Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

ability to work under pressure – सामना-कामाच्या दबावाशी / दडपणाशी

1 Mins read

ability to work under pressure – सामना-कामाच्या दबावाशी / दडपणाशी

 

 

ability to work under pressure – सामना-कामाच्या दबावाशी / दडपणाशी

 

 

 

पंकजा परत परत तिची आजच्या कामाची यादी तपासतं होती. तीन वाजले होते तरी सकाळपासून एक पण काम नीट पूर्ण झाले नव्हते . बॉसचा अगदी १०-१० मिनिटांत फोन, रिपोर्ट्स आले नाहीत अजून मला ,तू मेल करते आहेस ना ?मला ते  वरच्या अधिकाऱ्याला पाठवायचे आहेत .खरंतर काल संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी ती ते काम करून जाणार होतीचं, पण नेमकं बॉस ने दुसरं महत्वाचे आणि तातडीचे काम तिला दिले. मग हे राहिलं बाजूलाच. खरंतर ही परिस्थिती  थोड्या-फार फरकाने आपणं सर्वचं अनुभवतं असतो.

 Deadlines, रिपोर्ट्स ,लक्ष्य (Targets)  ह्या सर्वांमुळे येणारा कामाचा  दबाव/ दडपण (work pressure )याचा  नाही म्हटलं तरी आपल्याला ability to work under pressure सामना तर करायचाचं असतो. मग ह्या दबावाने दबून जायचं, त्याचं दडपण घ्यायचं  ,अजून कामात चुका करायच्या, अजून गडबड-गोंधळ, उशीर करायचा,आपल्या चुकांचा पाढा वाचायला समोरच्याला अजून एक संधी (घ्या हं म्हणतं  ) दयायची की ह्यावर काही उत्तरं / उपाय शोधायचं ?? ह्या सगळ्यात होतं  काय आपणं स्वतःवर रागवतो , आपली चिडचिड होते   किंवा आपल्याला अस्वस्थ वाटतं म्हणजेचं अजून नकारत्मकता जाणवते. ability to work under pressure ह्याने आपल्याला कामाचा हुरूप वाटण्यापेक्षा नकोच हे असं होतं.

कसा बरं आपणं ह्याच्याशी सामना करू शकतो.

१. आपणं शांत रहायचा प्रयत्न करायचा. घाई -घाईने ,उतावीळ होऊन काम बिघडू शकतं .

२. Over-react करायचं  नाही ना अति-विचार करायचा .

३.आपलं लक्ष्य कामावर केंद्रित ठेवायचे .

४. आपली वृत्ती सकारत्मक ठेवायची . होईल ठीक ,जमेल मला हे स्वतःला सांगायचे  .

५. मदत हवी असेलं तर मागा ,त्यात काहीचं चुकीचे नाही .

६ . Deadlines   ह्या वास्तववादी असाव्यात. जे शक्य नाही ते स्पष्ट बोलावे.

७. आपले सहकारी/वरिष्ठ ह्यांचा  काही support हवा असेल तर नक्की त्यांना सांगा.

८. आपल्या वेळेचे व्यवस्थापन करा (Time Management).

९. योजना तयार करा /ठेवा आणि त्यावर काम करा.अंमलबजावणी केली नाही तर काही उपयोग नाही. 

१०. तुम्ही तुमच्या बाजूने वेळेत आणि योग्य प्रकारे काम करण्याचे प्रयत्न करा.

११.  कामाच्या दबावामुळे पण चांगला परिणाम येऊ शकतो,हे विसरू नका .

१२. महत्वाचे आहे  वेळ आणि काम याचं नीट वेळापत्रक असण्याचे .

१३. कामाचे ओझे वाटू देऊ नका .

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

१४. तयार रहा -आपले रिपोर्ट्स, फाइल्स,फोल्डर्स सगळे updated ठेवा / be organized .

१५.आपले आपल्या सहकारी /वरिष्ठ ह्यांच्या सोबतचे कामाचे संबंध हे चांगले ठेवा .

१६.  कारण नसताना काम pending ठेवू नका. करू, बघू,नंतर असं बिलकुल नाही चालणार 

१७.जे काम तुम्ही इतरांना देऊ शकता ,ते नक्की द्या. विकेंद्रीकरण खूप महत्वाचे (Decentralization ).

१८.काम साठवून ठेवलं ,तर  कामाचा डोंगर होणारचं ,तेव्हा शक्य तो काम विभागून हाता  वेगळे केलं तर त्याचा फायदा होईल .

१९.आपलं आयुष्य आणि आपलं काम हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत,हे लक्षात  ठेवा. 

२०.कामं एके कामं करू नका, ब्रेक घ्या, ताजे-तवाने व्हा आणि नव्या जोमाने कामं संपवा .

खरंच कामाचा दबाव आहे की फक्त काम पटकन व्हावं म्हणून हा दबाव तयार केला हे पण बघा. बऱ्याच जणांना आरामात, वेळेचा विचार न करता काम करत राहायची सवय झाली असते. त्यांना कार्यक्षमता / उत्पादकता( Productivity ) ह्याच्याशी काही देणं-घेणं नसत. अश्या लोकांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना कामाचे /वेळेचे बंधन घालावे लागते. आपणं जर कामाचा आनंद घेऊन काम केलं तर कामाचा दबाव कधी वाटणारचं नाही , हे नक्की !

येणाऱ्या लेखात पाहू ताण-तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपणं अजून काय करू शकतो.

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

Leave a Reply

error: Content is protected !!