Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

amar shaikh – महाराष्ट्र लोकशाहीर अमर शेख

1 Mins read

amar shaikh – महाराष्ट्र लोकशाहीर अमर शेख

 

amar shaikh – लोकशाहीर अमर शेख यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

28/8/2021,

मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान

कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी

लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून,

 

तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या

तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले.

पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले.

येथेच त्यांचे मित्रांनी amar shaikh ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या

सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला

(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले.

 

आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला.

स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले.

चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला.

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते,

लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते.

त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी

पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो.

कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची amar shaikh अमर शेख यांची प्रवृत्ती होती.

 

रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या,

तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते.

त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष

यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्‌स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत

प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते.

कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा

आवाज होता.

 

कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी

(१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग

यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले.

प्रपंच आणिमहात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार

भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने

त्यांनी तो पक्ष सोडला.

 

लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-

आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला.

अतिशय धारदार आणि टिपेला पोहोचणार्या त्यांच्या आवाजाचा व उंच तानेचा प्रभाव जनमानसावर पडत असे .

गाण्याचा आशय व विचार तर ते लोकांपर्यंत टोकदारपणे पोहोचवायचे .पण भावोत्कट गाणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

सारा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या व इतर वेळीही कामगार चळवळीचे ठरलेले शाहीर अमर शेख होते स्वरचित

आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ती-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले.

चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला.

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणीच्या माध्यमातून त्यांनी आजन्म काम केले. त्यांच्या शाहिरीत लावणी,

पोवाडे, गीते, लोकनाटय़े इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य

त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला.

त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व

रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती.

 

रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या ब-याचशा रचना प्रासंगिक असल्या,

तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते.

त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी

मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘महाराष्ट्राचा मायकोव्हस्की’ म्हणत. त्यांना सर्वात प्रिय

असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते.

कविता हा या लोकशाहिराचा प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.

प्रपंच आणि महात्मा जोतिबा फुले या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या.

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोव-यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला.

लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी

मुंबई विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवियित्री

मल्लिका अमरशेख व आणखी एक त्यांना कन्या आहेत. प्रसिद्ध साहित्यिक नामदेव ढसाळ, अनिल बर्वे हे

त्यांचे जावई होते. साहित्य संपदा कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह,

अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या

पोवाडय़ांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाडय़ांचा समावेश आहे.

युगदीप व वख्त की आवाज या मासिकांचे त्यांनी संपादन केले.

 

आमच्या वैराग जि.सोलापूर येथील नाईक निंबाळकर घराण्याशी amar shaikh अमर शेख यांचे

अत्यंत घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. वर्षातून एक तरी कार्यक्रम वैरागमधे घेतला जात.

( १९४८ ते १९६९ ) आजूबाजूच्या शंभर खेड्यातून बैलगाडीतून श्रमिक व शेतकरी आवर्जुन त्यांच्या.

कार्यक्रमास हजेरी लावत असत.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील शाहिर अमर शेख यांचा कार्यकाळ

म्हणजे सुवर्णकाळ होता.

 

शाहीर अमर शेख यांचे इंदापूर येथे 29 ऑगस्ट 1969 रोजी अपघाती निधन झाले.

( मे २०१८ मधे मला ईंदापुर येथे शाहीर अमर शेख यांच्या नावाने साहित्यिक क्षेत्रातील

कामगिरीमुळे पुरस्कार प्राप्त झाला .तो पुरस्कार स्विकारताना मी अत्यंत भाराऊन गेले होते. )

अशा या थोर राष्ट्र शाहिराला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!