charlie chaplin birthday
charlie chaplin birthday
charlie chaplin birthday

charlie chaplin birthday – चार्ली चॅपलिन यांची आज जयंती

charlie chaplin birthday - चार्ली चॅपलिन यांची आज जयंती

charlie chaplin birthday – चार्ली चॅपलिन यांची आज जयंती

 

charlie chaplin birthday – चार्ली चॅपलिन यांची आज जयंती

 

 

 

 

 

 

 

जगातील विनोदी कलाकारांची हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नावे आहेत, विनोद आणि वास्तविक

जीवनातले दुःख लपवून चेहऱ्यावर मुखवटा लावून जगाला हसविणे यासारखे महाकठीण काहीच नाही,

या मोजक्या कलाकारांच्या राशीत जगात चार्ली चॅप्लिन चे नाव सर्वात पहिले आहे. charlie chaplin birthday

  चार्ली चॅप्लिन चे हास्यपट पाहून आम्ही मोठे झालो. कधी आयुष्यात निराशा आली की चार्ली चॅप्लिन चे हे

हास्यपट इंटरनेट वर उपलब्ध आहेत.

विनोदी अभिनेता, दिग्दर्शक, गायक,संगीतकार,निर्माता अशी ख्याती असणारे चार्ली चॅपलिन यांची आज जयंती.

त्यांचे पूर्ण नाव चार्ल्स स्पेन्सर चॅपलिन असे हॊते.पण त्यांचे चहाते त्यांना ‘चार्ली चॅपलिन’ या नावाने ओळखू लागले.

मूकचित्रपटांच्या जमान्यातच ते पडद्यावर आले.त्यांचे अभिनयामुळे त्यांनी विनोद जागृत केला व जागतिक

पातळीवर त्यांचे नाव विनोदी अभिनेता म्हणून सर्वदूर झाले.

charlie chaplin birthday  त्यांचा जन्म १६ एप्रिल, १८८९ रोजी लंडन येथे झाला. त्याचे आई आणि वडील

दोघेही गायक आणि अभिनेते होते.आई ‘लीली हार्ले’ या नावाने अभिनेती आणि गायिका म्हणून प्रसिद्ध होती.

जगाला हसण्याची दिक्षा देणाऱ्या या कलंदर कलाकाराचे बालपण मात्र खूपच क्लेशकारक होते. त्यांचे वडील

त्यांचे पासून दूर होते.आई कष्ट करून त्यांचे पालन पोषण करण्याचा प्रयत्न करीत होती.

चार्लीना त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी मोलमजुरी मारण्यासाठी बाहेर पडावे लागले होते. त्यातच त्यांच्या

आईचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिला मनोरुग्णालयात दाखल करावे लागले . रुग्णालयातून घरी आलेवर

त्यांच्या आईचेही निधन झाले.चार्ली व त्यांचा भाऊ याना त्यांचे वडिलांकडे पाठविले पण त्यांचे व्यसनाधीनतेमुळे

निधन झाले.बालकामगार म्हणून त्यांना मोलमजुरी करावी लागली.

मला संकटांचा अर्थही काळात नव्हता कारण आम्ही सतत संकटात राहत होतो, आणि मी लहान असल्यामुळे

मी ते विसरूनही गेलो.मी माझ्या आईचे आजारपणात काहीही करू शकलो नाही हे खंत त्यांनी व्यक्त केली होती,

यावरून त्यांच्या परिस्थितीची कल्पना येते.चॅपलिनने अगदी लहान वयातच फिरत्या म्युझिक कंपनी बरोबर काम

करण्यास सुरवात केली होती.कोठलेही संगीतक्षेत्रातील शिक्षण नसताना ते उत्कृष्ट प्रकारे व्हायोलियन सारखी वाद्ये वाजवीत.

चरितार्थासाठी त्यांनी अंगभूत अभिनय गुणाचा आधार घेऊन आपला भाऊ सिडनी याच्यासह लहान मुलांच्या नाट्यसमूहातून व्यावसायिक रंगमंचावर पहिलं पाऊल टाकलं आणि अल्पावधीतच ते टॉप डान्सर म्हणून प्रसिद्ध झाले.वयाचे बाराव्या वर्षी ‘शेरलॉक होम्स’ या प्रसिद्ध नाटकात ‘बिली’ हे पात्र त्यांनी रंगवुन अभिनयाचा श्रीगणेशा केला.त्यानंतर कॉमेडियन स्टेज अॅ्क्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.वयाच्या १९ व्या वर्षी त्यांना प्रतिष्ठित फ्रेड कार्नो कंपनीमधे काम करण्याची संधी मिळाली व त्यांना कंपनीबरोबर अमेरिकेत जाण्याचा योग आला.

वर्ष १९२१ मध्ये प्रदर्शित झालेली ” The Kid ” हा चित्रपट म्हणजे सबकुछ चार्ली असे होते.या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक,निर्माता,संगीत,अभिनेता चार्लीच होते एप्रिल १ डिसेंबर २०११ मध्ये, “किड “लायब्ररी ऑफ कॉंग्रेसच्या नॅशनल फिल्म रजिस्ट्रीमध्ये संरक्षित करण्यासाठी निवडले गेले.रजिस्ट्रीने म्हटले आहे की हा चित्रपट “टचिंग ड्रामा, सोशल कमेंट्री आणि इनव्हेंटिव्ह कॉमेडी” चे एक कलात्मक मिश्रण आहे आणि चॅपलिनच्या नेहमीच्या लहान विषयांच्या पलीकडे आपली कलात्मकता टिकवून ठेवण्याच्या क्षमता सिद्ध केली आहे. charlie chaplin birthday  कलाकार म्हणून यशस्वी होताना त्यांचे कौटुंबिक जीवनही विस्कळीत होते त्यांनी एकूण चार लग्ने केली व त्याला एकूण ९ मुले झाली. अश्या या गुणी कलाकाराचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

Advertisement

More Stories
raja ram mohan roy history
raja ram mohan roy history – राजा राममोहन राॅय
error: Content is protected !!
%d bloggers like this: