Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Maharashtra Politics News Live Updates : कसला भूकंप ?

1 Mins read
  • Maharashtra Politics News Live Updates : कसला भूकंप

Maharashtra Politics News Live Updates : कसला भूकंप ?

सौदेबाजी 2024 च्या निवडणुकीसाठी चालवलेला तमाशा !

निखिल वागळे 

मोदी शहा भाजपने जो सत्तेसाठी देशभर तमाशा मांडला आहे त्याला सर्वसामान्य जनता आता वैतागले आहे ! मोदी शहा यांच्या मध्ये भाजपाला स्वबळावर सत्तेत आणण्याची ताकद उरली नाही !!जनतेने त्यांना पुरते ओळखले आहे !!

महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडले त्याला भूकंप वगैरे मानायला मी तयार नाही. हे आज ना उद्या होणारच होते.. अजितदादा मोठा गट घेऊन जाणार हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांनाच ठाऊक होतं. मीडियाच काय गाव-खेड्यांतील सर्वसामान्य लोकही अगदी ठामपणे हे सांगत होते. येणाऱ्या पंधरवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मोठ्या घडामोडी घडणार आहेत..अशी चिन्हे दिसत होतीच.

जी चर्चा जगजाहीरपणे होतं होती, ती अखेर खरी ठरली इतकेच. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, वगैरे गोष्टी पंतप्रधानांनी स्वतः राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर नऊ वर्ष कारवाईसाठी त्यांनी झोपा काढल्या का ? पहाटेच्या शपथविधीच्या वेळेसच सर्व क्लीन चिट मिळाल्या होत्या राज्य सहकारी बँक ही 2011 पासून प्रशासक आहे तीनही प्रशासक अत्यंत विद्वान व शिस्तप्रिय आहे !! या बँकेला केंद्र सरकारने आशिया खंडातील क्रमांक एक ची बँक म्हणून पारितोषिक दिले आहे बँकेची कर्ज वसुली शंभर टक्के आहे !!

अजित पवार यांचा या बँकेचा तसा डायरेक्ट संबंध नाही !! एक वेळ सगळ्याच विरोधी पक्षांनी, तेव्हा सगळ्याच आमदारांना भाजपच्या वॉशिंग मशिन मध्ये स्वच्छ होऊन यावे !! आगामी निवडणुका जिंकायच्या तर महाराष्ट्रातील मराठा समाज सोबत हवाच.. त्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे भाजपसोबत घ्यायची असा वन लाईन फॉर्म्युला मोदी-शहांनी ठरवला होता.

महाराष्ट्रातील बहुतांश मराठा समाज पूर्णपणे भाजपविरोधात असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीपूर्वी बदलणे हे मोदी-शहा यांच्यापुढील सर्वात महत्त्वाचे टास्क होते. ते अजित दादांच्या सहकार्याने पूर्ण झाले. त्यासाठी मोदी शहा पडेल ती किंमत चुकवायला तयार आहेत 105 आमदारांचा पक्ष सत्तेसाठी इतका लाचार झाला आहे ! की 40 आमदारांना मुख्यमंत्री व 10 मंत्री पद दिले व राष्ट्रवादीच्या आमदारांना उपमुख्यमंत्री व 10 मंत्रीपद दिले देवेंद्र फडणीस हे उपमुख्यमंत्री क्रमांक 2 ठरतील केवढी ही लाचारी !!

एवढ्या मोठ्या पक्षाचे विश्वगुरू तुम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडणुका घेऊन सत्ता मिळू शकत नाही का ? भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हाती काही लागत नाही त्यामुळे संघ व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत !

महाराष्ट्रात चाललेला तमाशा हा केवळ मुंबई महापालिका गुजरात च्या ताब्यात देण्यासाठी आहे ! मागील निवडणुकीत भाजपाचे एकूण नगरसेवकांपैकी 60 नगरसेवक गुजराती आहेत !!

एकनाथ शिंदेंचे ओझे बिनकामाचे आहे, ते आपल्याला घेऊन बुडतील याची खात्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आधीच पटली होती.. अलीकडच्या आगाऊ जाहिराती नंतर तर देवाभाऊही नाराज झाली होते.,,त्यामुळे आता लवकरच एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील. शिंदेंचे मुख्यमंत्रीपद कायद्याच्या कक्षेत राहून अलगद काढले जाईल.. आणि

पहाटस्वप्नानात गडगडलेले अजित पवार किंवा विनोद तावडे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील ! शिंदेंचे मुख्यमंत्री पद हिसकावून ते अजित पवारांना आणि फडणवीस केंद्रात असाही प्रयोग शक्य आहे. चंद्रकांत पाटलांसारखा मास बेस नसलेला नव्हे तर अजितदादांसारखा पवार कुटुंबातील लोकप्रिय मराठा चेहराच भाजपला लोकसभा निवडणुकीत तारू शकतो, असे निरिक्षण विनोद तावडे समितीनेही नोंदवले होतेच. त्याची गंभीर नोंद भाजपने घेतली होती. त्यानुसार आज राजकारणातील सोंगट्या हलल्या. याला भूकंप म्हणता येणार नाही,

सत्तेसाठी तमाशा कारण राष्ट्रवादी अजित पवार राहू शकत नाही ! असे फार तर म्हणता येईल.बाकी सत्तासुंदरी साठी दिल्ली ची असुरलेले नेते 2024 पर्यत ‘,, कोणत्याही थराला जाऊ शकतात, परंतु महाराष्ट्रातील जनता शोधणे आहे मोदी शहाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ! या सर्व घडामोडी त उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अत्यंत उजळून निघाली आहे तसेच काँग्रेसलाही चांगले दिवस येतील कारण केंद्रीय तपासी यंत्रणेद्वारे धामकावण्यासारखे काँग्रेसकडेही नेते होते परंतु भाजपाला राष्ट्रवादीचे ताकदवर नेते पाहिजे होते त्यामुळे काँग्रेस फोडण्याच्या भानगडीत मोदी शहा पडले नाही !!

समृद्धी मार्गावरील अपघाताचे प्रेत जळत असताना ‘ मनिपुर जळत असताना , देशभर महागाई, बेकारी असताना ‘ महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिन झालेला असताना त्याला कुठलीही मदत मिळाली नाही! असे असताना सत्तापीपासून मोदी शहा भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतात, __- _ आता ही लढाई जनतेला स्वतःच्या हातात घ्यावी लागेल !!

वेळप्रसंगी यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल ! संविधान _ देश महाराष्ट्र _ वाचवावा लागेल व आगामी निवडणुकीमध्ये यांना पराभूत करावे लागेल.

Leave a Reply

error: Content is protected !!