Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Asha bhosale – हात नगा लावू माझ्या साडीला !

1 Mins read

Asha bhosale – हात नगा लावू माझ्या साडीला !

Asha bhosale – गाणे… अन् बरेच काही !!

 

 

8/8/2021

गाणे… अन् बरेच काही !!


2Game - Official Authorised Digital Retailer

हृदयनाथ मंगेशकर हे त्यांच्या घरात लाडके ! त्यांना सवय होती की जेवायला बसण्यापूर्वी व नंतर हात धुतले की ते माई मंगेशकरांच्या पदराला हात पुसत , लग्नानंतर पदराला हात पुसण्याचा शिरस्ता कायम राहिला फक्त पदर आईच्या ऐवजी पत्नीचा म्हणजे भारती मंगेशकरांचा झाला.

शांताबाई शेळके ह्या मंगेशकरांना जवळच्या, एकदा मंगेशकरांकडे कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने शांताबाईंना भोजनाच आमंत्रण होतं. कार्यक्रम म्हणून भारतीताईं कशिदाकाम केलेली रेशमी साडी नेसल्या होत्या; हृदयनाथांबरोबर शांताबाई जेवायला होत्या, हृदयनाथांचे जेवण आटोपल्यावर त्यांनी हात धुतले आणि शिरस्त्याप्रमाणे हात पुसायला मोहरा भारतीताईंकडे वळवला आता नवी साडी खराब होईल म्हणून “माझ्या साडीला हात पुसू नका” असं भारतीताईं सांगत होत्या तरीही हृदयनाथ त्यांच्या रोखाने जायला लागले मग भारतीताईं पुढे धावताहेत आणि हृदयनाथ लंगडत मागे असा पकडापकडीचा खेळ तिथे उपस्थित असलेल्या शब्दसम्राज्ञी शांताबाईंनी पाहिला आणि तिथल्या तिथे गाण जन्माला आल……।


2Game - Official Authorised Digital Retailer

रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला!

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला!

जात होते वाटंनं मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला?
हात नगा लावू माझ्या साडीला!

भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला!


2Game - Official Authorised Digital Retailer

एका कार्यक्रमाला ही गोष्ट सांगतांना Asha bhosale आशाताईं भोसले म्हणाल्या की मग त्या गाण्याला दीदीने चाल लावली, एके दिवशी मला दीदीने बोलवलं आणि सांगितलं आशा तुझ्यासाठी एक गाण बसवलय मग तिने ते मला गाऊन चाल शिकवायला सुरवात केली , तिच्या स्वभावाप्रमाणे अगदी मृदुमुलायम चाल! मी तिला म्हटल दीदी ही लावणी आहे की भजन ? मग दीदी म्हणाली, मी अशी चाल लावली आहे तुला गायचं तस गा मग एवढा privilege मिळाल्यावर आवश्यक बदल ,लावणीचा बाज ठेवत पहिल्या कडक ढोलकीसकट एक फर्मास अजरामर लावणी Asha bhosale आशा ताईंनी सादर केली.
अशी एक अजरामर लावणी तयार झाली.


2Game - Official Authorised Digital Retailer

Leave a Reply

error: Content is protected !!