Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

chandrakant dada patil – चंदूदादा कीती आज्ञाधारक !

1 Mins read

chandrakant dada patil – चंदूदादा कीती आज्ञाधारक !

 

 

chandrakant dada patil – चंदूदादा कीती आज्ञाधारक ! – जयंत महाजन

 

 

 

 

30/8/2021,

पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगीतल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. न जाणो दादा

स्वत:चा काहीतरी स्वतंत्र निर्णय घेवून राज्यात काहीतरी वेगळा प्रयोग करायला गेले तर? राज्यात पून्हा एखादा ‘पहाटे’चा प्रयोग व्हायला बसला. राष्ट्रवादीचे प्रमुख

शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गुप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी,

अमित शाह, जे. पी. नड्डा जो निर्णय घेतील, तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल. खरं म्हणजे चंद्रकांत पाटील उर्फ ‘दादा’ स्वत:चा काही

वेगळा निर्णय घ्यायला ते काही राष्ट्रवीदीचे ‘दादा’ आहे का? कधी कधी अत्यंत सुमार दर्जाची विधाने राजकारणी का करतात, हेच समजत‌ नाही. ते म्हणतीत की,

मला कुठले संकेत मिळालेले नाहीत. शहांनी एवढ्या रात्री पवारांची का भेट घेतली माहिती नाही.

मग दादा विनाकारण संकेत का देत बसले? ‘आम्हाला अशा काही सूचना वरिष्ठांकडून आल्या की त्या मानायच्या असतात. त्यामुळे अमित शाह व अध्यक्षांची भूमिका

मान्य असेल, असं ते म्हणाले. पवार व शहा अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारचे भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते.

अर्थात याबाबत अधिकृत माहिती मात्र नाही. अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात, असंही ते म्हणाले. chandrakant dada patil ‘दादा’ काय बोलताहेत हे त्यांना तरी समजले का?

असंही वाटतं. त्यांच्याच पक्षाचे एक नेते प्रकाश मेहता वाहीन्यांच्या प्रतिनिधीला ‘दांडकेवाले’ असे म्हणाले होते.

या दांडकेवाल्यांना पाहीले की दादांनाही अलीकडे भरून येते. पण ज्या ‘संघा’च्या भूमितून ते राजकारणात आले, तेथील संयम त्यांनी ठेवला नाही,

तर संजय राऊत व त्यांच्यात फरक तो काय ? chandrakant dada patil चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना सरकार टिकेल हे सांगावे लागते

म्हणजे काही तरी गडबड आहे. शरद पवार अमित शाह भेटीवर बोलताना ते म्हणाले की, अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही.

अमित शहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शाह यांची भेट खूप निवांत झाली. वरून ही भेट का झाली याबद्दल

मी देखील अनभिज्ञ आहे, असंही ते म्हणतात. याचाच अर्थ दादांना काहीही माहीती नाही.

तरीदेखील आपल्याला गोपनीय सर्वकाही माहीती असल्याचा आवाका ते आणतात. अमित शाह रात्रीच्यावेळी शरद पवार यांना भेटल्याचे दादांना समजले.

अमित शाह यांना भेटण्याची वेळ रात्रीचीच असते. ती निवांत भेट असेल. पण शरद पवार अहमदाबादला जाऊन अमित शाह यांना निवांतपणे का भेटले,

याचा विचार झाला पाहिजे. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

Also visit : https://www.postboxlive.com

 

आमच्या नेत्यांची विचारांवर सर्वोच्च निष्ठा आहे. त्यामुळे तो सांगतील तो निर्णयच आमच्यासाठी अंतिम असेल, अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी जोडली.

आता त्यांच्या वक्तव्यात नेहमीप्रमाणे ‘विचारांवर सर्वोच्च निष्ठा’ असते असे सांगीतल्यावर तो एक मोठा विनोदच झाला. आचार्य अत्रे आज हयात असते तर त्यांनी

म्हटले असते की, चंद्रकांतदादां इतका मोठा विनोद गेल्या हजार वर्षात झाला नाही. कारण पहाटे पहाटे उठून ज्या ‘दादां’बरोबर त्यांनी शपथविधी उरकला,

तेथे त्यांचे कोणते विचार जुळले होते? याचे उत्तर कधी तरी निवांत असल्यावर दादांनी द्यायला हरकत नाही.

दुसरीकडे शरद पवार आजारी पडल्यावर ती ‘ब्रेकिंग न्यूज’ बनल्यावर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची विचारपूस करायला सुरूवात केली. मात्र स्वतः

पवार इस्पितळात अडकल्यानंतर भाजप नेत्यांकडून या गंभीर विषयाला देखील संधीत रूपांतर करण्याचे केविलवाणे प्रकार सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

प्रदेशाध्यक्षांपासून ते आमदारांपर्यंत सर्वजण ट्विट आणि व्हिडिओचा प्रसार करून पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रम वाढविण्याचा प्रकार करत असल्याचं दिसत होतं.

भाजपचे अनेक नेते टीव्ही वृत्तवाहिन्यांवर हजेरी लावून मोठ्या प्रमाणावर जोरदारपणे संभ्रम कसा वाढवता येईल याची खबरदारी घेताना दिसत होते.

भाजपचे एक सुमार दर्जाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांना तर टीव्हीवर पहावत नव्हते, अशा पध्दतीने ते बोलत होते. स्वतः पवार इस्पितळात दाखल झाल्याने

त्यांना कोणतीही पत्रकार परिषद घेता येणार नाही, याची भाजप नेत्यांना माहिती होतीे. त्यामुळे त्यांचं आजारपण देखील सर्वत्र संभ्रम निर्माण करण्यासाठी वापरलं जातंय

असं चित्र दिसलं. मात्र यामुळे भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकते याचा अंदाज येऊ लागला.

राष्ट्रवादीने आणि महाविकास आघाडीतील पक्षाने याबाबत अधिकृत भाष्य केलेलं असताना देखील, पवारांचं आजारपण बाजूला सारून भाजप नेत्यांकडून

संभ्रमाच्या मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालं. कळस म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी तर थेट शपथविधी पर्यंतच भाष्य केल्याने यांच्या राजकारणाची कीती कीव करावी, असे वाटून गेले.

आपल्या डोक्यावर फक्त अमित शहा यांचा हात असल्यामुळे, आपले राजकारण महाराष्ट्रात बऱ्यापैकी चालू आहे याची जाणीव आता दादांना कोणीतरी करून दिली पाहिजे.

अन्यथा दादा बोलतच राहतील आणि महाराष्ट्रातील जनतेला ‘टाईमपास’ व्यतिरीक्त काहीही हाती लागणार नाही. राज्यातले सरकार ‘पडेल त्या वेळी पडेल’,

परंतु ‘पडेल’ वक्तव्य करून chandrakant dada patil दादांनी त्यांचा राजकीय दर्जा ‘पडून’ देवू नये !

 

 

 

जयंत महाजन

Leave a Reply

error: Content is protected !!