indira gandhi photo – प्रियदर्शिनी अर्थातच इंदिरा गांधी
भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती indira gandhi इंदिरा गांधीजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
प्रियदर्शिनी अर्थातच indira gandhi इंदिरा गांधी यांचा आज स्मृतिदिन. जन्म १९ नोव्हेंबर १९१७
जब भी जुल्म ने देशभक्ती का हमसे हिसाब लिया है ॥
हमने अपना लहू देकर वतन को इन्कलाब दिया है॥
या जगामध्ये अशा फारच कमी व्यक्ती होऊन गेल्या की ज्यांनी अधिकृतरित्या या जगाचा भूगोल बदलला व एका आतंकवादी देशाला अद्दल घडवली…..
असेच एक व्यक्तिमत्व या पवित्र अशा भारतभूमीमध्ये जन्मले…..
व देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळवला……
त्या म्हणजे स्वर्गीय indira gandhi इंदिरा गांधी. अनुचाचणी असो’
बांगलादेश या देशाची पाकिस्तानला तोडून निर्मिती असो ‘ बँकांचे राष्ट्रीयीकरण असो’
देशात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राच्या मागे भक्कम पाठबळ उभे करणे असो…..
असे एक ना अनेक निर्णय या आयर्न लेडीने घेतले …..
व या देशाला पाश्चिमात्य देशांच्या डोळ्यात डोळे घालून बोलता येईल एवढे सामर्थ्य देशात निर्माण केले…. कोळसा ‘ टेक्सटाईल ‘ काॅपर क्षेत्रात भारताला सक्षम करणे असो .
हे सर्व indira gandhi इंदिराजींनी केले …..
इतिहासात अनेक मोठ्या लोकांचे कडून चुका झाल्या त्याला इंदिराजीही अपवाद नाहीत ,पण त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची आठवण ठेवणे गरजेचे आहे*.
बांगला देश मुक्ती हे मोठे कर्तुत्व .त्यामुळे भारताची एक तरी सीमा सध्या शांत आहे,
बांगला देश मुक्तीचे वेळी त्यांनी परराष्ट्रविषयक धोरणाने अमेरिकेलाही अचंबित केले,
रशियाबरोबर मैत्री करार हा मोठा झटका त्यांनी अमेरिकेला दिला
लोक गमतीने म्हणत कॉंग्रेस मध्ये एकच पुरुष होता तो म्हणजे इंदिराजी.
संस्थानिकांचे तनखे असोत बँकांचे राष्ट्रीयकरण असो त्यांचे निर्णय आज खूपच चांगले ठरत आहेत .
आणीबाणीचा डाग मात्र त्यांचे कारकीर्दीवर पडला .
त्यांच्यातील तडफ मुत्सद्दी पणा निर्णयशक्ती चालण्या बोलण्यात असलेला आत्मविश्वास त्यांच्या वारसदारांकडे असती तर आजचे दिवस पक्षाला आले नसते
ऑप्रेशन ब्लू स्टार मुले त्यांचे जीवन धोक्यात आले .शेवटच्या क्षणी सुद्धा त्या धीरोदात्त होत्या .
या जगात भारताला मान ताठ करुन जगायला शिकवणाऱ्या या भारताच्या रणरागिनीला…..
आपले कणखर व्यक्तिमत्व आणि धाडसी नेतृत्वामुळे
‘आयर्न लेडी ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ जागतिक राजकारणात आपला स्वतंत्र ठसा निर्माण करणाऱ्या देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती indira gandhi इंदिरा गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन ‘