Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Ahmednagar – अहमदनगर शहर नाबाद ५३१

1 Mins read

Ahmednagar – अहमदनगर शहर नाबाद ५३१

Ahmednagar – समीर मणियार


 

 

1/6/2021,

औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर झालेच पाहिजे, अहमदनगर चे नाव बदलून “अहिल्या नगर ” झाले पाहिजे अशी मागणी आता धनगर समाजाकडून होत आहे,

नुकत्याच २८ मे रोजी अहमद नगर स्थापना साजरा झाला, आपणांस अहमद नगर शहराबद्दल नक्की काय माहित आहे, तर जाणून घेऊया समीर मणियार यांच्याकडून.


अहमदनगर शहर नाबाद ५३१

अहमदनगर Ahmednagar या काना मात्रा वेलांटी उकार नसलेल्या ऐतहासिक शहराचा आज शुक्रवारी ५३१ वा स्थापना दिवस आहे.


इतिहास, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, संरक्षण, शिक्षण, संत परंपरा, कामगार, शेती, सहकार बाजारपेठ अशा समाजजीवनाच्या

सर्वच क्षेत्रात या शहराचे मोठे योगदान आहे. तथापि, लोकशाही मूल्यांचा अत्यंत आग्रह, मुरलेले राजकारण आणि प्रत्येकाला नेता व्हायची घाई

यामुळे बदलत्या नव्या काळात या शहराला काळाच्या गतीसोबत चालता आले नाही हे कटु वास्तव आहे.


ऐतहासिक विरासत शहराला आली असली तरी सहकारात मुरलेल्या उत्तरेतील नेत्यांच्या राजकारणामुळे शहरात मोठे परिपक्व

आणि व्यापक दृष्टी असलेले नेतृत्व उभे राहू शकलेले नाही. भविष्यात ते होईल अशी आशा बाळगण्यात हरकत नाही.

अठरापगड जातीची माणसं या शहरात राहत आली आहेत. हैदराबादसह आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील तेलगु बांधव येथे राहतात.

कापडाची मोठी बाजारपेठ, शेतमाल आणि धान्याचा बाजारही मोठा आहे. लोकयुगचे संपादक नवनीतभाई बार्शीकर यांनी

अहमदनगर शहरचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. त्यांनी शहर विकासासाठी नेटाने प्रयत्न केला. युक्रांदचे संस्थापक

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी नवनीतभाई बार्शीकर यांचा पराभव करुन युवकांचे नेतृत्व देण्याचा असफल प्रयत्न केला.

डॉ. श्रीकृष्ण निसळ, प्रा. एस. एम. आय. असीर, दादा कळमकर, अरुण जगताप अशी आमदारांची कारकिर्द येथे आहे.

कायनेटिक या ऑटो क्षेत्रातील उद्योगही येथे बाळसे धरु शकला नाही.


पुणे ते औरंगाबाद या मार्गावर Ahmednagar अहमदनगर शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. तेथे उद्योगक्षेत्राचा विकास औरंगाबादचे

वाळुज अथवा शिरुरचे कोरेगावच्या तुलनेत होऊ शकला नाही. त्याला स्थानिक नेते व कामगारांची नेतृत्व जबाबदार आहे.

नगरी म्हटले की भाषेत आपुलकी अथवा भावनिक ओलावा दिसणे तसे अशक्यप्रायच आहे. बहुतांश नगरकरांची भाषा ही इतरांना रांगडी वाटत आली आहे.

विनम्रता आणि नगरी भाषा ही परस्परविरोधी टोके म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण आता काळानुरुप बदल होत असून,

नवीन पिढी ही अधिक सुसंवादी, सहनशील, व्यासंगी अभ्यासू होईल यात नवल नाही.


अहमदनगर शहराचे राजकारण तसे बाहेरच्या आलेल्या मंडळींनीच केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गेल्या चार पाच दशकातील आमदार आणि खासदारांचे चेहरे पाहिले तर यातून आपल्याला खरे वास्तव दिसण्यास मदत होईल.

उत्तरेला सिंचनामुळे बागायती पट्टा, साखर कारखानदारी तर दक्षिणेला दुष्काळी भाग, जिरायत क्षेत्र अशी असमान विभागणी पूर्वी दिसत असे.

सहकार या भागात चांगला फोफावला. पण काही राजकीय कुटुंबाची विकासाची बेटे तयार झाली. त्यात शहराच्या विकासाची वाताहात झाली.

शेतीचे क्षेत्र आणि त्या शेतीवर खाणाऱ्यांची तोंडे अधिक झाल्यामुळे शेती परडवणारी राहिली नाही. नोकरीसाठी शहरातील मंडळींना अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याची वेळ आली.

हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक अशी बिरुदावली अहमदनगर शहराला लावली जाते. तथापि, बदलत्या स्पर्धेच्या

राजकारणात जातीयतेचे कंगोरे दिसायला लागतात. जात विभागणीच्या राजकारणामुळेही हे शहर अपेक्षित विकास साधू शकलेले नाही.

नगरी माणसे इतिहासात रमण्यात मश्गुल असतील तर नवा काळ अर्थात करोनानंतरचे जग खूप अवघड असणार आहे.

आज अहमदनगरचा ५३१ वा स्थापना दिवस. बहामनी राजवट संपुष्टात आलानंतर १४९० साली अहमद निझामशाह याने कोटबाग निजाम हा

राजवाडा बांधून अहमदनगर शहराची स्थापना केली. अहमदनगरला अत्यंत वैभवशाली इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातही

अहमदनगरचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना ब्रिटिश सरकारने अटक करून प्रदीर्घ काळ इथेच ठेवले होते.

याच ठिकाणी पंडितजींनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

स्वातंत्र्योत्तर काळातही या जिल्ह्याने महाराष्ट्राला, देशाला नेतृत्व दिले असे आपण नुसते म्हणायचे असते.


सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ अहमदनगर जिल्ह्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी रोवली. पुढे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात,

दादासाहेब तनपुरे, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, शिवाजीराव नागवडे, भानुदास मुरकुटे, बबनराव ढाकणे,

मारुतराव घुले पाटील आदींनी त्या सहकारावर कळस चढवला.

माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांचाही अहमदनगरशी निकटचा संबंध आहे. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे,

बाळासाहेब भारदे, प्रा. ना. स. फरांदे, बाबूराव भारस्कर, बाबुराव भापसे, सूर्यभान वहाडणे, कॉ. दत्ताजी देशमुख, किशोर पवार,

माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील. तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर. विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे. लेखक प्रा. रंगनाथ पठारे.

राम नगरकर. क्रीडापटू झहीर खान, अजिंक्य रहाणे, अभिनेते सदाशिव अमरापूरकर, शाहू मोडक, मधु कांबीकर, सुरेखा पुणेकर,

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, पोपटराव पवार, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष बाबुमियाँ बँडवाले, आरोग्य क्षेत्रातील

डॉ. रजनीकांत आरोळे यांच्यासारखे व्यक्तिमत्वेही याच जिल्ह्यातील आहेत.

सीना नदीच्या काठी वसलेल्या अहमदनगर शहरात अनेक पुरातन उत्तम वास्तुकलेचा नमुना असलेल्या वास्तू आहेत.


अहमदनगर भुईकोट किल्ल्याला पाच शतकांचा इतिहास आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमदशा बादशाहाने शहर वसविण्यापूवी इ.स.१४९०मध्ये किल्ला बांधला.

या किल्ल्याचा परिघ एक मैल ८० यार्ड इतका आहे. किल्ल्यास २२ बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत.

खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटीशांच्या काळात १८३२मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला होता. आता त्याचे अवशेष उरले आहेत.

मुघल काळानंतर १८०३मध्ये वेलिंग्लीच्या ड्यूक ऑर्थर वेलेस्ली यांनी अहमदनगर किल्ला ताब्यात घेतला. १८३० साली ब्रिटीश सैन्याने अहमदनगरला बस्तान केले.


सध्या भारतीय लष्कराचे मोठे प्रशिक्षण केंद्र व संरक्षणाशी निगडीत अन्य महत्वाची केंद्रे या भागात आहेत.

अहमदनगर शहराचा पसारा लोकसंख्या वाढीमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. एकेकाळी घोडा गाडी म्हणजे टांग्यांचे असलेले शहर आता रिक्षा,

बाईक आणि मोटारींचे शहर बनले आहे. दीडशे वर्षापेक्षा अधिक जुनी असलेली शहर नियोजनाची व्यवस्था पाहणारी सध्याच्या भाषेत महापालिका

आणि तिचा कारभार अत्यंत पारदर्शी व चांगला म्हणणे धाडसाचे ठरेल.


पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळाचा ऐतहासिक वारसा असलेल्या Ahmednagar अहमदनगर शहराला नव्या स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी

व्यापक समाजभान असलेली नवीन पिढी आणि सजग नेतृत्व निर्माण करावे लागेल. नगरकरांच्या स्वभावात ऋजुता आणि माणुसकी ओतप्रोत भरलेली आहे.

पण प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या संकुचित नजरेतून पाहण्याची जुनी सवय सोडून द्यायला शिकले पाहिजे.

तसे झाले तर काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेल्या अहमदनगरच्या प्रगतीची वाटचाल आणखी देखणी व नेत्रदीपक होईल.

तूर्तास जिवाभावाच्या सर्व नगरकरांना अहमदनगर शहराच्या स्थापना दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.


समीर मणियार,


error: Content is protected !!