Crime Branch
Crime Branch
Crime Branch

Crime Branch स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी

Crime Branch जिल्हा अंतर्गत मोटार सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद

Crime Branch स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी

 

Crime Branch जिल्हा अंतर्गत मोटार सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद

 

 

 

 

दिनांक 01.07.2021

Crime Branch स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी

जिल्हा अंतर्गत मोटार सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगारास जेरबंद करून 39 मोटार सायकली जप्त

मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री अतुल झेंडे यांनी सोलापूर ग्रामीण

जिल्हयामध्ये मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघड करणेबाबत

आदेशित केले होते. त्याप्रमाणे Crime Branch  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली तपास

पथक जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणारे आरोपींच्या मागावर होते.

त्यामध्ये दिनांक 30/06/2021 रोजी Crime Branch  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री सर्जेराव पाटील यांना पंढरपूर

येथील एक इसमाकडे चोरीची मोटार सायकल असल्याबाबत खात्रीशिर गोपनिय माहिती मिळाली होती. दरम्यान पंढरपूर

शहरात मालविषयी गुन्हयाचे उकल करणेकामी पेट्रोलिंग करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अमित सिदपाटील

यांच्या नेतृृत्वातील तपास पथकास सदरची मिळालेली बातमी सांगुन त्यानुसार कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

त्यावरून पोसई/अमित सिदपाटील यांनी त्यांचे सोबत असलेले तपास पथकातील अंमलदार यांचेसह सदर मिळालेल्या

बातमी नुसार एका इसमास ताब्यात घेवुन त्याला विष्वासात घेवुन कौशल्यपुर्ण तपास करून याचे कडुन 39 दुचाकी

मोटार सायकली एकुण किंमत 21,45,000/- रूपये किंमतीचे जप्त केले आहेत. सदर आरोपीने जिल्हयात व

परजिल्हयात केलेले पुढील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

एकुण जप्तकरण्यात आलेल्या मोटार सायकली – 39

1. सोलापूर ग्रामीण -10
2. सोलापूर शहर – 04
3. पुणे जिल्हा -11
4. सातारा – 05
5. अहमदनगर – 01
6. सांगली – 01
7. कोल्हापूर – 01
8. बीड – 01
9. इतर – 05

सदर आरोपीस सध्या वळसंग पोलीस ठाणेकडील गुरनं 298/2021 भादंवि क 379 या गुन्हयात वर्ग करण्यात आले आहे.

सोलापूर Crime Branch स्थानिक गुन्हे शाखे च्या वतीने वरील गुन्ह्यातील आरोपीला मोठ्या शिताफीने पकडलयानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांबद्दल

आपल्या संवेदना व्यक्त केल्या. कारण एक एक पैसा जमा करून काही लोकांनी गाड्या घेऊन आपली स्वप्ने पूर्ण केली होती.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे याचे मार्गदर्शनाखाली

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक/अमित सिदपाटील,

पोहवा/राजेश गायकवाड, दिलीप राऊत, श्रीकांत गायकवाड, विजयकुमार भरले, सलीम बागवान, पोना/हरिदास पांढरे,

रवि माने, पोकाॅ/सचिन गायकवाड, चालक पोना/ केशव पवार यांनी बजावली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
first lady doctor in the India - first lady doctor rakhamabai raut
first lady doctor in the India – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत
error: Content is protected !!
%d bloggers like this: