Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Amruta fadanvis husband – देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र

1 Mins read

Amruta fadanvis husband – देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र

 

Amruta fadanvis husband – अनिरुद्ध मराठे यांनी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं खुलं पत्र

8/8/2021,

मा.देवेंद्र फडणवीस

आपणास हे एक पत्र. आपण वाचाल न वाचाल ईश्वरास ठाऊक पण मी माझे काम करतो आहे…!!
स.न.वि.वि.


Medex Supply - Better Prices for Better Quality

सर्वप्रथम Amruta fadanvis husband आपले हार्दिक अभिनंदन , आपली विरोधी पक्षनेता म्हणून निवड

झाली म्हणून..!! तसेच “मी परत येईन, मी परत येईन” असा कंठशोष आपण केलात पण या स्वरुपात

“परत येईन” असे तुम्हालाच काय पण मला पण स्वप्नात देखील वाटले नव्हते.

पण झाले ते चांगले च झाले. पण असे का झाले ह्याचा विचार देखील आपण करायला पाहिजे.

भाजप च्या पराभवास…होय पराभव..!! तुम्ही उगाच स्ट्राईक रेट वगैरे बोगस गोष्टी बोलत राहता पण

त्या बोगस आहेत हे शेंबडा पोर देखील सांगेल..!! कोणती कारणे आहेत याचा विचार तुम्ही करावात


Medex Supply - Better Prices for Better Quality

अशी इच्छा आहे पण आपण तो करताना दिसत नाही म्हणून मी च तुम्हाला मदत करतो.

हा भाजपचा पराभव कसा हे हे सर्वप्रथम आपण बघू. शतप्रतिशत भाजप ही आपली आणि अमित शहांची घोषणा

होती पण तरीही लोकसभेला आणि विधानसभेला आपण शिवसेनेशी युती करायला गेलात हा पहिला पराभव.

कारण शिवसेनेशी आपण युती करता याचाच अर्था या युतीशिवाय सत्तेचे गाजर खायचं सोडा पण दिसणार पण

नाही याची स्पष्ट जाणीव आपल्याला होती म्हणून हा पराभव..!!


Medex Supply - Better Prices for Better Quality

निवडूक काळात आपण जी मेगाभारती केलीत. हा दूसरा पराभव..!! मेगाभरतीत कोणते नमुने आपण घेतलेत ते

जरा बघू. पद्मसिंह पाटील आणि त्यांचा मुलगा, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा, बबनराव पाचपुते, नारायण राणे

आणि त्यांचे दोन्हीही पुत्र ज्यातल्या एका पुत्राने तुम्ही नेतृत्व करीत असलेल्या प्रशासनाच्या अधिकार्‍याची धिंड काढली होती..!! राधाकृष्ण विखे पाटील जे गेली ४ वर्षे विरोधी पक्षनेते होते आणि ज्यांनी गेली ४ वर्षे सभागृहात आपला विरोध केला..!!

मेगाभारती हा पराभव अशासाठी होता कारण मेगाभारती मधून दोन गोष्टी शाबीत झाल्या की या कोंग्रेसी नेत्यांच्याशिवाय आपण निवडणूक लढवू शकत नाही – म्हणजेच भाजप चा महाराष्ट्रात विस्तार फार च मर्यादित आहे नि एका विशिष्ट समहाच्या पुढे हा पक्ष जात नाही. जायचे असेल तर लोक आयात करायला लागतात. दुसरी गोष्ट ही की सत्ता समोर आली की साधन शुचिता गेली तेल लावायला हे भाजप चे धोरण आहे. येन केन प्रकरणे सत्ता पाहिजे बाकी काहीही नाही. हे आपण सिद्ध केलेत


Quality Medical Supplies at the Lowest Prices!

नंतर प्रचारा मध्ये आपली जी भाषा होती ती भाषा म्हणजे अजून एक पराभव होता. आमच्यासमोर विरोधी पक्षाचा पैलवान च नाही, पवार पॅटर्न संपला, पवार म्हातारे झाले.असे च तुम्ही म्हणालात असे नाही पण अनेक विधाने अशी होती की ज्याच्यातून तुम्ही हे च म्हणत आहात असे स्पष्ट जाणवत होते. निवडणुकीनंतर वंचित चा विरोधी पक्षनेता होणार अशी विधाने जी तुम्ही केलीत ती अहंकार युक्त, उर्मट, मदा ने भरलेली आणि एखाद्या उन्मत्त हत्तीने जसा आरडा ओरडा करावा अशी होती. तुम्ही इतके उद्धट आणि अहंकारी असाल याची माला कल्पना नव्हती. “विद्या विनयेन शोभते” असे जसे म्हणतात त्याच प्रमाणे “सत्ता विनयेन शोभते” हे देखील खरे आहे. एकीकडे तुमचे नायक मोदी मी जनतेचा नोकर आहे असा मानभावी आव आणतात आणि दुसरीकडे आपण एवढ्या अहंकाराने जनतेत प्रकट होता – याची सांगड घालायची कशी..?? १५ वर्षे सत्तेत राहिल्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक जसे माजले होते ना अगदी तसेच तुम्ही ५ वर्षांच्या सत्तेत माजलात. आपले जे वर्तन होते त्यानी मला कुटुंबात एखादा लाडावलेला मुलगा असतो ना जो काहीही बरळतो, कसाही वागतो त्याची आठवण झाली..!! बाकी तुम्ही भाजप मधले लाडावलेले मुल आहात यात काहीही शंका नाही. ज्याप्रमाणे आपण एकनाथ खडसे यांच्या सारख्या नेत्याशी वर्तन केलेत – त्यांचा जसा पत्ता कट केलात हे बघून मला तरी असेच वाटते की आपण भाजपात फार लाडवलेले आहात पण त्यामुळे लडवलेला मुलगा जसा कसलाही पाचपोच नसलेले वर्तन करतो तसे आपले वर्तन होते..!! हा अजून एक पराभव.

निवडणुका झाल्यावर ३० वर्षे ज्यांची साथ होती अशा शिवसेनेबरोबर आपले जे वर्तन होते ते तर एक राजकरणी म्हणून आपला मोठा पराभव होता. माझे स्वत:चे असे म्हणणे आहे की “politics is an art of possibilities..!!”


Quality Medical Supplies at the Lowest Prices!

समर्थ रामदास राजकराण या समासात म्हणतात

“मुख्य हरिकथा निरूपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते सावधपण | सर्व विषयी || जाणावे परांचे अंतर | उदासीनता निरंतर | नीतीन्यायासी अंतर | पडोच नेदावे || उपाधीसी विस्तारावे | उपाधीत न सांपडावे | नीचत्व पहिलेच घ्यावे | मूर्खपण || तरहे (tarhe) भरोच नये | सुचावे नाना उपाये | नव्हे तेची करावे काये | दीर्घ प्रयत्ने ||

आता आपल्या सत्ता संपदानाच्या राजकरणात यातली नेमकी कोणती गोष्ट होती..??

आपण ज्या मातृसंस्थेतून आलात त्या संस्थेविषयी असे म्हटले जाते की तिथे काम करणारे लोक देशासाठी, हिंदूंसाठी, राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करतात पण आपण अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा त्याग करायला तयार नव्हतात..?? आपण गणवेश घालून दसर्‍याच्या संचलनात सहभागी होता पण त्याग वगैरे या गोष्टी कुठेच दिसत नाहीत.!! आणि हे केवळ ५ वर्षांच्या सत्तेनंतर..?? ७०वर्षे सत्तेत असता तर काय केल असत..??

शिवाय आपली ही वर्तणूक मित्रा पक्षाबद्दल ज्याच्या बरोबर आपण ३० वर्षे घरोबा केलात मग इतरांचे काय..!?


Quality Medical Supplies at the Lowest Prices!

त्याच्यानंतर जेव्हा आपण अजित दादांबरोबर गेलात तो म्हणजे निर्लज्जपणाचा कळस होता…!! ज्यांच्यावर आपण भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, ज्याच्या विरुद्ध आपण गाडीभर पुरावे देणार होतात त्यांच्या बरोबर सत्तेची शय्या सजवताना मनाला जरा ही लाज वाटली नाही..?? आणि ते ही सगळं चोरी छुपे..?? आता काय तोंडांनी आपण विधानसभेत अजित पवारांच्या विरोधात बोलणार आहात…??

ते औटघटकेच सरकार पडल्यावर खरे तर आपण असे म्हणायला हवे होते की “माझी चुक च झाली – असे करायला नको होते…!!” असे म्हटले असते तर लाज थोडी बहुत वाचली असती पण आपण पत्रकार परिषदेत म्हणालात की आम्ही पक्ष फोडा फोडीत नाही. काय बोलताय..?? जनता एवढी मूर्ख आहे असे समजलात की काय?


Quality Medical Supplies at the Lowest Prices!

त्यानंतर आपले विधांनसभेतले वर्तन पहिले “रेटून न्यायचय का?

रेटून न्यायचय का? रेटून न्यायचय का? मग मी बाहेर जातो!” आपण विधान सभा अध्यक्षांशी बोलत होतात. आपण Amruta fadanvis husband माजी मुख्यमंत्री आहात आणि विरोधी पक्षनेते आहात वास्तविक आपण बोलायला उभे राहिल्यावर सभागृह आपोआप शांत झालं पाहिजे एवढा नैतिक वचक आपण निर्माण केला पाहिजे. याउलट आपले वर्तन लपाछपित सतत राज्य येणारा पोरगा जसा बालसुलभ भांडण करून ओरडतो तसे वाटले. निदान आपण माजी मुख्यमंत्री आहात याचे तरी भान असू देत की!

आपले वर्तन अत्यंत बालिश आहे “अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय” असे बालिश बोलणे या सभागृहाने पाहिले आणि त्यावर कितीतरी लोकांनी आपली खिल्ली उडवली पण आपण काहीही शिकलेले दिसत नाही!


Medex Supply - Better Prices for Better Quality

काय कारण असावे याचे? माला तरी केवळ एक च कारण दिसते आणि ते म्हणजे आपण भाजप चे लाडावलेले बालक आहात त्यामुळे तुमचे सगळे बालहट्ट, सगळ्या बालिश क्रीडा भाजप च्या नेतृत्वाकडून खपवले जात आहेत.

पण जनता बिनडोक नाही – आशा आहे की जसे आपण वयाने वाढला आहात तसेच वर्तणूकीने, बोलण्या चालण्याने पण मोठे व्हाल..!! शुभेछा…!!

तळटीप – आत्तापर्यंत महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री सत्तेवरून पायउतार झाले त्यातील सर्वात “Hated” Amruta fadanvis husband मुख्यमंत्री आपण आहात याची देखील जाणीव असू दे…!!


Medex Supply - Better Prices for Better Quality

अनिरुद्ध मराठे

Leave a Reply

error: Content is protected !!