Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

ab ki baar modi sarkar – सत्तेचा सोस, रडण्याचा डोस

1 Mins read

ab ki baar modi sarkar – सत्तेचा सोस, रडण्याचा डोस

 

 

ab ki baar modi sarkar – लेखक : ज्ञानेश महाराव

 

 


भारतीय लोकशाही व्यवस्थेत ’प्रधानमंत्री’ हे सर्वोच्च ’कार्यकारी’ पद आहे. या पदावरील व्यक्ती जेव्हा सार्वजनिकरीत्या दु:ख व्यक्त करते; अश्रू ढाळते, तेव्हा अवघा देश गलबलला पाहिजे. तसे नरेंद्र मोदी यांच्या ताज्या रडण्याने झालं नाही. उत्तर प्रदेशातील ’वाराणशी’ हा नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणूक मतदारसंघ आहे. इथूनच ते २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत ’खासदार’ म्हणून लोकसभेत गेले. ’कोरोना’च्या दुसर्‍या लाटेने सारा देश ताब्यात घेतला. उत्तर प्रदेशात ’कोरोना’ रुग्णांच्या आणि मृत्यूंच्या आकड्यांनी उच्चांक गाठला. वाराणशीतही मृतांची संख्या लक्षणीय झाली. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ’वाराणशी’कडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे होतं. परंतु, ते ’भाजप’चे ’विजयी ब्रँड’ म्हणून पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतले होते. त्यातील आसाम वगळता अन्य राज्यांत पराभवाचा ’बँड’ वाजल्यानंतर ; त्यांचं लक्ष थोड्याशा उसंतीनंतर वाराणशीकडे गेलं.

वाराणशीतील आरोग्य कर्मचारी आणि ’फ्रंटलाईन’ कर्मचार्‍यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी भावुक झाले. ज्या कर्मचार्‍यांचं ’कोरोना’मुळे निधन झालं; त्याबद्दल दु:ख व्यक्त करताना त्यांना रडू फुटलं. तथापि, त्यांच्या ह्या अश्रूंची फुले न होता, ते त्यांच्यावरच टीकेचे काटे होऊन कोसळले. कुणी त्यांच्या अश्रूंना नक्राश्रू म्हटलं; म्हणजे कुणाला ते मगरीचे अश्रू वाटले. कुणी त्यांच्या रडण्याला नाटकीपणा म्हणत, कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ’राजा’ ह्या कवितेला ’सोशल मीडियातून’ ’व्हायरल’ करीत, काव्याचा कालातीत साक्षात्कार घडवला.

ही कविता मोठी आहे. त्यातील सत्ताधार्‍यांच्या सोंगा-ढोगांची चिरफाड करणार्‍या काही ओळी पहा –


सभेत भाषण करताना,
राजा हुकमी रडायचा-
प्रजेच्या चिंतेमधे,
बघता बघता बुडायचा! -१

गरिबांची कणव येऊन,
त्याचा आवाज पडत असे-
कधी ध्येयवादी होऊन,
उंच उंच चढत असे! -२

राजा मोठा नट होता,
राजा होता शिकारी-
इतकं वैभव असूनसुद्धा,
राजा होता भिकारी! -३

अनेक मूर्ख माकडांच्या,
टोप्या त्याने घेतल्या होत्या-
आणि ज्यांना घालायच्या,
त्यांना टोप्या घातल्या होत्या! -४


ह्या ’टोपी’च्या खेळाची शक्यता लक्षात घेऊनच ’आम आदमी पक्षा’चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी महिन्यापूर्वी भविष्यवाणी केली होती; ती २१ मे रोजी खरी ठरली. त्यांनी १७ एप्रिलला ’ट्वीट’ केलं होतं की, ”तुम्ही थोडी प्रतीक्षा करा. लाईट- कॅमेरा- अॅक्शन सुरू होणार आहे. ते रडतील आणि ते संपूर्ण देशातील टीव्ही चॅनल दाखवतील!”
तसंच घडलं! त्यावर संजय सिंह म्हणतात, “देशाला एक संवेदनशील, प्रामाणिक मनाचा माणूस हवा आहे. ढोंगी प्रधानमंत्री नको! जो स्वत: सभा घेऊन ’कोरोना’ पसरवतो आणि नंतर रडण्याचं नाटक करतो!”
अशाच प्रकारची टीका निवृत्त ’आयएएस’ सूर्यप्रताप सिंह यांनी ’ट्विटर’द्वारे केली आहे. ते लिहितात, “मोदीजी, जेव्हा लोकांचा जीव जात होता; तेव्हा तुम्ही बंगालमध्ये ’दीदी, ओ दीदी’ अशी हाक देत होतात. गर्दी पाहून उत्साहित होत होतात. आता तुमचं हे खोटं सांत्वन आणि खोटे अश्रू देशाला चांगल्या प्रकारे कळतात!”
हे खरंच आहे. कारण देशातील जनता ऑक्सिजन, औषधं, हॉस्पिटल बेड, लस अभावी रस्त्यावर तडफडत होती. लोक मरत होते; तेव्हा देशाचे प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, आरोग्यमंत्री ह्यांची पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी नौटंकी सुरू होती. हे जनतेने डोळ्यांनी पाहिलंय, अनुभवलंय. तेच कवितेतून सादर करताना संदेश येवले रडणार्‍या प्रधानमत्र्यांना विचारतात –
प्रेतांचे ढीग पाहून,
तू रडला नाहीस-
मजुरांचे हाल पाहून
तू हळहळला नाहीस!
आज कॅमेर्‍यापुढे तू रडतो आहेस-
सांग बाबा, तू असा का छळतो आहेस? -१
नाही ऐकलास तू,
कुणा मातेचा टाहो-
ऑक्सिजनवाचून गेला,
तिचा जीव हो!
तेव्हा नाही वाहिला, तुझा ऊर भरून
आता काय उपयोग, होणार रडरडून? -२
नाही दिसली तुला,
दवाखान्यातली गर्दी-
दिवस-रात्र सेवेत होती,
खाकी-पांढरी वर्दी!
दाढी वाढवून साधू बनून, बंगालात तू फिरलास
तूच सांग असा प्रधानमंत्री, तू तरी कधी पाहिलास? -३
अक्षम्य चुका करतोय,
तू त्याच पुन्हा पुन्हा
देश भयाच्या गर्तेत लोटतोस,
जनतेचा काय गुन्हा?
ही संजय येवले ह्यांची कविता ’जनमन’ सांगणारी आहे. जनता जेव्हा अपेक्षाभंगाचे ओझ्यावर ओझे लादून घेत खूप काही सहन करते; तेव्हा ती सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारते.
असे प्रश्न लोकं ab ki baar modi sarkar ’मोदी सरकार’ला फसलेल्या ‘नोटबंदी‘पासून विचारत आहेत. ”ही नोटबंदी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आहे. ५००-१००० च्या नोटा डुप्लिकेट छापल्या जातात; तो पैसा देशविरोधी कारवायांसाठी दहशतवादी वापरतात; त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आहे. यासाठी फक्त ५० दिवस त्रास सोसा. त्यानंतर अपेक्षित ते न झाल्यास मला भर चौकात शिक्षा द्या!” असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. खरंतर, नोटबदल-बंदी हा प्रधानमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय नाही. तो ’रिझर्व बँक’चे गव्हर्नर वा केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या जबाबदारीच्या विषय होता. तथापि, जसा आता ’कोरोना’ लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा ’फोटो’ आहे, तसा हाही ’प्रसिद्धीलंपट’पणाचा प्रकार घडला. ’नोटबंदी’च्या काळात मोदींनी ’डिजिटल बँकिंग’च्या जाहिरातींतून स्वत:ला देशभर मिरवून घेतले.
’अर्थक्रांती’वाले अनिल बोकील आणि परिवार ’नोटबंदी किती किती छान छान’ अशी कावकाव प्रसारमाध्यमातून करीत होते. पण ह्या नोटबंदीने अपेक्षित ते काहीच घडलं नाही. मात्र, अचानक जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला शेतमाल नोटांअभावी १५-२० दिवस पडून राहिला. सडून गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला. छोटे-मध्यम उद्योग-धंदे अडचणीत आले. लाखो धंदे बंद झाले. करोडो कामगार बेकार झाले. रोजचा मेहनताना कमावणार्‍यांचं आयुष्य तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. देशभरातील करोडो लोकं दोन महिने नोटबदलासाठी बँकांसमोरील रांगांत गुंतून राहिले. त्यात शेकडो लोक मेले. देशाची आर्थिक ताकद दाखवणार्‍या ’जीडीपी’त कमालीची घसरण झाली. चौदा महिन्यांपूर्वी ज्या चुकीच्या पद्धतीने देशाला जनतेच्या भवितव्यासह खड्डयात घालण्याचा उद्योग ’मोदी सरकार’ने केला ; त्याचीच ’रंगीत तालीम’ नोटबंदीच्या तुघलकी निर्णयाने झाली होती. तरीही बोलल्याप्रमाणे चौकात शिक्षा भोगण्यासाठी नाही, तर ’चुकीची कबुली’ देण्यासाठी नरेंद्र मोदी यांची जबान चालली नाही. तेव्हा रडू फुटलं नाही.


उलट, भक्तमंडळींच्या भजनामुळे ५६ इंची छाती पुढचे बनावट कारनामे करण्यासाठी दुपटीने फुगली. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा-काश्मीर येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४१ भारतीय जवान शहीद झाले! ते ’मोदी सरकार’च्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश होतं. ह्या हल्ल्याने ’नोटबंदी’मुळे दहशतवादी कारवायांना चाप बसेल, ह्या बाता फुकाच्या ठरल्या. तथापि, हा ४१ भारतीय जवानांना शहीद करणारा दहशतवादी हल्ला हा नाटकाचा पूर्वरंग वाटावा; अशा प्रकारे देशभर ’कथित राष्ट्रवादा’ची हवा उडवत ’ऑपरेशन बालाकोट’ करण्यात आले.
ह्या उत्तररंगात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करताना ३५० दहशतवादी मारले गेले, असं छाती फुगवून सांगितलं गेलं. पण एकाही दहशतवाद्याचा मुडदा दाखवला गेला नाही. मात्र, ४१ शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला, ab ki baar modi sarkar असा गाजावाजा केला आणि २०१९ ची लोकसभा निवडणूकभाजप’ने बहुमताने जिंकली. ’मोदी सरकार’ पुन्हा सत्तेवर आलं. त्यामुळे जनतेला गृहीत धरण्याची मस्ती वाढली. त्याचमुळे डिसेंबर २०१९ मध्येच ’कोरोना’चं संकट जाहीर झालं असताना, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पला मदत करण्यासाठी त्यांचा भारत दौरा होईपर्यंत ’कोरोना’च्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. ह्यात तीन महिने गेले. त्याचे जीवघेणे परिणाम आज १३५ कोटी भारतीय जनता भोगत आहे. ह्या भोगाचे परिणाम पुढचा प्रदीर्घ काळ भोगावे लागणार आहे.
विषय गंभीर आहे; पण त्यात आपला उंदीर झालाय ह्याची जाणीव झाल्यामुळेच प्रधानमंत्र्यांना रडू आलं असावं. कर्तव्यदक्ष राजा-सत्ताधीश जनतेच्या दु:खासाठी रडत नाही; तर जनतेला दु:ख होऊ नये, यासाठी लढतो. जनतेच्या दु:ख निवारणासाठी झटतो. लोकांना राजकारण्यांची सत्तेसाठी चालणारी नाटकं नीटपणे कळत नाही; पण त्यांचा नाटकीपणा कळतो. तो लोक विविध प्रकारे व्यक्त करू लागली आहेत.
“एक मुसाफिरने ऑटोवाले से कहा, ’भैय्या ,मुझे मोदी स्मार्ट सिटी पहुंचा दो!’ वो कमबख्तने शमशान छोड दिया!” हा विनोद नाही; वास्तव आहे. त्यामुळेच प्रधानमंत्र्यांच्या रडण्याने लोकांत हळहळ निर्माण झाली नाही. हास्य निर्माण झालं.
राष्ट्र प्रथम, बाकी नंतर


लोकशाहीत राजकारणी हे निवडणुकीपुरताच पक्षाचे असतात. त्यांचे ’लोकप्रतिनिधी’ (नगरसेवक, आमदार, खासदार) झाले की, ते सर्वांचे होतात. तसे झाले तरच सरकारी मदतीचा लाभ आणि विकासाची प्रक्रिया लोकांपर्यंत सारख्याच प्रमाणात पोहोचू शकते. हे ’कोरोना-महामारी’च्या संकटात काटेकोरपणे होणं, अपेक्षित होतं. तसे न झाल्यामुळेच ’कोरोना’च्या दुसर्‍या लाटेने देशात मृत्यूचं थैमान घातलं. भारतात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ’कोरोना’ची दुसरी लाट उसळण्याआधी, ह्या लाटेने अमेरिका-युरोपमधील देशांत मोठ्या प्रमाणात केलेल्या मनुष्यहानीची उदाहरणं आपल्यापुढे होती. तरीही, ”कोरोना’ विरोधातली लढाई आपण जिंकली!” ह्या मस्तीत खुद्द प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री तोंडावरचा ‘मास्क’ काढून पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामीळनाडू, पाँडेचरी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मोठमोठ्या प्रचारसभात गुंतले होते.
खरं तर, ह्या तिघांनी विधानसभा निवडणुकांची जबाबदारी राज्यातील पक्षनेतृत्वावर सोपवून देशाच्या राज्यकारभाराकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. ते लसीकरण आणि ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियोजनासाठी अत्यावश्यक होतं. भारतासारख्या मोठा भूभाग आणि मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ’हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर’ रातोरात उभं राहू शकत नाही. तशी अपेक्षाही नाही. परंतु, मुलभूत सुविधा पुरवण्याची तरी सुरुवात व्हायला हवी ना! त्याऐवजी भारतात लस आणि प्राणवायूच्या तुटवडा-पुरवठ्याचं राजकारण सुरू झालं. ’मोदी सरकार’ आणि ’भाजप’ विरोधी राज्य सरकारं यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी सुरू होती. हीच स्थिती आज, ”तीन महिन्यांनी ’कोरोना’च्या तिसर्‍या लाटेचे संकट येणार” असं सरकारने जाहीर केलं असतानाही आहे.
दरम्यान, ”जगभरातील ६० टक्के लस उत्पादन भारतात होत असल्याने अवघ्या तीन महिन्यांत सर्व देशवासीयांना सहज लस उपलब्ध करून देऊ,” हा ’केंद्र सरकार’चा दावा फोल ठरला. परिणामी, ab ki baar modi sarkar ’मोदी सरकार’ला अमेरिका, रशिया आणि युरोपात बनलेल्या लस आयातीला रातोरात मंजुरी देण्याची घोषणा करावी लागली. भारताच्या लसीची निर्यात बोंबलली आणि लस आयात करण्याची वेळ भारतावर आलीय! ऑक्सिजनच्या बाबतही असंच घडलंय. महाराष्ट्र व उत्तर प्रदेश राज्यात मार्च-एप्रिल महिन्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी खास टँकर आणि ट्रेन चालवाव्या लागल्या. सिंगापूर आणि आखाती देशातून ऑक्सिजन आयात करावा लागला. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणार्‍या मशिनी युरोपातील देशातून मागवण्यात आल्या. ’विश्वगुरू’वर ही ’विश्वभिकारी’ होण्याची वेळ का आणि कोणी आणली? ’राष्ट्र प्रथम’ हे ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’चं विचारसूत्र श्वासात भिनलेल्या प्रधानसेवकामुळे आली का? ह्या प्रश्नाचं उत्तर ’भाजप-संघ परिवार’चा ’थिंक टँक’ शोधील. पण जाहीर करणार नाहीत.
तथापि, सत्य सोयीने झाकता येतं; संपवता येत नाही. ते प्रशांत खुडे यांनी कवितेतून नेमक्या शब्दांत उलगडून दाखवलंय. ते ’राष्ट्र प्रथम’चा समाचार घेताना लिहितात –
होय, राष्ट्र प्रथम!
नदीतून वाहणारे मृतदेह नंतर!
स्मशानभूमीत रांगेत थांबलेले मृतदेह…
व्हेंटिलेटर उपलब्ध न झालेली माणसं…
ऑक्सिजनसाठी तडफडणारी माणसं..
वेळेवर इंजेक्शन, बेड न मिळालेली माणसं…
औषधोपचार, अॅम्ब्युलन्स, टेस्ट रिपोर्ट,
लससाठी ताटकळलेली माणसं…
सारं सारं नंतर… राष्ट्र प्रथम!
कोणाची तरी आई / वडील / भाऊ / बहीण
यांच्यासाठी फोडलेला टाहो-
तो तर एकदम नंतर… राष्ट्र प्रथम!
आणि ज्या माणसांनी राष्ट्र बनते?
ते तर नंतर नंतर आणि नंतर… निरंतर!!
अशा वर्तमानात प्रथम काय करायचं उरतं? दिल्लीतल्या ’नव्या संसद भवना’वर आपल्या नावाची पाटी लावण्यासाठी अब्जोवधी रुपये खर्चायचे आणि ’रिझर्व बँके’च्या गंगाजळीतून ९९,१२२ कोटी रुपयाच्या रक्कमेचा प्रस्ताव मंजूर करून घ्यायचं, ते उरतं ! ते केलं आणि ह्या दोन्ही गोष्टींवर लोकांनी बोलू नये, यासाठी रडायचं! जनतेने ते पहायचं आणि तिसर्‍या लाटेच्या भयाने निमूटपणे जगायचं! जोवर अशा नाटकी लाटांचा अंत जनता करणार नाही; तोवर मजबुरीच्या ab ki baar modi sarkar अशाच लाटा कोसळत राहतील.


अमेरिकेचा स्वार्थ, भारताचा परमार्थ
’राष्ट्र प्रथम’ कसे असते ते अमेरिकेने दाखवून दिलंय. भारताला लशीसाठीचा कच्चा माल देण्याचे नाकारून अमेरिकेने ’दुनियेत कुणीकुणाचा नसतो; स्वार्थाची वेळ आली की चांगल्या मैत्रीलाही विसरलं जातं,’ ह्या सनातन सत्याला उजाळा दिलाय. १९९१ मध्ये भारताने ’जागतिकीकरण अणि उदार आर्थिक धोरणा’चा स्वीकार केला. तेव्हापासून ह्या धोरणाचा प्रखर समर्थक असलेल्या अमेरिकेच्या आपण अधिक जवळ गेलो. ती संधी साधून भारताच्या मोठ्या बाजारपेठेवर नजर असलेल्या अमेरिकेने आपल्याला थोडं आमिष दाखवून अब्जो डॉलर्सच्या संरक्षण सामुग्रीचा व्यवहार करण्यास भाग पाडलं. पण अमेरिका एवढ्यावरच थांबलेली नाही. भारतातील इतर गोष्टींवरही अमेरिकेची नजर आहे.
भारत ’कोरोना’ लसीचे उत्पादन करीत आहे. त्याचा कच्चा माल अमेरिकेतून येतो. ह्या मालाची भारताला आत्यंतिक गरज असताना तो देण्यास अमेरिकेने नकार दिला. त्यासाठी अमेरिकेने भारताशी असलेल्या राजकीय व व्यापारी संबंधाचा विचारही केला नाही. ‘अमेरिकेतील सर्व नागरिकांना मे महिन्यापूर्वी लस मिळावी, यासाठी कच्चा माल देता येत नाही,’ असे कारण अमेरिकेने दिले. हा साठा करून अमेरिकेने लोकसंख्येच्या तिप्पट लशींची तरतूद केली आहे.
ही ’अमेरिका फर्स्ट’ निती ट्रम्पना हरवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या, जो बायडन यांची नाही. ती मोदींचे जीवश्चकंठश्च मित्र डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. इतरांचं काहीही होवो, अमेरिकेचं हित महत्त्वाचं, हे अमेरिकेचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. ते योग्यच आहे. त्यापासून ’राष्ट्र प्रथम’चा बाणा अंगी मुरवलेल्या आपल्या प्रधानमंत्र्यांनी काही शिकायला पाहिजे होते. पण ते भारताने तयार केलेली लस इतर देशांना वाटत होते आणि पुरेशा लसी उपलब्ध नसताना ‘लस उत्सव’ जाहिर करून तोंडावर पडले.
अमेरिकेला त्यांच्या लसी भारताला विकायच्या आहेत. पण भारत ‘कोविशील्ड’च्या कच्च्या मालासाठी अडून बसला. खूप दिवस चाचपल्यानंतर अमेरिकेने भारताला अपेक्षित कच्चा माल देण्याची तयारी दाखवलीय. वर्षभरापूर्वी ट्रम्प यांनी धमकीवजा इशारे देत भारताकडून ’हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या गोळ्या मोठ्या प्रमाणात मागून घेतल्या. तसा आवाज आपले प्रधानमंत्री लसीच्या कच्चा मालासाठी अमेरिकेला देऊ शकले नाहीत. हे ’आत्मनिर्भर’तेचा डोस स्वत: न घेतल्यामुळे घडले असावे! 


ज्ञानेश महाराव

Leave a Reply

error: Content is protected !!