bhagat sing
bhagat sing
bhagat sing

bhagat sing – देशप्रेमी भगतसिंह

bhagat sing - देशप्रेमी भगतसिंह यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

bhagat sing – देशप्रेमी भगतसिंह

 

 

bhagat sing – देशप्रेमी भगतसिंह यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

 

 

 

 

23/9/2021,

भगतसिंगचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते.

ज्यावेळेस त्यांच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली, त्याच सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला.

त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्यआंदोलनात सामील झाले होते, तर काही महाराजा रणजित सिंगाच्या सैन्यात होते.

त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय होते. त्याचे आजोबा अर्जुनसिंग हे स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदु सुधारणावादी चळवळीत

असून आर्य समाजाचे सदस्य होते.त्यांचे वडील व काका हे करतार सिंग साराभा व हरदयाल ह्यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते.

त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखे ते लाहोरच्या खालसा हायस्कूल येथे गेले नाही. त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकारप्रती असलेली निष्ठा मंजूर नव्हती.

बारा वर्षे वय असताना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली. १४ वर्षे वय असतांना गुरुद्वारात नानकाना साहेब येथे

अनेक लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या आंदोलनात ते सामील झाले.

गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर त्यांचा अहींसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिरास झाला. त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाले,

व ब्रिटीश सरकारचा हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठीच्या विचाराचा समर्थक झाले.

ईटालीच्या जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग ईटाली’ नावाच्या गटापासुन प्रेरीत होऊन सिंगने मार्च १९२६ मध्ये ‘नवजवान भारत सभा’ स्थापित केली.

ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लीकन संघाचा सदस्य झाला, ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिसमील, शहिद अशफाखल्ला खान सारखे दिग्गज होते.

नंतर एक वर्षाने, व्यवस्था विवाह टाळण्यासाठी तो घर सोडुन कानपुरला निघुन गेले. एका पत्रात त्याने लिहीले ‘माझ जिवन हे सर्वोत्कृष्ट कामासाठी मी समर्पीत केलय,

जे की देशाचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा भौतीक सुख मला आमि़ष करु शकत नाही’

bhagat sing भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे ‘बंदी जीवन’ हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे.

त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते.

जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते.

त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

वक्ते, पत्रकार, अनुवादक आणि नाट्याभिनेते भगतसिंग हे उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते ‘अकाली’

या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले.

तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला.

महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात ‘नॅशनल कॉलेज’ तर्फे

पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी ‘राणा प्रताप’, ‘दुर्दशा’,’ सम्राट चंद्रगुप्त’ या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या;

पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली. स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकार्य ९ सप्टेंबर १९२५ रोजी bhagat sing भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त

संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची

जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर ‘आर्मी’ हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले.

हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे ‘मुख्य सेनापती’ तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक

अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना केली.

खून करून, दरोडे घालून वा चार इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपहास वा धिक्कार केला गेला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे

साक्षात राजसत्ता उलथून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्यसमर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र हॊय.

“वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकार्‍यांसह १९२४ सालापासून

ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा

धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि

दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.

हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून ही उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’

व ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या संस्थांची स्थापना केली.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या

हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली . हत्या 17 डिसेंबर 1928 रोजी झाली होती त्यावर खटला चालवण्यात आला

आणि त्याच्या अखेरीस 23 मार्च 1931 रोजी bhagat sing त्यांना फासावर लटकवण्यात आले

अशा या थोर देशप्रेमी भगतसिंह यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

Also Visit : https://www.postboxlive.com

 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Gwalior
Gwalior – सिंधिया राज्याचे शेवटचे महाराजा
error: Content is protected !!
%d bloggers like this: