितीची भर घालून आणि शीर्षकात ‘पुरोहितांची पापे’ याची जोड देऊन लेखाचे पुस्तक केले.

‘सत्यशोधक’ विचाराचे कुलट यांचे शिक्षण तिसऱ्या इयत्तेपर्यंतच झाले होते. परंतु, त्यांनी संस्कृत भाषेचे अध्ययन करून चिकित्सक पद्धतीने ‘पुरोहितांच्या पापी’ व्यवहाराची शास्त्रशुद्ध चिरफाड केली. त्यांची सत्यशोधक दृष्टी आणि चिकित्सेची वृत्ती आजच्या सुशिक्षित समाजाने स्वीकारून त्याचा व्यवहारात वापर केला पाहिजे. ‘कन्यादान म्हणजे वस्तूदान नाही,’ एवढ्यावरच अकलेचे सात फेरे मारून भटीपाशात अडकू नये.

      याविषयीच्या ’टीव्ही मीडिया’वरील संवादात brahman ’ब्राह्मण सभे’चे आनंद दवे हे अमोल मिटकरी यांना ‘तुम्हाला मंत्र-विधी चिकित्सेचा अधिकार कुणी दिला,’ असा प्रश्न विचारीत होते. ह्या प्रश्नात अहंकार आहे; तुच्छता आहे. ”हा अधिकार आम्हाला महात्मा फुले यांनी मिळवून दिलाय,”असे ठणकावून ऐकवले पाहिजे होते. ह्या अधिकारात ”देवळाला दार नको आणि देव – धर्माला दलाल नको,” हा आग्रह आहे.

तो brahman भटशाहीची गुलामगिरी झटकणारा आहे. म्हणूनच पुस्तिकेच्या अखेरीस शामराव कुलट कळवळून लिहितात-

भट सांगे जे जे कर्म, ते ते मानुनिया धर्म ।
म्हणुनिया चुकले वर्म, दीन दीन रे ॥

मतीमूढा हिंदूजनता, मेंढरा समान रे ॥
     ह्या मेंढरांत उच्चशिक्षित राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधीही असावेत, हे लज्जास्पद आहे.

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!