Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

force and pressure – ताण – तणावाचे व्यवस्थापन – १

1 Mins read

force and pressure – ताण – तणावाचे व्यवस्थापन – १

 

 

force and pressure – ताण – तणावाचे व्यवस्थापन – १

 

 

 

आजच्या महत्वाच्या मीटिंगचं प्रेसेंटेशन तनुजाने आधीचं करून ठेवले  होते.त्यामुळे वेळेवर तिला बिकूलल  धावपळ करावी लागली नाही. अगदी शांतपणे आणि  तणाव न

घेता  मस्त मिटींग पार पडली. त्याउलट मनोजचं झालं- करू करू म्हणतं त्याने सगळे महत्वाचे काम तसेच ठेवले. जेव्हा बॉस ने रिपोर्ट मागितला तेव्हा त्याला अरे बापरे  !

आता काय  ? असं झालं. मग काय अर्थातचं त्याला ताण जाणवायला लागला.

ताण-तणावाचा force and pressure  सामना आपल्याला  रोजच्या  आयुष्यात  घरी/कामाच्या ठिकाणी करावा लागतो. मला नको आहे हं तणाव ,

जा बाबा तू..असं म्हणून आपला प्रश्न सुटणार आहे का ?नक्कीचं नाही ,आपल्याला त्यावर मात करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणार आहेत ,त्या काय ते बघू या :

१. जे आहे ते स्वीकारा ,मग त्यातून मार्ग काढता येईल . उदाहरणार्थ -माझं काम पूर्ण करण्यासाठी  मला २ दिवस आहेत  ,मग मी शक्यतो १ ते दीड दिवसात ते संपवणं

जरुरी आहे ,हे ठरवा आणि करा .तुमचे वेळेचे व्यवस्थापन इथे उपयोगी ठरेल. 

२.जे आपल्या हातात  नाही त्यावर काही आपण नियंत्रण (  Control )मिळवू शकत नाही. उदाहरणार्थ -बँकांचा बंद आहे ,तर आपण काही करू शकणार नाही.

३.आपल्या कामाला ओझं म्हटलं तर ते ओझंच वाटणात ना ? त्या पेक्षा त्यात रस (Interest) घेउन स्वतःच्या समाधानासाठी केले तर ? नोकरी/कर्तव्य (Duty)म्हणून

न बघता आपण ती  कार्यपध्दती (Process)/ कामाच्या एकंदर प्रवासाचा आनंद घेतला तर?

४.तणाव म्हटलं तर आहे पण त्यापेक्षा त्यामुळे  आपल्या कडे असणाऱ्या उपलब्धी(Opportunity) पण बघा. त्यातून आपण नवीन कौशल्ये  शिकू शकतो,आपल्या

क्षमता वाढवू  शकतो.अरे ,मला तर हे छान जमतंय ,मी उगीचं  ताण  घेतला .असं सुद्धा होऊ शकतं .

काळे क्लर्क  पहिले सर्व काम हाताने करायचे,त्यात वेळ जायचा ,पण कॉम्पुटर शिकायला ते हो-नाही करत होते. त्याना नाही म्हटलं तरी नवीन तंत्रज्ञानाचा  तणाव

वाटतं होता.पण नंतर एकदा त्यावर काम करून हळूहळू शिकत गेले,तसा कामाचा तणाव पण कमी झाला.

५. आपण एखाद्या गोष्टीला कसं react करतो ते महत्वाचे. नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला जास्त ताण देते .त्यापेक्षा सकारात्मक राहून जर आपण  उपाय शोधले 

तर जास्त चांगलं. तुमचा प्रतिसाद  कसा हे तर तुम्ही निवडू  शकता ना ? अरे बापरे की अच्छा ,ठीक आहे .दृष्टिकोन बदला , त्याने नक्कीचं मदत होईल.    

६. शक्यतो महत्वाचे आणि तातडीचे काम प्रथम पूर्ण करा . एकावेळी एकाच कामाला प्राधान्य द्या. सगळी कडे  multi-tasking नकोय. दहा कामे करताय

आणि एक पण पूर्ण नाही ,असं नको.

७. जे जे आपल्याला  जमण्या सारखं आहे ते कामं पूर्ण करा. काम साठवून  ठेऊ नका . नंतर करू नाही ,आता करा आणि मगच दुसऱ्या कामाकडे  वळा.

८.मन,भावना आणि तुमचे शरीर ह्यांची असमर्थता तुम्हाला ताण देते ,हे लक्षात ठेवा.  कामाचा ताण नव्हे तर आपण बरयाचदा स्वभावाने म्हणा किंवा इतर कशाने

म्हणा मानसिक शक्ती नको तिथे खर्ची करतो. शरीर जिथे मन सुद्धा तीथेच असू देतं .नक्की त्याचा फायदा होईल.

९.कामाचा सराव ,चांगल्या सवयी ,स्व:ताला update ठेवणं  आणि आपल्या विषयातील ज्ञान/अभ्यास हे नेहमीचं  तुमचे तणाव कमी  करण्यासाठी उपयोगी ठरतील,हे नक्की !

१०.योग्य वृत्तीचा (Right Attitude) अवलंब  हा आपल्याला मार्ग शोधण्यासाठी मदत करतो. छोटीशी वाटणारी गोष्ट सुद्धा योग्य वृत्तीने फरक पाडू शकते.

आपली सकारात्मक वृत्ती आपलं काम चांगल्याप्रकारे करायला ऊर्जा देते ,काम मस्त झालं की आपण आनंदी..

आपण आनंदी तर मग तणाव येणार कुठून ?

११.  शांतपणे अधिक एकाग्रतेनं काम केले तर नक्कीचं तणाव जाणवणार नाही. संयम, जबाबदारी घेणं, शांत रहाणे, केंद्रित रहाणे ( focused  )

हे आपल्याला तणावाशी  सामना करायला महत्वाचे आहे.

एक cool  वृत्ती, वेळेचं योग्य  व्यवस्थापन,  बाय-बाय आळशीपणा / चाल-ढकल force and pressure हे आपल्याला तणाव कमी करायला  

नक्की मदत करती  ,पण त्यासाठी पहिले  Just Relax     

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

 

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

 

Leave a Reply

error: Content is protected !!