Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

best vaccine कोरोना संक्रमणावर जगात या सर्वाधिक प्रभावी वॅक्सीन उपलब्ध आहेत.

1 Mins read

best vaccine कोरोना संक्रमणावर जगात या सर्वाधिक प्रभावी वॅक्सीन उपलब्ध आहेत.

 

best vaccine वॅक्सीन बद्दल आपल्याला ही माहिती आवश्यक आहे.

12/6/2021,

कोरोना

विषाणू आणि त्याचे उगमस्थान हे चीन आहे याबाबत जगात कोणत्याही देशाचे दुमत नाही, हा न दिसणारा विषाणू मानवी शरीराला

फक्त अपायकारकच ठरला नाही तर त्याने संपूर्ण जगात मृत्यूचे तांडव केले.करोनाने जगात हाहाकार केला आहे. दुसऱ्या लाटेत जगात

चक्क मृत्यू तांडव सुरु होता. अजुनही संपुर्ण जग करोनाचा सामना करत आहे. करोनाचा फैलाव सर्वात आधी चीनमध्ये झाला होता.

त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून करोना विषाणूने जगभरात विनाश केला आहे. करोनामुळे आतापर्यंत जगभरात कोट्यावधी लोकांना संसर्ग झाला आहे

आणि लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु आतापर्यंत जगाला या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही, करोना विषाणूची उत्पत्ति कशी झाली ?

दरम्यान, जगाला संशय असलेल्या चीनच्या वुहानमधील त्याच प्रयोगशाळेत करोना विषाणू बनविला गेला होता, आता अमेरिकन प्रयोगशाळेच्या अहवालानेही यावर शिक्कामोर्तब केला आहे.

कोरोना आणि त्याचे बदलते व्हेरियंट यामुळे या विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी कोणती best vaccine लस प्रभावी ठरेल किंवा

अशा लशीचा दुष्परिणाम तरी होत नाही ना असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उभे राहत असताना जगात वेगवेगळ्या दर्जेदार वैद्यकीय क्षेत्रात

संशोधन करणाऱ्या संस्थाचे best vaccine वॅक्सीन बाजारात उपलब्ध आहेत आणि नाहीत पण . मग अशावेळी जगातील सर्वात विश्वासार्ह वॅक्सीन

बनविणाऱ्या कंपनी आणि त्यांची माहिती आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

चीनमधून उगम पावलेल्या करोना विषाणूनं बघता बघता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं.

संपूर्ण जगात आतापर्यंत १७ कोटी ५२ लाख ६३ हजार ४१७ जणांना करोनाची लागण झाली आहे.

करोनामुळे जगात आतापर्यंत ३७ लाख ७९ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ कोटी ८७ लाख ९३ हजार ९८५ जणांनी करोनावर मात केली आहे.

वर्ल्डोमीटर या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. करोनाचा वेग पाहता जगभरातून करोनारुपी

राक्षसाला दूर ठेवण्यासाठी best vaccine लस हवी असा एकसूर उमटला होता. शास्त्रज्ञांनी दिवसरात्र

एक करून करोनावरील best vaccine लसींचा शोध लावला. त्यानंतर जगभरात करोना लसीकरण सुरु झालं आहे.

विकसित देशात दररोज लाखो लोकांचं लसीकरण होतं आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ज्या लशीं प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे त्या पुढीलप्रमाणे .

मॉडर्ना- फायझरसारखेच या best vaccine लसीचे दोन डोस देणं प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे.

करोनाच्या यूके व्हेरिएंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट आणि ब्राझील व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन- ही जगातील एकमात्र अशी लस आहे. त्याचा एक डोस पुरेसा असल्याचं सांगण्यात येत आहे.

करोनाच्या यूके व्हेरिएंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट आणि ब्राझील व्हेरिएंटवर याची मात्रा लागू होतेय.

मात्र B117 आणि P1 वर तितकी प्रभावी नसल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

सायनोवॅक बायोटेक- ही चीनी बनावटीची लस आहे. या लसीचे दोन डोस प्रभावशाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

करोना विषाणूविरोधात ५० टक्के प्रभावशाली असल्याचं दिसून आलं आहे.

नोवाव्हॅक्स- या लसीचे सुद्धा दोन डोस प्रभावी ठरत आहेत. ही लस ८९ टक्के कार्यशील असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

यूके आणि ब्राझील व्हेरिएंट ही लस प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

कोविशिल्ड- ही लस ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे.

या best vaccine लसीचे ठराविक अंतराने दोन डोस दिले जात आहेत. यूके व्हेरिएंट (B117) आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट (B1351) वर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारत सरकारने या लसीला मान्यता दिली आहे.

कोव्हॅक्सिन- ही स्वदेशी लस आहे. भारत बायोटेकने या best vaccine लसीची निर्मिती केली आहे. या लसीचे दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरत आहे. ही लस यूके व्हेरिएंटसह अन्य व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. या लसीला भारतात मान्यता देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. सध्या या लसीचं २ ते १८ वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

स्पुटनिक व्ही- ही रशियन बनावटीची लस आहे. करोनावरील सर्वात प्रथम मान्यता स्पुटनिक व्ही लसीला मिळाली होती. त्यानंतर रशियात लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जात आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे. भारतातही या लसीला मान्यता देण्यात आली आहे.

फायझर बायोएनटेक- या लसीचे दोन डोस प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. करोनाच्या यूके व्हेरिएंट, दक्षिण आफ्रिका व्हेरियंट आणि ब्राझील व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. ही best vaccine लस ९५ टक्के प्रभावी असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

देशात आतापर्यंत तीन लशींना मान्यता देण्यात आली आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचा समावेश आहे. आतापर्यंत देशात २४ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात करोना विषाणूचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिका प्रशासन करोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लशीचे ५० कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकन माध्यमांनी याचा खुलासा केला.

देशात गेल्या २४ तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

error: Content is protected !!