Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

Bull Sangli सांगलीचा लाडका गजा बैलाचे निधन

1 Mins read

Bull Sangli सांगलीचा लाडका गजा बैलाचे निधन

 

Bull Sangli ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स’ ने नोंद घेतलेल्या सांगलीमधील गजा बैलाचं निधन

 

 

 

 

2/7/2021,

राज ठाकरे यांच्या लाडक्या जेम्स कुत्र्याचे निधन झाले तर त्या बातमी वर खूप हल्लकल्लोळ माजला,

ही काय पत्रकारिता वगैरे वगैरे अशा प्रतिक्रिया आल्या.

एखाद्या सेलिब्रिटी अथवा लोकनेत्यांच्या घरातील मुक्या प्राण्यांना फक्त त्या घरातील व्यक्तींचा च न्हवे तर तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लळा असतो.

आपसूकच असा प्राणी त्या सेलिब्रिटी किंवा लोकनेत्यापेक्षा सर्वात लाडका आणि ओळखीचा होतो. पोलीस डॉग स्कॉड असो किंवा रस्त्यावरती

भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाचा पोपट. मुक्या प्राण्यांच्या जाण्याने होणारे दुःख समजून घ्यायला पण काळीज लागते, आज Bull Sangli बैलाचे निधन झाले अशी बातमी

आली आणि ती सुद्धा महाराष्ट्रामधील मिरज तालुक्यातील कसबे डीग्रज गावामधील रहिवाशी असणाऱ्या कृष्णा साईमते यांच्या जगप्रसिद्ध गजा Bull Sangli बैलाचं निधन.

गजा Bull Sangli बैलाचं वय १० वर्ष ६ महिने. गेले कित्येक दिवस गजा आजारी होता. घरातल्यानी त्याची लहान मुलासारखी काळजी घेतली होती,

तरी सुद्धा त्याने शेवटी गोठ्यामध्ये प्राण सोडला. एक टन वजन, लांबीला दहा फूट आणि उंची सहा फूट असा भारदस्त गजाला देशातील सर्वात

मोठ्या आकाराचा Bull Sangli बैल असा मान सन्मान मिळाला होता. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही त्याची दखल घेतली होती.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात आणि खास करुन कर्नाटकमधील कृषी प्रदर्शनांमध्येही गजाने चांगलेच नाव कमावले होते.

गजा आपल्यातून गेला यावर साईमते कुटुंबाला अजूनही विश्वास बसत नाहीय. गजाला मालक असणारे कृष्णा तर आपल्या लाडक्या बैलाच्या

आठवणीनत हुंदके देत रडत आहेत. कृष्णाच नाही तर या Bull Sangli बैलाचा लळा लागलेले त्याचे सर्वच कुटुंबीय एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन

झाल्याप्रमाणे रडत आहेत. गजाची आई आणि पत्नी यांनी ही जोरजोरात रडून गाव गोळा केला होता.

गजाची काळजी घ्यायची आणि त्याला कृषी प्रदर्शनांमध्ये घेऊन जायचं हेच कृष्णाचं महत्वाचं काम असायचे.

तो अगदी गजाच्या रोजचा खुराक ते त्याच्या तब्बेतीसंदर्भातील सगळी काळजी घ्यायचा.

मात्र मागील १८ महिन्यांमध्ये करोना निर्बंधांमुळे कोणतीही कृषी प्रदर्शनं झाली नाहीत.

त्यामुळे गजा आणि कृष्णा हे घरीच होते. गजाच्या माध्यमातून होणारी साईमते कुटुंबाची कमाईही यामुळे थांबली.

मात्र असं असतानाही साईमते कुटुंबाने गजाला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड प्रेम केलं. त्याला कधीच खुराक कमी पडू दिला नाही.

गजाच्या जीवावर कृष्णाने एक पीकअप गाडी घेतली. गजाची ने-आण करण्यासाठी घेतलेल्या या गाडीचं कर्ज गजाच्या माध्यमातून झालेल्या कमाईमधूनच फेडलं.

काही दिवसांपूर्वीच गजाचे नोंद इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती. मात्र हा आनंद साजरा करण्याआधीच साईमते कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

आपल्या बैलावरील प्रेमापोटी आता साईमाते कुटुंबाने गजाच्या आठवणी अनोख्या पद्धतीने जपण्याचा निर्णय घेतलाय. गजाचा सांगाडा आम्ही जपून ठेवणार

असल्याचे साईमते कुटुंबिय यांनी सांगितले. गजा अगदी लहान वासरु असल्यापासून गावामध्ये गजा आणि कृष्णाची जोडी प्रसिद्ध होती.

हळूहळू गजा मोठा झाला तसं कृष्णाचं त्याची देखभाल करु लागला. मागील एका दशकाहून अधिक काळची त्यांची ही मैत्री गजाच्या मृत्यूनंतर संपली.

अगदी जीवापाड प्रेम केलेल्या Bull Sangli बैलाच्या अशा अचानक जाण्याचा मालक कृष्णाला मोठा धक्का बसला आहे.

बैलांना लळा लावून बसलेल्या अनेक मालकांच्या त्यांच्या जाण्यानंतर झालेल्या अवस्था आणि वेळ प्रसंगी मृत्यू सुद्धा

यावरच्या अनेक गोष्टी गावाकडच्या पाराखाली ऐकायला मिळतात.

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!