corporate employee
corporate employee
corporate employee

corporate employee – कंपनी आणि त्यांचे कर्मचारी !

corporate employee - कंपनी आणि त्यांचे कर्मचारी !

corporate employee – कंपनी आणि त्यांचे कर्मचारी !

 

corporate employee – कंपनी आणि त्यांचे कर्मचारी !

 

 


असं म्हणतात कंपनी ही त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे असते. कोणत्याही संस्थेसाठी,कर्मचारी हे अतिशय महत्वाचे घटक असतात.

बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर कर्मचारी आहे त्याठिकाणी आनंदाने जॉब करतात तर काही कंपण्यामध्ये जॉब सोडून जाण्याचं प्रमाण खूप असतं.

मला (consultant) म्हणून एका कंपनीची वारंवार अभियंताची गरज (requirement) येतं होती. अगदी ३ महिन्यापूर्वी लागलेला अभियंता(Engineer)

जॉब सोडून गेला. त्याच्या आधी आलेले १०-१५ दिवसात जॉब सोडून गेले . विचार केला आपण एकदा प्रत्यक्ष जाऊन काय मूळ समस्या आहे ते बघावं.

Client visit म्हणून जव्हो मी गेले ,लोकांशी बोलले तेव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. corporate employee नवीन आलेले मॅनेजर हे आपल्या टीमशी अतिशय वाईट वागत होते.

त्यांचे प्रॉब्लेम्स समजवून न घेता , सर्वांसमोर वाटेल ते बोलणे , ओरडणे, अगदी फाईल सुद्धा फेकणे असं चित्रं समोर आलं. फक्त deadline द्यायच्या

पण बाकी काय हवं-नको त्याकडे दुर्लक्ष करणं,जबाबदाऱ्या (responsibility ) देणं पण त्यासोबत अधिकार (Authority) न देणं . अशी मोट्ठी यादीचं तयार झाली.

संबंधित व्यक्तीशी चर्चा करून ह्या वर काय उपाय योजना करता येतील त्यावर काम करूया असं ठरलं. आपले कर्मचारी मग ते कनिष्ठ वर्ग ते अगदी

वरच्या श्रेणीचे असू देतं ते आपल्या कंपनीसाठी अतिशय महत्वाचे आहेतं /असतातं पण कोणतीही व्यक्ती ही कंपनीच्या भल्याचा विचार न करता जर

कंपनीचं वातावरण खराब करत असेल तर त्याबद्दल निर्णय घेणं ते पण लवकरात लवकर ,जरुरी असतं .एका व्यक्तीच्या मनमानी कारभारामुळे जर

आपल्या इतर कर्मचाऱ्यांचं मानसिक स्वास्थ बिघडतं असेल तर त्यावर नक्कीच विचार व्हायला हवा. मोठ्या हुद्याच्या व्यक्तीने company ist ह्याचं

तत्वावर काम करणं अपेक्षित आहे/ असतं . त्या व्यक्तीने अतिशय चांगल्या पध्द्तीने स्वतःचे नेतृत्व गुण वापरून , सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि एक

संघ म्हणून कामाचे नियोजन करावं .फक्त आपण वरच्या हुद्द्यांवर आहे हेचं लक्षात ठेऊन जर ऑर्डरचं सोडतं बसले तर त्याचा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन

देण्यासाठी काहींचं उपयोग होणार नाही.

 

Also Visit : https ://www.postboxlive.com


आज कंपनीला बॉस नको तर लीडर हवे आहेत . मॅनेजरचा फक्त अनुभव आणि शैक्षणिक पात्रता न बघता त्याचे peoples skills/soft skills म्हणजेच

लोकांशी वागण्याचे कौशल्ये , कौटुंबिक पार्श्वभूमी, सुसंस्कृतपणा सुद्धा बघणं आजच्या काळात गरजेचे आहे. शक्यतो लोकांचा त्याच्या टीम कडून /

जुनिअर्स /सिनिअर्स कडून कामा बदलचा अभिप्राय घेणे ,सुधारणा आहे का /हवी का हे ३/६ महिन्यात बघणे , कार्याचे मूल्यमापन करणे विभागीय

मीटिंग ठराविक काळानंतर घेणे . ह्या अश्या साध्या वाटणाऱ्या पण कंपनी धोरणासाठी जरुरी गोष्टी आहेत .

corporate employee आपल्या कंपनीतून वारंवार कर्मचारी काम सोडून जातं आहेत.नवीन आलेला सुद्धा जास्त दिवस रहात (टिकतं ?) नाही .हे आपल्या कंपनीच्या पुढे

जाण्यासाठी ,प्रतिष्ठेसाठी , प्रगतीसाठी नक्कीचं चांगले नाही. नवीन आलेल्या व्यक्तींना ऑफिस आपलं वाटणं हे महत्वाचं . समोरच्या व्यक्तीचा

अनुभव ,वय पाहून आदर द्यायला हवा हे नव्या कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवावं . काही जुने कर्मचारी आलेल्या नव्या व्यक्तीला चुकीच्या गोष्टी सांगून

घाबरवण्याचे पण काम करतात तेव्हा नव्या कर्मचाऱ्यांनी शांत रहावे . गप्पा -टप्पा , गॉसिप पासून शक्यतो दूर राहावं. अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं ,

कार्यक्षम कर्मचाऱ्यांना प्रोत्सहान देणं. पक्षपातीपणा न करणं ,अंतर्गत राजकारणं दूर ठेवणं ह्या गोष्टीचा प्रत्येक ऑफिसमध्ये गंभीरपणे विचार करून

तशी अंमलबजावणी केली तर बऱ्याच समस्या सुटतील .आनंदी आणि समाधानी कर्मचारी हा नेहमीचं कुठल्याही कंपनीसाठी एक Asset /मालमत्ता असते.

चांगली माणसं मिळणं ,टिकवणं त्यांना आपल्यासोबत घेऊन जाणं हे नक्कीच आव्हानात्मक आहे ह्यात शंका नाही . त्या आव्हानांना कंपनी कसं सामोरं जाते ते महत्वाचं !

 

 

 

 

 

मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Crime branch Police
crime branch police माटुंगा पोलिसांच्या नेटवर्क ची जबरदस्त कामगिरी
error: Content is protected !!
%d bloggers like this: