छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज

राज्याभिषेक सोहळ्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘विनायक शांती’ विधी पार पडला.

30 मे इ स. १६७४

30 मे इ स. १६७४

राज्याभिषेक सोहळ्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजां “चा विनायक शांती ” विधी पार पडला.

३० मे १६७४ ला महाराजांची मुंज झाली. मुंज झाल्यावर मगच विवाह करावयाचा असतो शास्त्र हे असे आहे . गागाभट्टांनी महाराजांना शास्त्राप्रमाणे लग्न करण्याची आज्ञा केली . महाराजांची तर अगोदरच आठ लग्न झालेली होती. त्यातील काही राण्या हयात होत्या .आता शास्त्राप्रमाणे नवीन लग्न कसे करावयाचे. वयाच्या ४४ व्या वर्षी लग्न करणे महाराजांना मुळीच पसंत पडण्यासारखे नव्हते.

छत्रपती शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी ”विनायक शांती विधी” संपन्न. राज्याभिषेक सोहळ्या प्रित्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई राणीसाहेब , सकवार बाई राणीसाहेब, पुतळाबाई राणीसाहेब यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे समंत्रिक विवाह झाले. या प्रसंगी ईंग्रज अधिकारी ‘हेन्री ओक्सिडीन’ हा गडावर हजार होत. तो आपल्या रोजनिशीत लिहून ठेवतो कि, “शिवाजी राजेंनी राज्याभिषेकापुर्वी काही स्त्रियांशी विवाह केले”.

राज्याभिषेक म्हणजे राजाचे भुमिशी लग्न. पण अभिषेकापुर्वी विवाह करावा असा धर्मसंकेत आहे. शिवकालात लग्ने बालपणीच होत असत. महाराजांना त्यांच्या वयास सांधर्म्य साधणारी मुलगी मिळणे अशक्य होते. पण म्हणून शिवरायांनी या ठिकाणी कुठल्याही लहान मुलीशी विवाह केलेला नाही. छत्रपती शिवरायांना “आचारशिल – विचारशिल – सर्वज्ञ पणे सुशिल” असे का म्हणतात ? यावरून दिसून येते. रायगडावर आता जिकडे तिकडे प्रफुल्ल वातावरण विलसत होते मंगल वाद्ये वाजत होती .राजवैभव उतू जात होते ,हे पाहून सर्वांचे डोळे तृप्त झाले होते .विविध प्रांतातील थोर थोर विद्वान ,मुसद्दी ,कलावंत, योद्धे , राजकीय अधिकारी ,कवी, वकील वगैरे व्यक्तींच्या परस्परात गाठीभेटी व परिचय घडत होते. सकाळ संध्याकाळ राजप्रासादात मिष्टान्नांची भोजने होत होती.पाहुण्यांचे मनोरंजन करण्यात गुणीजन तत्पर होते. वाद-विवाद, शास्त्रचर्चा वगैरे गोष्टींमुळे शास्त्रीपंडितांना पर्वणी लाभली होती. रायगडावर जणू दसरा-दिवाळी प्रकटली होती.पोथ्यापुराणातून आणि हरदासांच्या तोंडून ऐकलेल्या राजनगरांच्या वैभवाचा साक्षात अनुभव सर्वांना येत होता. कोणास काही उणे पडत नव्हते असे नाहीच.

एकेका दिवशी एक एक विधी पार पडत होते.महाराज या काळात दुग्धपान व फलाहार करून ते अतिशय श्रद्धेने प्रत्येक धार्मिक विधी यथासांग पार पाडत होते. नक्षत्रशांती , ग्रहशांती , ऐद्रियशांती ,पौरंदरीशांती, वगैरे विधी पार पडले. महाराज थोर विवेकी पुरूष होते !

अशा रीतीने मोठ्या थाटामाटात विनायक शांती विधी संपन्न झाला.

 

 

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
More Stories
खाद्यसंस्कृती - दह्यातील वांगी
खाद्यसंस्कृती – दह्यातील वांगी
error: Content is protected !!