Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

bus conductor – कंडक्टरची मुलगी बनली आयपीएस ऑफिसर

1 Mins read

bus conductor – कंडक्टरची मुलगी बनली आयपीएस ऑफिसर

 

bus conductor – कंडक्टरची मुलगी बनली आयपीएस ऑफिसर

 

 

 

तिच्या नावानेच गुंड थरथर कापू लागतात.त्या मुलीचे नाव आहे. शालीनी अग्निहोत्री. तिला बालपणात स्वप्न पडत होते की ,ती पोलीस बनून देशाची सेवा करत आहे.

त्यामुळे तिने कधीही निराश न होता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत केली. आणि ती आयपीएस अधिकारी बनली.या मुलीला सर्वोत्कृष्ट आयपीएस

प्रशिक्षणार्थी म्हणूनही निवडले गेले.त्या मुलीने अत्यंत परिश्रमपूर्वक स्वतःला सक्षम केले. उमा या हिमाचलच्या दुर्गम खेड्यातली आयपीएस अधिकारी ही सर्वांसाठी

आगळेवेगळे उदाहरण आहे .त्यांची काम करण्याची पद्धत अशी आहे की तिचे फक्त नाव जरी घेतले तरी व्यापारी, गुंड, काळे धंदे करणारे लोक थरथर कापतात.

अगदी सामान्य कुटुंबात वाढलेल्या शालीनीने कठोर परिश्रमाने हे स्थान मिळवले आहे .कूल्लु येथे पोस्टिंग दरम्यान तिने ड्र-ग्स विक्रेत्यांविरुद्ध मोठी मोहिम राबवली.

३० वर्षीय शालिनीने आयपीयस सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचे विजेतेपद जिंकले. असे करून तिने आपल्या घरातीलच नव्हे तर आपल्या गावाचेही नाव मोठे केले.

यामुळे त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा रिव्हाॅल्व्हरचा प्रतिष्ठित बेल्टही देण्यात आला.

 

Also Read : https://www.postboxlive.com

 

आयपीएस अधिकारी शालिनीचे वडील रमेश एचआरटीसी बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करतात .त्यांची आई गृहिणी आहे. हिमाचलच्या ऊनाच्या

या गावात जन्मलेल्या शालीनीचा जन्म १४ जानेवारी १९८९ रोजी झाला. त्यांच्या घरांमध्ये लहानपणापासूनच त्यांच्या आईवडिलांनी तिला मुलगी कधीच मांनले नव्हते.

त्यांनी तिला एक मुलगा असल्यासारखे तिचे संगोपन केले. लहानपणापासूनच शालिनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करत होती. कष्टकरी विद्यार्थी म्हणून

तिची गणना केली जात असे .शाळेत ती अत्यंत हुशार म्हणून ओळखली जात. तिचे शिक्षण धर्मशाळेतील डीएव्ही स्कूल व नंतरचे शिक्षण हिमाचल प्रदेश

कृषी विद्यापीठातून झाले आणि त्यांनी झान येथून पदवी प्राप्त केली.आज आयपीएस अधिकारी बनलेल्या शालिनी सांगतात की जेव्हा तिने यूपीएससीची

तयारी करण्याचा विचार केला तेव्हा तिने कुणालाही याबद्दल सांगितले नव्हते. कठोर परिश्रमानंतर शालीनींना हे पद प्राप्त झाले होते.

कठोर परिश्रमानंतर काहीही ध्येय साध्य करता येते हे शालिनी आपल्या कर्तुत्वाने सिद्ध केले आहे.

 

 

 

अशा या हुशार कर्तबगार शालिनी आमचा मानाचा मुजरा

 

 

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

www.postboxindia.com

www.postboxindia.com

Leave a Reply

error: Content is protected !!