Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

dada kondke hits – दादा कोंडके

1 Mins read

dada kondke hits – दादा कोंडके

 

dada kondke hits – दादा कोंडके

 

 

बाबांचा (भालजी पेंढारकर ह्यांचा) हा स्वभाव कोल्हापुरातील प्रत्येक रिक्षावाल्याला माहीत होता. त्यामुळे बाबा खिशातून काढून जितके पैसे त्यांच्या हातावर टेकतील तेवढे घेऊन ते निघून जायचे.

पण बाबांच्या या स्वभावामुळे, आयुष्यात त्यांचे स्वत:चं तर फार नुकसान झालंच; पण आपल्या बायकामुलांच्या बाबतीतही त्यांनी अव्यवहारी वागावं याचं मला नवल वाटतं. एकेकाळी खूप वैभव असूनही, आपल्या पश्चात बाबांनी बायकामुलांसाठी फारशी प्रॉपर्टी करून ठेवली नाही. त्यांच्या अव्यवहारी स्वभावामुळेच त्यांनी आपला स्टुडिओ घालवला. आजही त्यांचा कोल्हापूरचा स्टुडिओ, अकरा एकर जमीन, बंगला सर्व लताबाईंच्या (मंगेशकर) ताब्यात आहे. बाबांचा स्टुडिओ त्यांना परत मिळावा म्हणून मी लताबाईंचा रोष पत्करला.

कधी काळी बाबांना पैशांची गरज होती म्हणून लताबाईंनी बाबांना पासष्ट हजारांची मदत केली होती व तेव्हा बाबांनी आपली अकरा एकर जमान, स्टुडिओ व बंगला सर्व प्रॉपर्टी लताबाईंच्या ताब्यात दिली होती. बाबाच्या प्रत्येक वाढदिवसाला लताबाई सांगायच्या की, बाबांची ही जमीन मी त्याना
परत द्यायला तयार आहे. परंतु लताबाई-आशाबाईंचा स्वभाव मला चांगला माहीत असल्यामुळे मी बाबांना नेहमी म्हणायचो, ‘बाबा, लताबाई खोटे बोलतात. ‘ नाही हो, तुमचे उगाच काहीतरी’ बाबा म्हणायचे.

बघा बाबा, त्या तुम्हाला काहीही परत देणार नाहीत.’ देईल हो.’ बाबांचा लताबाईवर फार विश्वास होता. १९७४-७५ ची गोष्ट

असेल. एक दिवस बाबांशी गप्पा मारीत असताना स्टुडिओचा विषय निघाला. बाबा नेहमीप्रमाणे म्हणाले, ‘लता स्टुडिओ परत द्यायला तयार आहे.”

‘तुम्ही विचारून बघा त्यांना’ मी.

‘बरं, तुम्ही सांगता म्हणून मी विचारतो. पण जर तिने स्टुडिओ, जमीन परत दिली तर तुम्हाला गप्प बसावं लागेल.’

‘बाबा, मी नुसता गप्प बसणार नाही, लताबाईंचे पाय धरेन.’ मी म्हटलं. त्यानंतर मग एक दिवस लताबाई कोल्हापूरला आल्या असताना, बाबांनी त्यांना विचारलं, ‘तुझ्याकडून स्टुडिओ परत घ्यायचं म्हटलं तर तुला किती पैसे द्यावे लागतील?’

दीड लाख रुपये,’ लताबाई म्हणाल्या.

बाबांनी लगेच मला सांगितलं, ‘बघा, लता दीड लाख रुपये घेऊन स्टुडिओ परत द्यायला तयार आहे. ‘चांगली गोष्ट आहे. दीड लाख रुपये मी देतो.’ मला मनापासून आनंद

झाला, बाबांना त्यांचा स्टुडिओ परत मिळणार म्हणून.

‘मुलाने बापाला पैसे द्यायचे नाहीत, बापाने मुलाला द्यायचे.’ ‘पण बाबा, मुलाचंही काही कर्तव्य असतं की नाही? मुलगा जेव्हा कर्तृत्ववान

होतो तेव्हा तो वडिलांना काहीतरी देतोच की नाही?’ ‘त्याने वडिलांना प्रेम द्यावं.’ बाबा म्हणाले.

बाबांना माझ्याकडून पैसे घेणं योग्य वाटत नव्हतं. त्यांना पैसे देण्यात माझा काहीच स्वार्थ नव्हता. फक्त त्यांचा स्टुडिओ त्यांना परत मिळावा एवढीच माझी इच्छा होती. मी त्यांना म्हटलं, ‘माझ्याकडून पैसे घेणं तुम्हाला पटत नाही

ना, मग तुम्ही बाहेरून पैसे मागवा.

‘ठीक आहे.

कोल्हापूरचे उद्योगपती लोहिया बाबांचे खास मित्र. बाबांनी त्यांना फोन केल्यावर, दहा मिनिटांत लोहियांचा माणूस दीड लाख रुपये घेऊन बाबांसमोर हजर झाला. लताबाई त्या वेळी स्टुडिओतच होत्या. बाबांनी लगेच ते दीड लाख रुपये लताबाईंच्या हवाली केले. ‘लता, हे दीड लाख रुपये घे.’

कुठून आणलेत हे पैसे बाबा?’ लताबाईंचा प्रश्न.
बाबा कधीही खोटं बोलत नव्हते. त्यांनी लताबाईंना खरं सांगितलं. ‘लोहियांकडून मागवले. ‘

‘का म्हणून? मी असताना तुम्ही लोहिया शेठकडून पैसे का आणलेत? दुसर्यांचे पैसे मला नकोत.’ असं म्हणून लताबाईनी ते पैसे घेण्यास नकार दिला.

त्यानंतर एक महिन्याने बाबांनी मला सांगितलं की, लताचा फोन आला होता आणि ती सांगत होती की तिच्या सीएच्या मते स्टुडिओ जमिनीची व्हॅल्युयेशन आता साडेतीन लाख रुपये झाली आहे. त्यामुळे तिने माझ्याकडून जर दीड लाख रुपये घेतले तर इन्कम टॅक्सचं लफडं होईल. साडेतीन लाख रुपये किंमत होतेय् यू आता.

मी बाबांना विचारलं, ‘आता काय करायचं बाबा?

तुमच्याकडे माणसं ओळखायची ताकद आहे चिरंजीव. ‘

तरीही मी साडेतीन लाख रुपये बाबांकडे घेऊन गेलो साडेतीन लाख तर

साडेतीन लाख, बाबांचा स्टुडियो तर परत मिळाला असता. पण त्या वेळीही

बाबा पैसे घ्यायला तयार होईनात. ‘तुमच्याकडून पैसे घेणं मला योग्य वाटत नाही. यापुढे तुम्ही मला बाबा म्हणू नका भालजी म्हणा. ‘बाबा, मी हे पैसे तुम्हाला उसने देतोय असे समजा. मी शूटिंगसाठी तुमच्या स्टुडिओची प्रॉपर्टी वापरतो ना. मग त्या भाड्यातून आपण पैसे वसूल करून

घेऊ.’

बाबांना माझं म्हणणं पटलं असावं. ते पैसे घ्यायला तयार झाले. पण साडेतीन लाख रुपये घेऊनसुद्धा लताबाई स्टुडिओ-जमीन परत द्यायला तयार होतील की नाही याची मला शंका वाटत होती. मी बाबांना तसं बोलून दाखवलं. ‘बाबा, आता तरी लताबाई स्टुडिओ देतील ना?’

‘आता कशी देणार नाही? ती बोलली आहे ना साडेतीन लाख रुपये किंमत आहे म्हणून.’

लता आज येणार आहे, उद्या येणार आहे असं बाबा रोज सांगत होते. पण लताबाई आल्या आठ-पंधरा दिवसांनंतर. बाबांनी साडेतीन लाख रुपये त्यांच्यापुढे ठेवले.

‘कुठले पैसे?’ लताबाईंचा पुन्हा तोच प्रश्न. ‘दादांनी दिलेत. ( dada kondke hits )

दादांकडून का घेतलेत? तुमचे पैसे असतील तरच मी घेईन. ‘ लताबाईंचा हा बालिशपणा आहे की चतुरपणा? मी संभ्रमात पडलो. बाबा काय समजायचे ते समजले असावेत. लताबाई गेल्यावर मला ते म्हणाले,
‘चिरंजीव, काही गोष्टीत आम्ही अगदी नालायक आहोत. तुमचे ठोकताळे बरोबर असतात म्हणूनच तुम्ही टिकला आहात.’ आणि त्यांनी ते साडेतीन लाख रुपये मला परत केले.

 

Also Visit : https ://www.postboxlive.com

‘बाबा, लताबाईना अजून पैसे हवे आहेत का?’

बाबा काहीच बोलले नाहीत. पण मलाच राहवलं नाही म्हणून बाबा जायच्या दोन-तीन वर्ष आधी त्यांचं लताबाईंशी यासंदर्भात काय अॅग्रिमेंट झालं आहे याची मी कलेक्टरच्या ऑफिसात जाऊन माहिती काढली. बाबांच्या पडत्या काळात लताबाईंनी त्यांना पासष्ट हजारांची मदत केली होती. म्हणून स्टुडिओ, जमीन वगैरे लताबाईंच्या ताब्यात होती व तेव्हापासून स्टुडिओचं सर्व उत्पन्न लताबाईंकडे जात होतं. फक्त स्टुडिओमधल्या प्रॉपर्टीच्या सामानाचं भाडं बाबांना मिळत होतं. ही सर्व माहिती मिळाल्यावर मी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो व त्यांना म्हटलं, ‘बाबांची इच्छा आहे की, त्यांचा स्टुडिओ त्यांना परत मिळावा. तो लताबाईंकडे अडकला आहे.

मी लताबाईंना नकिलातर्फे नोटीस द्यायचं ठरवलं. पण बाळासाहेब मला म्हणाले, ‘मला माझा स्टुडिओ परत मिळावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला याबाबत मदत केलीत तर बरं होईल, ‘ अशा आशयाचं एक पत्र बाबांना मला द्यायला सांगा. उगाच शिवसेना बाबांचा स्टुडिओ बळकावते आहे असं कुणाला वाटायला नको. केवळ त्यांची इच्छा आहे म्हणून मी मदत करेन एवढंच.

बाबांची दृष्टी अधू झाली होती. त्यांना लिहायचा त्रास नको म्हणून तशा आशयाचं पत्र मीच तयार केलं व ते घेऊन बाबांकडे गेलो. बाबांनी ते पत्र दुसऱ्या एका व्यक्तीकडून वाचून घेतलं आणि ते मला म्हणाले, ‘थांबा, प्रभाकरला येऊ द्या.

‘येऊ द्या ना, माझी काहीच हरकत नाही.’

माझे शूटिंग सुरू होतं म्हणून मी कोल्हापुरातच थांबलो. प्रभाकरपंत ( पेंढारकर) आल्यावर बाबांनी ते पत्र त्यांना दाखवलं. मी त्यांना स्टुडिओत भेटायला गेल्यावर पंत बाबांना म्हणाले, ‘मी स्टुडिओकडे बघणार नाही. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघा.

“पण पंत, तुम्ही स्टुडिओ तर ताब्यात घ्या, ‘ मी म्हणालो. ‘काय ताब्यात घ्या? आणि त्याचा खर्च कुणी भागवायचा?’

“ते आपण नंतर बघू, तुम्ही स्टुडिओ ताब्यात तर घ्या आधी.’ पण दादा, स्टुडिओ ताब्यात घेण्यापाठी तुमचा हेतू काय आहे?’ प्रभाकर

मला विचारलं.

पंतांनी

‘माझा हेतू काय असणार? काहीच नाही. मी इथे शूटिंग करतो व त्याचे पैसे देतो.’ ( dada kondke hits )

‘कालांतराने तुम्हाला इथे जम बसवायचा आहे का?’ पंतांच्या या बोलण्याचा मला खूप राग आला. पण राग आवरून मी त्यांना म्हटलं, ‘काय आहे पंत बाबांचा मुलगा म्हणून तुम्ही असं बोलू शकलात. पण तुमच्या जागी दुसरा कुणी असता तर मी दोन मिनिटात कानाखाली काढली असती त्याच्या.

बाबा सर्व प्रकार ऐकत होते. ते मला एवढंच म्हणाले, ‘दादा, गप्प बसा. त्यानंतर प्रभाकरपंतांनी, मी बाबांना लिहून दिलेलं पत्र फाडून टाकलं व ते निघून गेले. बाबांना स्टुडिओ परत मिळावा यात खरोखरच माझा कसलाही स्वार्थ नव्हता. पंतांचे ते बोलणं माझ्या मनाला खूप लागलं. त्यामुळे पुन्हा स्टुडिओचा विषय काढायचा नाही असं मी ठरवलं.

बाबा आता हयात नाहीत. पण ते जिवंत असेपर्यंत त्यांचा स्टुडिओ त्यांना परत मिळाला नाही. ज्या माणसाने एवढं मोठं वैभव उभं केलं, त्यालाच ते मिळू नये याचे वाईट वाटतं. मुलगा म्हणून मला त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही हे शल्य आजही माझ्या मनाला फार बोचतं. ( dada kondke hits )

 

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!