Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

The Kerala Story Film Download – केरला स्टोरी

1 Mins read
  • The Kerala Story Film Download - केरला स्टोरी

The Kerala Story Film Download – केरला स्टोरी 

 

“केरला स्टोरी” या चित्रपटाची गेले पंधरा दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारे होणारी चर्चा कानावर येत होती. आज मी ठरवून चित्रपट पाहून आले. चित्रपट पाहून आल्यानंतर माझी मनस्थिती व्दिधा होती.कोण दोषी पालक का मुले. यातून मी काढलेला निष्कर्ष म्हणजे मुले दोषी आहेत.

शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुण मुली शिक्षण सोडून नाही ते उद्योग करत असतात. खरे तर काही लोक याला पालकांचा आणि संस्काराचा दोष देतात. परंतु ही गोष्ट मी कधीही मान्य करणार नाही. कारण कुठलेही आई-वडील मुलांना वाईट गोष्टी किंवा वाईट संस्कार करत नसतात. सोळावे ,सतरावे वय हे गाढव वय असतं. या वयात प्रेमात पडलेली मुले ताळतंत्र सोडूनच वागतात. त्यांना चांगल्या वाईट गोष्टीतला फरकच समजत नाही. आपण काय करतोय ,याचा काय परिणाम होणार आहे, याच्या विचाराच्या पलीकडे ते गेलेले असतात.अक्षरश: ते आंधळे झालेले असतात.

एखाद्या मुलाच्या प्रेमात पडल्या नंतर तो कोण ,कुठला ,जात , धर्म काहीच पाहिले जात नाही. जन्म दिलेल्या आई-वडिलांवर याचा काय परिणाम होईल , नातेवाईक, समाज या कशा कशाचा विचार ही मुले करत नाहीत .सिनेमा, सिरियल व साहित्य मनाला आकार व दिशा देत असते. या संवेदनशील वयात माता पित्याने निरोगी, निकोप व स्पष्ट संवाद करणेही गरजेचे असते. प्रत्येक माता पित्यांना आपले बाळ लहान आहे, असाही भ्रम असतो. शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, परदेशातील शिक्षण हेच श्रेष्ठ ज्ञान आहे व त्या मार्गाने जाणे म्हणजेच प्रगती, असे काही पालक समजत आहेत. शाळेतील गुणपत्रक, पदवी – पदाचे कौतुक व मिळकतीची प्रतिष्ठा मिरविण्यातच आमची मती निघुन गेली आहे.

घाम गाळून पालक शाळा काॅलेजची फी भरतात मुलांच्या खाऊचे डबे भरण्यात आई कधी थकत नाही. कर्ज काढून लग्न करण्याची तयारी पालक ठेवतात. पण बाळानो, तुम्ही मात्र आपल्या पालकांना दु:खाच्या नरकात ढकलून प्रेमाच्या भयंकर चक्रयुव्हात अडकत चाललात. सरकारने मुलींना मुलाइतके हक्क देऊ केले. पण कर्तव्याची जाणीव कोठे करून दिलीच नाही.मुलीला स्कुटी चालवायला शिकविली, पण काठी चालवायला नाही शिकविली. साडी घालणार्‍या मुलीना काकुबाई म्हणून हिणवीले.

कुंकु, मंगळसूत्र गुलामीचे चिन्ह झाले. लिव्ह इन रिलेशनशिप सारखे पशूवत वागणे आवडू लागले. यामुळे शेकडो हजारो मुली जीवनातून उध्वस्त होत आहेत. आपण मात्र त्यांच्यासाठी कांहीच करु शकत नाही.केवढिही शोकांतीका.

या चित्रपटाची कथा खुप वास्तववादी आहे.वेगळ्या धर्माच्या मुलाशी लग्न केल्यानंतर मुलींच्या आयुष्याची काय परवड होते हे खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलेले आहे. यामध्ये मी तरुण मुलींनाच दोष देते. खेड्यापाड्यातले पालक काबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिकण्यासाठी शहरात ठेवतात.

ही मुले काय करतात ते पालक पाहू शकत नाहीत.शिक्षणासाठी लागणारा पैसा काबाडकष्ट करून उपलब्ध करून देतात.पालक बिचारे वेड्या आशेवर असतात की आपली मुले चांगले शिक्षण घेऊन पुढे काहीतरी चांगले करतील.

त्यांचे आयुष्य घडेल .त्यातली काही मुले मी हे वाक्य जबाबदारीने लिहिले आहे .काही मुली अशा प्रकारे वाहवत जातात. खरेतर तरुण पिढीने आपल्या पालकांचा विचार करायला पाहिजे. कोणत्या चित्रपटाला किंवा कोणत्या पक्षाला दोष देण्यात काही अर्थ नाही. पक्षाने प्रचारासाठी हा चित्रपट बनवलाय हे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे.यातले वास्तव केवळ लक्षात घ्यायचे आहे.

हा चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच तरुण मुली ,त्यांचे पालक नक्कीच सावध होतील आणि आपल्या मुलींना या सर्व गोष्टी पासून परावृत्त करतील. मुली ही विचार करतील की अशाप्रकारे वेगळ्या धर्माच्या मुलांच्या प्रेमात पडले तर काय होऊ शकते? हे या चित्रपटाच्या माध्यमातून पालकांच्या आणि मुलींच्या मनावर नक्कीच चांगले परिणाम होतील . चित्रपटातील काही आकडेवारी चुकीची असू शकते परंतु पूर्णतः चित्रपटच खोटा आहे हे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. कारण राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रूपाली ताई चाकणकर वेळोवेळी मुलींच्या बेपत्ता होण्याच्या बातम्या पेपरला देत आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्यात अडीच हजार मुली फक्त पुण्यातून बेपत्ता झाल्या आहेत.ही आकडेवारी आपण कशी खोटी ठरवू शकतो. मला वाटते समाजाने कोणत्याही गोष्टीचे राजकारण न करता वास्तव काय आहे हे नेहमी पहावे ,समजून घ्यावे. प्रत्येकच गोष्टीचे राजकारण करून कसे चालेल.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महान आणि तेजस्वी कार्य या वयातच केले होते. शंभू महाराजांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन आपले कार्य सुरू केले .त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊंचे वय ते काय असेल.महाराणी येसूबाई राणीसाहेब स्वराज्यासाठी २९ वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या. आपण कमीत कमी आपल्या आई-वडिलांसाठी तरी सुरक्षित रहा. महाराणी ताराराणी २५ व्या वर्षी हातात तलवार घेऊन स्वराज्य रक्षणास तयार झाल्या आणि सात वर्ष औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूला लढत दिली. आपला शौर्यशाली इतिहास आपण डोळ्यासमोर न ठेवता नको त्या गोष्टी करून आयुष्य उध्वस्त करून घेतो आहोत.

चांगले संस्कार याच वयामध्ये होतात. आयुष्याची वाट लागायलाही हेच वय असतं .वाईट लागलेल्या सवयी निघत नाहीत. आपल्या आयुष्याचे सोने करायचे का माती करायची ते आपणच या वयात ठरवायचे असते. चकाकणारी प्रत्येकच गोष्ट सोने नसते.प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोन्यासारखी वाटते .कदाचित ती गोष्ट अनुकुचीदार काच असू शकते.ही काच लागून आपल्याला जखम होईल व त्या जखमेचे गॅंग्रीन होऊन आपले आयुष्य संपून जाईल हे का आपल्याला समजत नाही.आपल्या संवेदना बधीर झाल्या आहेत काय? आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे अगोदर आपण ठरवा आणि तसे वागा.

मी काही मुली अशा पाहिल्या आहेत त्या आपल्या टीनपाट प्रियकरासाठी आपल्या आई-वडिलांना पोलीस स्टेशनला बोलवून घेतात आणि आम्हाला यांच्यापासून धोका आहे म्हणून पोलिसांकडे कंप्लेंट करतात.यावेळेस या मुलांनी लाज ,अब्रू , शरम गुंडाळून ठेवलेली असते.

हा चित्रपट पाहून आल्यानंतर एक जरी मुलगी या प्रकारापासून वाचली तर किंवा हे कसे चुकीचे आहे एवढा तरी विचार करून त्या गोष्टीपासून ती परावृत्त झाली तर ते या निर्मात्याचे आणि दिग्दर्शकाचे यश आहे असे मी मानेन.

( ही पोस्ट लिहिताना एक गोष्ट मला वारंवार जाणवत होती ती ही की ज्या आईने नऊ महिने मुलांना पोटात ठेवून त्रास सहन केला .मूल जन्मल्यानंतर त्याला वाढवताना माता पित्याला किती त्रास सहन करावा लागला हे सर्व विसरून ही मुले कोणाच्यातरी प्रेमात पागल होऊन आपले व आपल्या आई-वडिलांचे आयुष्य उध्वस्त करतात काय म्हणावे या मुलांना )

( ही पोस्ट लिहिण्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नाही.)

डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर, 

Leave a Reply

error: Content is protected !!