Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Advertisement – तनिष्क जाहिरात

1 Mins read

Advertisement – तनिष्क जाहिरात

 

 

Advertisement – तनिष्क जाहिरात – समीना दलवाई यांचा लेख

 

 

12/5/2021,

 

इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेला समीना दलवाई यांचा लेख इतका आवडला की अनुवाद केल्याशिवाय राहवले नाही. तनिष्क जाहिरातीला

झालेल्या आततायी विरोधाला याहून सुंदर उत्तर ते काय?

भिन्नवंशीय सहजीवन जगू शकतात एव्हढेच नव्हे तर ते सहसमृद्ध होत जगतात. तनिष्कने आपली Advertisement जाहिरात मागे घेणे म्हणजे हे वास्तव नाकारणे
– समीना दलवाई

मुस्लिम सासू आणि हिंदू सुनेची ती तनिष्कची जाहिरात त्यांच्या सगळ्याच Advertisement जाहिरातींप्रमाणे अतीव सुंदर आहे.

ती मागे घेणे म्हणजे ती एक खोडसाळ काल्पनिक कथा रंगवते, असली काही नाती प्रत्यक्षात असतच नाहीत असा विश्वास बाळगणे.

पण वास्तवात ती तशीच असतात. मी स्वतःच त्याचा एक जिताजागता पुरावा आहे. आमचे आयुष्य म्हणजे गैरसमजूत फैलावू पाहणाऱ्यांना

एक सणसणीत उत्तर आहे. त्या जाहिरातीतील ते पोटात असलेलं मूल म्हणजे जणू मीच आहे.

 

1971 साली आमचे आईवडील प्रथम भेटले तेव्हा लव्ह जिहाद हा शब्द काही त्यांच्या कानावरुन गेला नव्हता. दोघेही युक्रांदचे कार्यकर्ते होते.

युक्रांद कामगारांचे शोषण, जातीय अत्याचार ,आदिवासी जमातींची मुस्कटदाबी असे प्रश्न घेऊन लढणारी एक समाजवादी विद्यार्थी संघटना होती.

या संघटनेत सामील झाली त्यावेळी माझी आई अठरा वर्षाची घाऱ्या डोळ्यांची, गोरीगोमटी, हसरीखेळती तरुणी होती. भोवतालचे सगळे तरुण

तिच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. ते सगळे ग्रामीण, गरीब, दलित , मुस्लिम अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले होते. अनेकजण प्रथमदर्शनीच

तिच्या प्रेमात पडत आणि तिच्याशी लग्न करु इच्छित. खरं तर दुसरा एक भिडस्त तरुण आपल्यातर्फे तिला मागणी घालावी म्हणून आमच्या

बाबांकडेच टुमणे लावत असे. आईच्या माहेरची पार्श्वभूमी होतीच तशी पोटात गोळा आणणारी. सुप्रसिद्ध मार्क्सवादी गांधीवादी विचारवंत नलिनी पंडित

यांची मुलगी होती ती. पंडितांचे कुटुंब अत्यंत सधन आणि नामवंत होते. दादरमध्ये भलामोठा बंगला, अनेक गाड्या, (त्यावेळचा दुर्मिळ)

टेलिफोन असलं सगळं होतं त्यांच्याकडे.

 

आणि मग चिपळूणहून आलेल्या एका कोंकणी मुसलमानाशी लग्न करायचं तिनं ठरवलं तेव्हा दोन्हीं बाजूंनी धर्मांधता उसळून आलीच.

दादरच्या रस्त्यावर ओळखीच्या वयस्क बायका तिला अडवून विचारत, ” मुसलमानाशी लग्न करणार तू? सांभाळ हं. तीन तलाक पद्धती असते त्यांच्यात”

बाबांच्या थोरल्या भावाला लोक विचारत, ” पण त्याला हिंदू पोरीशी कशाला लग्न करायचंय?” आता हा थोरला भाऊ म्हणजे दुसरा तिसरा कुणी

नसून ते होते मुस्लिम सुधारक हमीद दलवाई! त्यांचे डोकेच सणकले. त्यांना वाटलं आटोपशीर आणि साधा लग्नसमारंभ पार पाडण्याचा

आपला गांधीवादी समाजवादी आदर्श राहू दे बाजूला. म्हणाले आपण जंगी लग्न करु. कळू दे सगळ्यांना एकजात की केलं यांनी लग्न.

त्यांनी पुष्कळ लग्नपत्रिका छापल्या आणि भेटेल त्या प्रत्येकाला ते त्या वाटत सुटले.

 

आजी सांगते किती लोक त्या लग्नाला आले होते काही मोजमाप नव्हते बघ. कार्यलय छोटे होते पण गोंधळ जबरदस्त होता.

कोकम सरबताचे तीन हजार प्याले रिचवले गेले. आणि तेव्हढेच काय ते दिले गेले आलेल्या पाहुण्यांना. बिचाऱ्या माझ्या आईबाबांना

इतक्या लोकांशी हसून बोलावे आणि हस्तांदोलन करावे लागले की गाल आणि हात दुखू लागले दोघांचेही. नंतर आईच्या मित्रमैत्रिणी

आईला म्हणत,” बाप रे ,काय ग तो गोंधळ तुझ्या लग्नातला! सगळ्या अवयवांनिशी बाहेर पडू शकलो हे नशीबच म्हणायचं आमचं!”

मिरजोली या आमच्या खेड्यातही मग पुन्हा समारंभ झाला. मुंबईहून गाड्या घेऊन आलेल्या पंडित कुटुंब आणि इष्टमित्रांना दलवाई मंडळींनी मस्त बिर्याणी खिलवली.

मात्र तनिष्कसारखे सुवर्णालंकार Advertisement काही सासरच्यांनी घातले नव्हते आईला. आई पहिल्यांदा सासरी गेली तेव्हा

चांदीची कानातली बघून तिला धक्काच बसला. “पण चांदीच्या तर ताटवाट्या,भांडीकुंडी असतात.” सारस्वत समाजातील दिवाळीचा

फराळ तिच्या डोळ्यासमोर येऊन ती स्वतःशीच म्हणाली. दोन घरात एव्हढा वर्गीय भेद होता! परंतु कुवतीप्रमाणे द्यायचं आणि

गरजेप्रमाणे घ्यायचं हे समाजवादी तत्त्व आचरत तिने आपले विस्तारित कुटुंब निर्माण केले. मुंबईतल्या कॉलेजात प्राध्यापक म्हणून

मिळणाऱ्या पगारातून तिनेच गावातल्या भावंडांचा खर्च केला कारण बाबा तर पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून कामगारांचे मोर्चे, आदिवासींचे

मेळावे यासाठी सतत बाहेरच असत. भावंडांच्या शिक्षणाला आर्थिक मदत करत , नातेवाइकांच्या आजारपणात किंवा लग्नकार्याच्या

खरेदीसाठी त्यांना आपल्या मुंबईतल्या फ्लॅटमध्ये आणत तिने सारे सांभाळले. त्या एकत्र कुटुंबाची ती कर्ती बाई बनली.

तनिष्कवर Advertisement बेलगाम हल्ला करणाऱ्यांना हे कळत नाही की त्या जाहिरातीतील लुकलुकत्या डोळ्यांची ती शेलाटी

सून मुसलमान घरात सामावून गेली आहे. केवळ बाईच हे करु जाणे! हा लव्ह जिहाद नव्हे ही तर मुसलमानांची घरवापसी आहे.

हे ट्रोल्स केवळ मुस्लिम विरोधी नाहीत. ते महिला विरोधी आहेत. त्यांना वाटतं मुलगी देणे म्हणजे पराभव, शरणागती. उलट या

जाहिरातीतील मुस्लिम कुटुंब आता हिंदू कुळाचार पाळत आहे, हिंदू संस्कार घडवत आहे. माझ्या कुटुंबात दोन्हीकडच्या

नातेवाईकांसह दिवाळी साजरी होते आणि ईदही साजरी होते. प्रत्येकाला खावे ,प्यावे, रंग उडवावेत आणि सणासुदीचे कपडे

घालावेत असं वाटतं. यात न आवडण्यासारखं काय आहे?

माझी आई आजही हिंदू आहे आणि बाबा मुसलमान. कर्मकांडे दोघेही करत नाहीत पण सांस्कृतिक उत्सव दोघेही आवडीने साजरे करतात.

अगदी सुरुवातीला आईच्या सासरचे वयस्क नातेवाईक तिने इस्लाम स्वीकारावा म्हणजे तिला ‘जन्नत’ प्राप्त होईल असे सुचवत. यावर ती हसून म्हणे,

” मी इहवादी आहे. आत्ता आणि येथे, याच आयुष्यात मला काय मिळणार आहे ते सांगा!” खरं तर लग्नानंतर काहीच महिन्यात तिने ठसठशीत

कुंकू लावायला सुरुवात केली. आपली ओळख तिला ठसवायची होती. हे कुंकू आणि साडी यामुळे ती अधिक भारदस्त, धीरगंभीर प्राध्यापकही दिसू लागली.

अर्थशास्त्र शिकवू लागली होती ती आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या वयाचीच दिसे. तिने आपला क्रांतिकारक बाणा सोडला नाही आणि नव्या मूल्यव्यवस्थेचे संस्कार पाळत आणि करत आम्हाला मोठे केले.
वाढत्या सांप्रदायिक वातावरणात आपली मुले कसे निभावून नेतील याबद्दल आईबाबांना काळजी होती. आम्हाला रशियन पुस्तके देऊन

आणि मिश्रधर्मीय कुटुंबे, मित्रपरिवारात आमचा वावर ठेवून त्यांनी यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पण तरीही दंगे, वैरभाव आणि सहजलक्ष्य होण्यापासून ते आम्हाला वाचवू शकले नाहीत. पण अशा सुरंगाच्या वातीवर असल्यामुळेच आम्हाला अधिक बळ मिळाले. आम्ही देशाबाहेर फिरलो, आपली माणसे मिळवली, अभ्यास आणि पुस्तके यातून आनंद घेतला आणि आमच्या कुटुंबाची बहुलता अधिकच व्यापक केली.
माझ्या भावाने हैनन राज्यातल्या एका चिनी मुलीशी लग्न केलं आणि मी एका तेलंगणी रेड्डीशी जोडी जमवली. भरीला मी नागालँडमधल्या मॉन जिल्ह्यातून एक मुलगीही दत्तक घेतली. आता एक निम्मा चिनी मुलगा, एक मराठी-तेलगू मुलगी, आणि एक चिमुकली नागा योद्धा अशी आमची सगळी मुले सार्वजनिक बागेत खेळतात तेव्हा लोक आश्चर्याने पाहू लागतात. आमच्या कुटुंबात आम्ही सगळे इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलगू, मँडरिन आणि कोंकणी अशा विविध भाषा बोलतो.
आणि मग एकारलेल्या कल्पनाशक्तीची ‘नॉर्मल’ माणसे

” पण हे कसं काय?” किंवा “अस्सं होय? असे प्रश्न विचारत आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही फक्त मंद हसतो.
आमचे जगणे हेच त्या ट्रोल्सना, चिंतातुर जंतूंना उत्तर आहे. आम्ही आहोत. भिन्नवंशीय नुसते सहजीवन जगतात असे नव्हे तर ते सहसमृद्ध होत जगतात. त्यांच्यापुढे तुम्ही ट्रोल मंडळी अगदीच एकसुरी दिसू लागता.

अनुवाद: अनंत घोटगाळकर

 

मूळ लेख – https://indianexpress.com/article/opinion/columns/tanishq-hindu-muslim-ad-boycotted/

Leave a Reply

error: Content is protected !!