Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Delta plus variant – तिसऱ्या लाटेत कोरोना संक्रमण अधिक घातक

1 Mins read

Delta plus variant तिसऱ्या लाटेत कोरोना संक्रमण अधिक घातक

 

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीला (एनआयव्ही) कोरोना विषाणूचा B.1.1.28.2  व्हेरियंट सापडला आहे.

 

11/6/2021,

दुसऱ्या कोरोना Delta plus variant संक्रमणाच्या लाटेमध्ये भारत देश सावरत असतानाच वैद्यकीय आरोग्य तंज्ञानी तिसऱ्या लाटे

साठी सुद्धा सतर्कता बाळगणे आवश्यक सांगितले आहे, तिसरी लाट म्हणजे नेमकी काय ? हे देशातील नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.

सामाजिक अंतर आणि लसीकरण या बरोबर दैनंदिन आयुष्य जगताना गाफील राहता कामा नये. कोरोना विषाणू हा स्वतःच्या जगण्यासाठी

मानवी शरीरात प्रवेश करत असतो. आपले सरंक्षण आणि अस्तित्व टिकविण्यासाठी तो आपल्या जनुकीय बदल घडवून आणत अधिक तीव्र प्रसार आणि घातक बनत जातो.

देशात एक लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. ही मागील दोन महिन्यातील सर्वात कमी वाढ होती. रुग्णसंख्या घटत असल्यामुळे

दिलासा मिळाला होता पण कोरोनाचा नवीन व्हेरियंट Delta plus variant आढळल्यामुळे चिंता वाढली आहे.

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीला (एनआयव्ही) कोरोना विषाणूचा B.1.1.28.2 Delta plus variant व्हेरियंट सापडला आहे.

ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या दोन जणांमध्ये हा व्हेरियंट आढळून आल्याचं समोर आलं आहे. दोघांमध्ये आढळलेल्या

या नव्या व्हेरियंटची जिनोम सिक्वेसिंग आणि परीक्षण करण्यात आले. कोरोनातून बरे होईपर्यंत दोन्ही जणांमध्ये लक्षणे दिसत नव्हती.

परंतु यांच्या नमुन्याच्या सिक्वेसिंगनंतर B.1.1.28.2 Delta plus variant व्हेरियंट असल्याचे आढळले.

B.1.1.28.2 हा नवीन कोरोना व्हेरियंट भारतात असलेल्या आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे.

B.1.1.28.2 या नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लागण झालेल्यांना गंभीर आजार होऊ शकतात, असंही समोर आलं आहे. या व्हेरियंटची उंदरावर चाचणी करण्यात आली.

यामध्ये अतिशय गंभीर असे आजार दिसून आले आहेत. यामध्ये वजन घटणं, श्वसन नलिकेत विषाणूची कॉपी तयार होणं,

फुफ्फुसाचं अतिशय जास्त नुकसान होणं, यासारखा गंभीर बाबी दिसून आल्या. B.1.1.28.2 या व्हेरिएंट विरोधात लस प्रभावी ठरू शकते

की नाही यासाठी स्क्रिनिंग करण्याची गरज असल्याचं एनआयव्हीनं सांगितलं आहे.

B.1.1.28.2 यावर एनआयव्हीनं केलेला अभ्यास bioRxiv मध्ये प्रसिद्ध झाला आहे. पुणे एनआयव्हीनं केलेल्या आणखी एका

अभ्यासानुसार B.1.1.28.2 व्हेरिएंट विरोधात कोवॅक्सिन प्रभावी आहे. कोवॅक्सिनचे दोन डोस घेतल्यावर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात.

या अँटिबॉडीज या व्हेरिएंटला निष्प्रभ करण्यास सक्षम आहे

Leave a Reply

error: Content is protected !!