patangrao kadam विजयमाला पतंगराव कदम
patangrao kadam विजयमाला पतंगराव कदम
patangrao kadam विजयमाला पतंगराव कदम

patangrao kadam – विजयमाला पतंगराव कदम

patangrao kadam - वहिनीसाहेब जन्मदिनानिमीत्त हार्दिक शुभेच्छा

Patangrao kadam – विजयमाला पतंगराव कदम

 

Patangrao kadam – वहिनीसाहेब जन्मदिनानिमीत्त हार्दिक शुभेच्छा

 

 

 


Gretchen Handtaschen

 

डेक्कन जिमखाना पुणे येथील बी.एम.सी.सी. कॉलेज समोरील सिंहगड इमारतीतील कै.माननीय डाॅ. पतंगराव कदम साहेबांचे निवासस्थान बहुतांशी लोकांच्या परिचयाचे आहेच.

सकाळपासून रात्रीपर्यंत सतत राजकीय पुढारी ,कार्यकर्ते ,संनदी अधिकारी, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी ,यांनी गजबजलेले असायचे.

आता साहेब जरी गेले असले तरी patangrao kadam साहेबांच्या कर्तुत्वाचा वसा घेऊन नामदार डॉक्टर विश्वजीत कदम ऊर्फ बाळासाहेब आणि आदरणीय वहिनीसाहेब

यांनी तेवढ्याच ताकदीने पुढे चालवलेला आहे. जनतेच्या हितासाठी साहेबांनी जे काम केले तेच काम आता डॉक्टर विश्वजीत कदम साहेब करत आहेत.

समाजाच्या मनात वहिनी साहेबांच्या कार्याबाबत कृतज्ञतेची आदराची भावना नेहमीच सर्वांना जाणवत असते.


Gretchen Handtaschen

वहिनीसाहेब नेहमी ज्येष्ठ लेखक पु ल देशपांडे यांचा विचार सांगायच्या’ कृतज्ञता हे माणसाला लाभलेले सर्वात मोठे देणे आहे.

कृतज्ञतेइतके सुंदर जगात काहीच नाही.

आणि कृतध्नतेइतके कुरूप दुसरे काहीही नाही. त्यांना कृतघ्नते बद्दल अत्यंत चीड आहे .त्या नेहमी सांगतात दिलेले काम चोख व

प्रामाणिकपणे करा मी तुमच्या पाठीशी उभी आहे.वहिनीसाहेबांचे जीवन सामान्य स्त्रियांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल .त्यांनी समाजाला मंत्र दिलेला आहे

की न मावणारे दुःख नेहमीच जीवघेणे असते. कारण तुमचा जीव तेंव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. त्या माणसाने दुःखापेक्षा मोठे व्हायचे ध्वेय ठेवावे.

सर्वसामान्यांसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या कै.डाॅ. पतंगराव कदम patangrao kadam साहेब या अवलीया माणसाला संभाळणे तसे अत्यंत अवघड काम होते.

माणसांच्या गराड्यातून बाहेर पडून प्रापंचिक गोष्टीत साहेबांनी कधी वेळ दिला नाही. पण वहिनी साहेबांनी कधी त्याबद्दल तक्रार केली असे मला वाटत नाही .

पडद्यावरची भूमिका साहेब निभवायचे आणि पडद्यामागची भूमिका वहिनीसाहेब निभवत होत्या.


Gretchen Handtaschen

लोकोपयोगी कार्यात शक्य तेवढे वहिनीसाहेब यांचे योगदान आहे. वहिनीसाहेब यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व साहेबांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे असायचे.

वहिनीसाहेब हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व साहेबांच्या जीवनातील स्फूर्तिस्थान होते. संसाराची धुरा सांभाळताना त्यांनी कै. साहेबांना,

डाॅ.विश्वजित ऊर्फ बाळासाहेबांना ,डाॅ.अस्मिता ताईंना नेहमीच स्फूर्ती दिली. नावाप्रमाणे त्या साहेबांच्या जीवनात विजय- माला बनून राहिल्या होत्या.

कै.साहेबांच्या महत्त्वपूर्ण कार्यात वहिनीसाहेब यांचा सिंहाचा वाटा होता. आपण आज समाजामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रिया बघतो परंतु वहिनीसाहेब त्यागाच्या,

सहनशीलतेच्या व सेवाभावी वृत्तीच्या कणखर अशा एक स्त्री आहेत .कारण स्वर्गीय साहेबांनी जे भले मोठे काम उभे केले आहे

त्या कामात त्या नेहमीच साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असत. साहेब रात्रंदिवस राजकारण, मतदार संघ, भारती विद्यापीठ

विनाअडथळा काम करत राहिले ते फक्त आणि फक्त आदरणीय वहिनी साहेबांच्या पाठिंब्यामुळेच. कारण वहिनी साहेबांनी आपल्या


Gretchen Handtaschen

पतीला विनातक्रार जनकल्याणासाठी सुपूर्द केले होते.

ही गोष्ट साधी आणि सोपी तर नक्कीच नव्हती .साहेब नेहमीच कामाच्या व्यापात बाहेर असायचे .आपल्या मुलांचे शिक्षण संगोपन

अत्यंत चांगल्या रीतीने वहिनी साहेबांनी केले. भारती बाजार,भारती विद्यापीठ ,स्कूल कमिटी औद्योगिक संस्था ,कन्याशाळा

या संस्था त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने चालवल्या .अतिशय शिस्तप्रिय, व प्रेमळ मनमिळावू असणाऱ्या वहिनी साहेबांनी आपले वेगळेपण जपले आहे .

आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना कसा करायचा ,एक गृहिणी म्हणून वहिनी साहेबांना अत्यंत चांगल्या पद्धतीने अवगत होते .

वहिनी साहेबांनी आयुष्यामध्ये अनेक दुःख सहन केली .आपला तरूण मुलगा गमावण्याचे दुःख आणि कै. साहेबांच्या जाण्याने

तर त्या पुरत्या कोलमडून गेलेल्या मी पाहिल्या आहेत.गेली 20 वर्षे मी वहिनी साहेबांना अगदी जवळून पहात आले.

परंतु कै.साहेब गेल्यानंतरच्या वहिनी साहेब पाहताना जीव कातर कातर झाल्याशिवाय राहिला नाही. तमाम जनता ,

भारती विद्यापीठ दुखाच्या शोकसागरात बुडाले होते.परंतु त्यातूनही स्वतःला सावरून वहिनी साहेबांनी आपल्या लेकराला

सावरण्याचे त्याला मंत्री पदापर्यंत पोहोंचविण्याचे अत्यंत महत्वाचे व जनकल्याणाच्या हिताचे मोठे काम केले आहे.


Gretchen Handtaschen

भारती विद्यापीठासाठी मोठे योगदान देणाऱ्या वहिनीसाहेब या पलूस-कडेगावच्या जनतेच्यासुद्धा फार मोठ्या आधार आहेत.

संकट कोणतेही असो कितीही मोठे असो कुटुंब प्रमुखाची भूमिका वहिनी साहेबांनी अत्यंत खंबीरपणे निभावली आहे व निभावत आहेत.

ही महत्त्वाची भूमिका निभावत असताना ,साहेबांच्या अचानक जाण्याने ही मोगर वेल उन्मळून पडली आहे.

या वेलीला परत मांडवावर चढण्याचे बळ आई भवानीने द्यावे .हीच चरणी प्रार्थना करूयात.

आदरणीय वहिनीसाहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

आई जगदंबा आपणास उदंड व निरामय आयुष्य देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


Gretchen Handtaschen

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Advertisement

More Stories
suryaji kakade
suryaji kakade – सरदार सूर्याजी काकडे
error: Content is protected !!
%d bloggers like this: