महाभारत सिरीयल मधील अभिनेता सतीश कौल यांचे कॉव्हीड – 19 मुळे निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल, ज्यांच्या नावावर पंजाबी आणि हिंदी चित्रपट श्रेय होते आणि टीव्ही कार्यक्रम महाभारतात भगवान इंद्राची भूमिका त्यांनी साकारली होती, शनिवारी लुधियानामध्ये कोरोना वायरसमुळे त्यांची प्रकृती खालावून त्यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

2011 मध्ये पंजाबमध्ये गेल्यानंतर कौल यांनी अभिनय शाळा सुरू केल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. पण हा व्यवसाय प्रकल्प मात्र प्रतिसादाविना चालला नाही. 2015 मध्ये माझ्या हिपच्या हाडांना फ्रॅक्चर झाल्यानंतर माझया वर अनेक अडचणी आल्या. मी रुग्णालयात बेड रेस्ट घेत होतो. नंतर मग मला वृद्धाश्रमात राहावे लागले “मी तिथे दोन वर्षे राहिलो होतो,” असे कौल यांनी मुलाखतीत सांगितले होते.

70 च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी आणि पंजाबी चित्रपटांदरम्यान आयुष्याला कलाटणी मिळालेला हा अभिनेता पुढे जाऊन असे जीवन जगेल असे कोणाला वाटले सुद्धा न्हवते. राम लखन, प्यार तो होना था था आणि आंटी नंबर 1 या त्यांच्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांची कारकीर्द अधिक बहरत गेली आणि मौला जट्ट, सस्सी पुन्नू, इश्क निमाणा, सुहाग चुडा आणि पाटोला यासारखे पंजाबी चित्रपटांचे श्रेय त्याला मिळाले. टेलिव्हिजनवर, महाभारताव्यतिरिक्त, कौल 1985 च्या दूरदर्शन मालिकेत विक्रम और बेताल या नावाने ओळखले जात होते.

ज्येष्ठ पंजाबी अभिनेते सतीश कौल, ज्यांनी महाभारतासह अनेक हिंदी चित्रपटांत आणि कार्यक्रमांमध्ये काम केले आहे, ते मागील लोकडाऊन मध्ये आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करीत होते, आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांच्यासाठी परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. त्यांना त्यांच्या कुटुंबाने वृद्धाश्रमात ठेवले अशी अफवा सुद्धा त्यावेळी उठली होती, पण ती खरी होती. नंतर त्यांना त्यांची बहीण सत्य देवी यांनी लुधियानाच्या भाड्याच्या घरात आणून ठेवले होते. त्यावेळी त्यांना लॉकडाऊन मुळे आर्थिक विवंचनेला तोंड द्यावे लागले होते.

त्यांची बहीण यांनी माध्यमांना सांगितले “त्यांना गेल्या पाच-सहा दिवसांपासून ताप होता आणि त्यांची तब्येत ठीक नव्हती. म्हणून गुरुवारी आम्ही त्यानां श्री रामा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्यानंतर तेव्हा आम्हाला कळले की त्यांची “कोरोनाव्हायरस, चाचणी पॉसिटीव्ह आली होती” त्यांच्यावर अंत्यसंस्कार रविवारी होणार आहेत. कौल यांच्या पश्चात त्याची बहीण आहे.

कोरोनव्हायरसमुळे देशव्यापी लॉकडाऊनमुळे कौल आर्थिक विवंचनेत सापडले होते, त्यात त्यांची अवस्था लोकडाऊनमुळे आणखीच वाईट झाली असल्याचे त्यांनी नमूद केले होते. “मी औषधे, किराणा सामान आणि मूलभूत गरजा भागविण्यासाठी धडपडत आहे. उद्योग क्षेत्रातील लोकांनी मला मदत करावी असे मी आवाहन करतो. मला अभिनेता म्हणून खूप प्रेम केलेत, आता गरजवान म्हणून मला थोडे लक्ष द्या,” असे अभिनेता कौल मागील लोकडाऊन मध्ये म्हणाला होता.

 

Postbox India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here