Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

colleague synonyms – आपले ऑफिस आपले सहकारी

1 Mins read

colleague synonyms – आपले ऑफिस आपले सहकारी

 

colleague synonyms – आपले ऑफिस आपले सहकारी

 

 

 

मीरा नेहमीचं तिच्या ऑफिसमधल्या तिच्या सर्व सहकार्यांबद्दल खूप भरभरून सांगते. कधी खूप जास्त काम असेल तर तिला मदत करणारे, कधी अजून काही अडचण आली तर तिला सांभाळून घेणारे .त्याच्या अगदी उलट सौरभचं असतं ,नेहमी आपल्या ऑफिसमधल्या  प्रयेकाची त्याची काहींना काही  तक्रार असतेचं . मीटिंगमध्ये नेहमी काहीतरी समस्या निर्माण करणारे , सर्व मेहनत सौरभची पण श्रेय मात्र सहकारी घेतात असं त्याचं सहकार्यांबद्दल सांगणं असायचं .

व्यक्ती तितक्या प्रकृती , बरोबर ना ?सगळे कसे आपल्याला हवे तसे वागतील?? colleague synonyms ऑफिस मध्ये विविध स्वभावाचे , वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले लोकं एकत्र काम करतात. आपल्या सोबत काम करणारे ते आपले सहकारी.  प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता वेगळी ,मानसिक जडण-घडणं वेगळी ,कोणी पटकन आपल्याला मदत करणारे , कोणी आपलं एकूण न एकल्यासारखे करणारे, कोणी उगीच आपल्या बद्दल गैरसमज करून घेणारे,कोणी कारणं नसताना आपल्या बद्दल चुकीची माहिती पसरवणारे.  .. यादी तर् वाढतचं जाईल.

महत्वाचे हे आहे की ,आहे त्या परिस्थितीत राहून  एक संघ म्हणून काम करायचं असतं . colleague synonyms दुसरं ,सहकाऱ्याला आहे तसं स्वीकारावं आणि आपण कसं एक चांगला सहकारी बनता येईल त्यावर कामं करणं जरुरी असतं .

त्यासाठी काय करता येईल ते बघूया :

१. जिथे गरज आहे तिथे मी नव्हे तर आम्ही म्हणून उभे रहा ,त्याने सगळ्यांच्यात संघ भावना निर्माण होईल.

२. एकमेकांसोबत काम करण्यात एक विश्वास ,आपलेपणा तयार करा .

३. कामं तर सोबतचं करायचे आहे मग मनात अढी ,गैरसमज न ठेवता हसत-खेळत ,समजून घेऊन केलं तर  सोप्प    होईल ना ?

४. आपणं आज एक मदतीचा हात पूढे  केला तर नक्कीचं आपल्या सहकाऱ्याची  सुद्धा पुढच्या वेळेस आपणहून तुम्हाला मदत होईल.

५.आपल्यासोबत काम करणयासाठी सर्वाना छान वाटलं पाहिजे.

६. एकदा का आपणं  आपल्या सहकाऱ्यांना   समजून घेतले, पाठिंबा दिला तर एकत्र काम करण्यातले बरेचं प्रश्न,समस्या सुटतील .

८. कामांचे श्रेय ज्याचे त्याला द्यावे. त्याने त्या व्यक्तीला  सुद्धा  हुरूप येतो.

९. शक्यतो इकडचे तिकडे करणे ,कोणाच्या खाजगी आयुष्या बद्दल बोलणे ,गट बनवणे ,गॉसिप करणे ह्यापासून दूर राहिलेले बरे.

१०.गंभीर  वातावरण कोणालाच आवडत नाही , एक खेळकर वातावरण ऑफिसमध्ये कसं राहील ते बघा.

११. आपल्या मस्करीने आपण कोणाला दुखवत तर नाही ना ,ह्याची काळजी घ्या.              

१२.आज प्रत्येक जण वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष करतोय ,हे लक्षात ठेवा.

१३. दररोज आपणं ह्याचं सहकार्यांना भेटणार आहोत ,त्याच्या सोबतचं काम करणार आहोत हे मनात ठेवा.

१४.कोणाच्या कामात उगीच लुडबुड न करता ,जेव्हा मदत हवी  तेव्हाचं  मदत करा.

१५.मोकळेपणाने बोला ,तरचं पुढचा तुम्हाला समजून घेईल .

१६..आपल्या सहकाऱ्यांचा आदर करा .

१७. वैयक्तिक टिपणी करणे , अपमान करणे, कमी लेख ने ह्यापासून कायम दूर राहा.

१८. आपल्याला समजून घेण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा.

१९.ऑफिसचे हे आपल्या सहकार्यासोबतचे नाते हे बाकी  नात्या सारखेचं सांभाळा, जपा .

२०.शेवटचे पण अतिशय महत्वाचे आपल्या वागण्यात , बोलण्यात सच्चेपणा असू द्या.

मग काय ,ओह ! नो ऑफीस… असं तोंडातून न येता  ऑफिसमध्ये जाण्याचा उत्साह आपसूक येईल हे नक्की !!

www.postboxindia.com

www.postboxindia.com

मेघना धर्मेश

9321314782 | [email protected]

Leave a Reply

error: Content is protected !!