amit shah and modi दीदींचा ऐतिहासिक विजय ! मोदी-शहांना जबरदस्त झटका
amit shah and modi दीदींचा ऐतिहासिक विजय ! मोदी-शहांना जबरदस्त झटका
amit shah and modi दीदींचा ऐतिहासिक विजय ! मोदी-शहांना जबरदस्त झटका

amit shah and modi – मोदी-शहांना जबरदस्त झटका !

amit shah and modi - दीदींचा ऐतिहासिक विजय ! मोदी-शहांना जबरदस्त झटका !

amit shah and modi – मोदी-शहांना जबरदस्त झटका !

 

amit shah and modi – दीदींचा ऐतिहासिक विजय ! मोदी-शहांना जबरदस्त झटका !

 

 

महारुद्र मंगनाले

 

एकूण पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल आज येताहेत.निकालांचे कल पाहता आसाम,पेद्दूचेरीत भाजपा,

केरळमध्ये कम्युनिस्ट तर तामीळनाडूत डीएमके ची सत्ता येणार हे स्पष्ट झालयं.या चारही राज्यातील

निवडणूक पूर्व अंदाज असेच होते.यात फारसं अनपेक्षित काही नाही.

मात्र पं.बंगालमध्ये नक्की काय होईल, याबाबत मत-मतांतरे होती.तृणमूल कॉन्ग्रेस पराभूत होईल ,

असा अंदाज व्यक्त करणारेच अधिक होते.सगळा मिडीया amit shah and modi मोदी-शहाचे पैसे घेऊन,


Get $50 off to buy Airdog Wearable Air Purifier Air Necklace

दीदीच्या पराभवासाठी अहोरात्र मेहनत घेत होता. त्यामुळे पं.बंगालची निवडणूक अनेक दृष्टीने ऐतिहासिक

होती.मुख्यमंत्री ममता दीदी तिसऱ्यांदा मतदारांना त्यांच्यासाठी कौल मागत होत्या.ही बाब तशी त्यांच्यासाठी

अडचणीची होती.तर भारतीय जनता पक्ष काहीही करून बंगालची सत्ता मिळवायचीच , हे ठरवून निवडणुकीत

उतरला होता.एका दृष्टीने ही विषम लढाई होती.

 

Also Read : https://postboxindia.com/mamata-banerjees-trinamool-congress-regional-party-plays-khela-hobe-fascist-politics-no-entry-in-bengal/

 

गेल्या सहा महिन्यांचा काळ आठवून पाहा.तृणमूल कॉन्ग्रेसच्या किती उमेदवारांना फोडून भाजपात घेण्यात

आले.कम्युनिस्ट आणि कॉन्ग्रेस पक्षातही मोठी फोडाफोडी करण्यात आली.यासाठी ईडी आणि सीबीआय चा

उघडपणे वापर करण्यात आला.अनेक भ्रष्टाचाऱ्यांना भाजपाची दारं खुली करण्यात आली.आमच्याविरूध्द

जाल तर जेलमध्ये राहाल,अशीच दहशत निर्माण करण्यात आली.दुसऱ्या बाजुला देशातला सर्वोच्च मिडीया

अहोरात्र ममता दीदींना बदनाम करीत होता.निवडणूक आयोग तर ,मोदी-शहांचे बाहूले बनूनच काम करीत होता.

मोदी-शहा amit shah and modi आणि त्यांच्या बाहेर राज्यातील पिलावळींना जास्तीत जास्त मतदारसंघात


Get $50 off to buy Airdog Wearable Air Purifier Air Necklace

प्रचार करता यावा,यासाठी आठ टप्प्यात मतदान ठेवण्यात आले.ऐन निवडणुकीत मिथून चक्रवर्ती सारख्या

कथीत लोकप्रिय नटांना ममताच्या विरोधात प्रचारात उतरण्यात आले.देशभरातील भाजपा,आरएसएसचे

हजारो कार्यकर्ते, विविध राज्यातील भाजपाचे अनेक मंत्री,जवळपास सगळं केंद्रीय मंत्रीमंडळ पं.बंगालमध्ये

प्रचाराला उतरलं होतं.याशिवाय विरोधकांच्या सभेत ‘जय श्रीराम’चा नारा देऊन गोंधळ घालण्यासाठी पैसे

देऊन, लाखो लोक भाजपाने प्रचारात उतरवले होते.मतदारांना प्रभावित करण्यासाठी लाखोंच्या सभा,प्रचंड

गर्दीच्या पदयात्रा आयोजित करण्यात आल्या. पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला.

 

Also Read : https://postboxindia.com/rising-corona-deaths-burning-anxiety-dnyanesh-maharao/

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका राज्याच्या या निवडणुकीत २३ जाहीर सभा घेतल्या.जवळपास सहा महिन्यांपासून

देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा,हे बंगालसाठीच पूर्णवेळ देत होते.गेली काही महिने तर ते बंगालमध्येच

तळ ठोकून होते. देशभर कोरोनाने थैमान घातलं असतानाही, पंतप्रधान आणि गृहमंत्री फक्त आणि फक्त

पं.बंगालची सत्ता काबिज करायचीच,या इर्षेने लढत होते…हे सगळं देशातीलच नाही तर जगभरातील जनतेने बघितलयं.

ही केवळ निवडणूक नव्हती. या निवडणुकीला amit shah and modi मोदी-शहाच्या भाजपाने पौराणिक

युध्दाचेच रूप दिले होते.अत्यंत आक्रमकपणे कथीत हिंदुत्त्वाचा प्रचार करण्यात आला.नंदीग्राम मधून ममता

दीदींना पराभूत करण्यासाठी भाजपाने दीदीच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्याला उभं केले.करोडो रूपये वाटले.

जाती-धर्माची नीच गणितं घातली.तरीही तृणमूल कॉन्ग्रेस २००पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे.

या निवडणूक निकालाने अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. कितीही पैसा खर्च केला,गुंडगिरी केली,दहशत निर्माण केली तरी,निर्णायक परिस्थितीत भारतीय मतदार विवेक दाखवतात,हे बंगालमधील मतदारांनी दाखवून दिले.amit shah and modi मोदी-शहा काहीही करू शकतात,हा भक्तांच्या भ्रमाचा भोपळा पुन्हा फुटला.


Get $50 off to buy Airdog Wearable Air Purifier Air Necklace

मोदी-शहांनी amit shah and modi अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ममता दीदींची टिंगलटवाळी केली.पंतप्रधानपदाला कमीपणा येईल, असंच मोदी वागले.आपण बंगालमध्येही तेवढेच लोकप्रिय आहोत असा त्यांचा भ्रम असावा. पण हा पोरकटपणा बंगालच्या मतदारांना रूचला नाही. त्यांनी मोदींना धडा शिकवला.

 

Also Read : https://postboxindia.com/corona-treatment-butterfly-touch-sameer-maniyar/

 

ही निवडणूक तृणमूल कॉन्ग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट झाली. प्रादेशिकतेचा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरला.कॉन्ग्रेस व कम्युनिष्टांची बहुतांश मते भाजपाकडे गेली. हिंदु मतांचे ध्रुवीकरण करून,एवढी अफाट ताकद लावल्यानंतर,भाजपाने ८० जागा मिळवणे अजिबात आश्चर्यकारक नाही.
पं.बंगालचा भारतीय जनता पक्षाचा पराभव हा amit shah and modi मोदी-शहांचा व्यक्तीश: पराभव आहे.सगळी कट-कारस्थानं,कुटनीती फसली.मतदारांनी भाजपाचा विषारी अंजेडा नाकारला.

तृणमुल कॉन्ग्रेसचा विजय हा ममता दीदींचा एकहाती विजय आहे.भाजपाच्या गुंडगिरीला,कुटनीतीला तेवढ्याच खंबीरपणे त्यांनी तोडीस तोड उत्तर दिले.भाजपाविरूध्द त्यांच्याच तोडीचे राजकारण करणे गरजेचं असल्याचे त्यांनी दाखवून दिलयं. विपरीत परिस्थितीतही त्यांनी बंगाली जनतेचा एवढा मोठा विश्वास संपादन केलाय ही मोठी गोष्ट आहे.या दृष्टीने तुलना केली तर बंगालमध्ये त्या मोदींपेक्षा कितीतरी अधिक लोकप्रिय आहेत.

भाजपाच्या कथीत हिंदुत्त्वाचं आक्रमण यशस्वीपणे थोपवल्याबद्दल त्याचं कौतूक करावं तेवढं कमी आहे. त्यांच्या या अभूतपूर्व विजयाने,मोदी-शहांच्या बेलगाम वागण्याला चाप बसणार आहे.त्यांच्या हूकुमशाही वृत्तीविरूध्द लढणाऱ्या सगळ्या लोकांना या निवडणूक निकालाने बळ प्राप्त झालं आहे.

एका टोकावरील केरळ आणि दुसऱ्या टोकावरील पं.बंगालने भाजपाच्या कथीत हिंदुराष्ट्राला जोरदार चपराक लगावली आहे. भारत हा भारतच राहील, याची ग्वाही देणारे हे निकाल आहेत.


Get $50 off to buy Airdog Wearable Air Purifier Air Necklace

 

 

महारुद्र मंगनाले

Postbox India

Advertisement

More Stories
Senior Citizen Idea of Time Bank
senior citizen Idea of Time Bank टाइमबँक भन्नाट कल्पना
error: Content is protected !!
%d bloggers like this: