Crime branch Police
Crime branch Police
Crime branch Police

crime branch police माटुंगा पोलिसांच्या नेटवर्क ची जबरदस्त कामगिरी

Crime branch Police, matunga success story

crime branch police माटुंगा पोलिसांच्या नेटवर्क ची जबरदस्त कामगिरी

 

Crime branch Police, Matunga success story

 

अंजनी मिश्रा रिपोर्ट

 

 

 

 

5/7/2021

सध्या कोरोना काळात लोकांच्या आर्थिक संकटाच्या काळात गुन्हेगारी चा स्तर वाढत जात आहे, अशा परिस्थितीमध्ये ज्यांची पार्शवभूमीच गुन्हे गारीशी संबंधित आहे,

अशा लोकांचे मोकाट सुटणे कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान ठरत आहे. अशा गुन्हे गारांच्या मुसक्या वेळीच आवळणे आवश्यक आहे. अँटॉप हिल, बरकत अली दर्गा,

वडाळा गाव, चेंबूर कॅम्प, हे गुन्हेगारी विश्वाचे अड्डे वाढत जात आहेत. २००७ साली आर आर आबा गृहमंत्री असताना वडाळा भागातून दहशतवादी पकडले होते.

आज याच छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये आंतराष्ट्रीय गुन्हेगारीचे हात पोहोचलेले असतात. IPS वाय.सी.पवार यांनी वरदा राजन मुदलियार गॅंग च्या मुसक्या इथेच आवळल्या होत्या.

माटुंगा पोलीस स्टेशन ची वेगळीच ओळख निर्माण केली होती तीच कामगिरी माटुंगा Crime branch Police पोलीस क्राईम ब्रांच टिकवून आहे. लहान मोठा गुन्हा काही हि असो रात्री

रात्री गुन्हेगारांच्या मुसक्या माटुंगा पोलिसांनी आपल्या नेटवर्क ने आवळल्या आहेत.

दिनांक २/७/२१ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टॅक्सी चालकाला अनोळखी इसमाने जबरी चोरी

करण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्यावरून माटुंगा पोलीस ठाण्यात गु.र.क्र ४२०/२१ कलम ३०७, ३९४

भा.द.वि. प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा नोंद झाल्याची माहितीवरून Crime branch Police गु.प्र.शा. गुअ.वि. कक्ष ४ चे पोलीस पथक नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा अहोरात्र मेहनतीने शोध घेत होते.

मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून व गुप्त बातमीदांच्या मदतीने नमूद आरोपीचा शोध घेत असताना आज पहाटे १.३०. वाजण्याच्या सुमारास

स.पो.नि. बिराजदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की, नमूद गुन्ह्यातील पाहीजे आरोपी हा बंगालीपूरा वडाळा

परीसरात लपून बसला आहे. मिळालेल्या खबरीवरून स.पो.नि. बिराजदार, स.फौ.राउत, पो.ह.कांबळे ३४२७९, पो.ह. सावंत २८७९०

यांनी नमूद आरोपीचा शोध घेत असताना पाहीजे आरोपी हा २.३० वाजण्याच्या सुमारास रफिक शहा बाबा दर्ग्याच्या बाजूला, लाल मीठ्ठी,

किस्मत नगर, बंगालीपूरा, वडाळा, मुंबई. ३७ या ठिकाणी मिळून आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता नमूद पोलीस पथकाने

त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेण्यात आले व कक्ष कार्यालयात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली

असता त्याचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Crime branch Police
Crime branch Police

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव.

मोहम्मद यासीन मोहम्मद शफी शेख. वय २३ वर्ष. रा.ठी. रू.नं. ५८०, न्यु ट्रांझिट कॅम्प, मिरा दातार दर्गा, बंगालीपूरा वडाळा मुंबई ३७.

नमूद आरोपीस कायदेशीर पूर्तता करून माटुंगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देत आहोत.

नमूद आरोपीचा अभिलेख तपासला असता इतर अभिलेख मिळून येत नाही.

पो.नि. इंद्रजीत मोरे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
car parking rules in housing society पार्किंग बद्दल हे नियम आणि कायदे
car parking – पार्किंग नियम आणि कायदे
error: Content is protected !!
%d bloggers like this: