Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

Chhatrapati shivaji Maharaj – शिवाजी महाराज मृत्यूचा हुकूम 

1 Mins read

Chhatrapati shivaji Maharaj – शिवाजी महाराज मृत्यूचा हुकूम 

 

Chhatrapati shivaji Maharaj – आग्रात असताना त्यांच्या मृत्यूचा हुकूम

 

 

 

१७ मे इ.स.१६६६,



१६ मे या दिवशी बादशाहाने आग्र्याच्या कैदेत असताना शिवाजीराजांना Chhatrapati shivaji Maharaj ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला!

त्याचे असे झाले की, औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले.त्यांचा मुद्दा एकच.या सीवाला  ठार मारा.त्याने आपले

अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण.तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की,या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली.

ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरतशहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आणि खरोखरच

औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की, ‘ होय. मी सीवाला Chhatrapati shivaji Maharaj ठार मारणार आहे!’ हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय

ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते.

पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली.रामसिंग कमालीचा बेचैन झाला.

रामसिंग खडबडून उठला. शिवाजीराजांच्या अंगाला धक्काही लागलेला मला सहन होणार नाही ; आधी माझा बळी पडेल ;

माझ्या वडिलांनी शिवाजी राजाला माझ्या भरवशावर पाठवले आहे. माझे वडील आणि मी जिम्मेदार आहोत ; राजपुताचा शब्द आहे हा.


शिवाजीराजांना आमचे वचन आहे ! ‘ या विचारांच्या कल्लोळाने खडबडून उठून रामसिंग निघाला ! औरंगजेबाने शिवाजीराजाला

रादअंदाझखानाच्या ताब्यात द्यायचे व ठार मारून टाकावयाचे ठरवले आहे ,ही गुप्त बातमी रामसिंहाला कोठून आणि कशी कळली ते इतिहासाला ही ठाऊक नाही.

रामसिंहाने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगनेमीरबक्षीला कळवळून विनंती केली की ,

माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊनसादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी

अर्ज लगेचतयार केला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही!त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक

भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.


मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की,’ मेरे पिताजी ने उसको कहा है

‘तुम्हारा एक बाल भी बाका न होगा ‘इस लिये मै कहता हूँ , पहले मुझे मार डालो ! मेरे मरनेके बाद चाहे बादशाह उसे मार डाले या कुछ भी करे!”

आपण शिवाजीराजांना Chhatrapati shivaji Maharaj ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात.आपण राजांना ठार मारू शकता.

पण आम्ही शिवाजीराजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे , तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा.

मग शिवाजीराजांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच.


त्यातील पहिली गोष्ट अशी की , सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ?

दुसरी गोष्टी अशी की , रामसिंग म्हणतो की , ‘ मला प्रथम ठार मारा. मग Chhatrapati shivaji Maharaj सीवाला ठार मारा ‘ याचा अर्थ असाहीउघडउघड दिसतोय की ,

मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि

मीरबक्षीला सांगितले की , ‘ रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा.

महाराजांचा द्वेष करणाऱ्यांना तर हा तापलेला तवा आयताच मिळाला. महाराजांकडून महाराष्ट्रात ज्यांना मार बसला होता आणि ज्यांच्या नातलगांना ही गनिमी काव्याचे तडाखे बसले होते , असे लोक महाराजांवर व मराठ्यांवर जळफळत होते. अशांपैकी काही सरदार बादशहाला म्हणाले की ” सिवा तो एक जंगली जानवर है ! आज उसने खिलतको ठुकराया है ! तो भी कल उसे उसी खिलतको पहेनना पडेगा ! “

शिवाजीराजांचे Chhatrapati shivaji Maharaj तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. बादशाह रामसिंगला म्हणाला, ‘ तुझा अर्ज मिळाला.मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगीशिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? ” कुंवर
रामसिंघको पूछो ,क्या वह शिवाके बारेमे हवाला ले सकता है ? यहाँसे भाग गया , या उसने कुछ शरारत की, तो रामसिंघ इसका जिम्मेदार रहेगा ? इस बारेमे रामसिंग माबदौलतको लिखके दे दें ! ” हा धूर्त पेच औरंगजेबाने
टाकला.


तू या गोष्टीला जामीन राहतोस का ?प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. आज रामसिंहाने आपले नाते अगदी सार्थ केले . मृत्यूचा घाला आज अचानक आपल्यावर येणार होता , हे समजल्यावर महाराजांच्या व त्यांच्या
जीवलगांच्या अंगावर शहारे उमटून गेले. रामसिंहाने आपल्या शब्दाच्या मोलाकरिता , निश्चयास पेटून आत्मविश्‍वासाने मृत्यूचा पाश मृत्यूला माघारी घ्यायला लावला , हे पाहून महाराजांना रामसिंहाबद्दल जास्तच आत्मीयता वाटू लागली . पण आपले जीवित आग्ऱ्यात सततच मृत्यूच्या छायेखाली असणार याची खात्री ही महाराजांना पटून चुकली.

बादशाहाचा आपल्याबाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला .तेथे महादेवाची पिंडी व पूजेचे साहित्य होते, ते घेऊन महाराजांनी महादेवाची पूजा केली व पिंडीवर बेल आणि फुले वाहून रामसिंहास वचन दिले की , तुम्ही माझ्याकरिता बादशहास जामीनकी लिहून देत आहात तरी मीहि तुम्हास वचन देतो की , तुमच्या जामीनकीस बाध येईल असे वर्तन मी करणार नाही , वा आग्र्यातून निघून किंवा पळून जाणार नाही. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ‘ भाईजी, तुम्ही बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. ‘ नंतर रामसिंहाने जामीनकीच्या कागदावर सही केली व सायंकाळी भरणाऱ्या दरबारात तो दिवाण-इ-खासमध्ये गेला .मीरबक्षी आमिर खान दरबारात आलेलाच होता. त्याच्या हातात त्याने आपल्या जामीनकीचा कागद दिला. तो कागद त्याने बादशहाच्या हातात पेश केला.


धन्य ते छत्रपती राजे Chhatrapati shivaji Maharaj  आपणास त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर


Leave a Reply

error: Content is protected !!