Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

divide synonym – let’s delegate – स्मार्ट कामाचा फंडा

1 Mins read

divide synonym – let’s delegate – स्मार्ट कामाचा फंडा

 

 

divide synonym – कामाची विभागणी आणि वाटप 

 

 

 

कावेरी ही  तिच्या विभागाची प्रमुख होती.महत्वाची जबाबदारी म्हणजे त्यासोबत येणारा कामाचा दबाव , प्रयेक गोष्टीसाठी असलेली वेळेची मर्यादा हे ओघाने आलचं. ह्या सर्वांचा कधीचं तिच्या कामावर ,वागण्यावर परिणाम झाला नाही .तिचे टीम मेंबर्स कायम तिच्या पाठीशी आणि सदैव तिच्या मदतीला तयार असायचे . सर्व कर्मचाऱयांना कामाची वीभागणी करुन कामं सोपवणे (वाटप ) हे  कावेरी अतिशय जबाबदारी करायची .एकदा जबाबदारी दिली की त्या व्यक्तीला ती निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायची.कारणं  नसताना त्याच्या कामात ढवळा-ढवळ करणं ह्यापासून दूर राहायची. एखाद्याला काही समस्या असेल ,मदत हवी असेल तर ती मात्र खूप सहजतेने करायची.कामाचं सर्व श्रेय ती त्या त्या कर्मचाऱ्यांना द्यायची. कौतूक करण्यात कधीचं हात आखडता घयायची  नाही .हयामुळे तिची टीम नेहमी चांगल्या दर्जाचे काम वेळेवर करण्यात नेहिमीचं आघाडीवर असायची. तिचे वरिष्ठ पण खुश आणि सहकारी सुद्धा!

आपण इंग्लिश मध्ये delegation हा शब्द वापरतो. अगदी साध्या ,सोप्या  भाषेत सांगायचं तर कामाची divide synonym विभागणी करून आपल्या सहकारी, कर्मचारी ह्यांमध्ये कामाचे वाटप करणे, कामाचे sharing करणे .ज्यामुळे एकाचं व्यक्तीवर पूर्ण कामाचा भार  येणार नाही आणि काम वेळेत,चांगल्या प्रकारे पुरे करता येईल. ह्यामुळे अधिकारी इतर महत्वाचे , जास्त प्राधान्याची कामे करू शकतात ,कर्मचारी अतिरिक्त जबाबदाऱ्या घेऊन नवीन कामे शिकू शकतात .एकप्रकारे त्यांना कामावर कामाचे प्रशिक्षणचं मिळतं म्हणा ना !

ह्या गोष्टींची काळजी घेतली तर हे सहज शक्य आहे :

1. काम पूर्ण करण्यासाठी योग्य ते अधिकार द्या  व तसेच जबाबदारी निश्चित करा .

2. आपला संवाद/संभाषण हे स्पष्ट ठेवा . कामाची दिशा (डायरेक्शन)  द्या. पारदर्शकता असू द्या.

3. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या ,गरज असेल तिथे मदत करा ( मी आहे हे सदस्याला नेहमीचं कामासाठी आश्वासकता देतं असतं ).

4. नियोजनानुसार प्रत्यक्षात कामं होते आहे किंवा नाही हे बघा ( Feedback/follow-up). कामाचा आढावा घ्या.

5. आपल्या सदस्यांवर विश्वास दाखवा . संधी तर द्या .

6. कोणाची काय क्षमता आहे, सामर्थ्य आहे तसे कामाचे वाटप करा.

7. आपल्या टीम मेम्बर्सला आपली गरज असेल तर नक्की  वेळ द्या.

8. नक्की काय ,कसं करायचे ते व्यवस्थित step by step सांगितलं तर खूप चांगला परिणाम मिळू शकतो,

9. सूचना (Instructions) समजावून सांगा. हे कर आणि हे असं करता येईल ह्यामध्ये खूप फरक आहे.

10. आपलं कामाचं स्वरूप समोरच्याला कळलं आहे की नाही ह्याची खात्री करून घ्या.

11. गरज नसताना हस्तक्षेप / ढवळा – ढवळ / लुडबूड  टाळा .

12. जाहीरपणे, सर्वासमोर सद्यस्यांचे कौतुक करा, त्यांना प्रोत्साहित करा, कामाचे श्रेय द्या .

divide synonym कामाच्या वाटपाचा  सगळ्यांनाच फायदा होतो. मॅनेजर त्याचा वेळ  चांगल्या प्रकारे जास्त महत्वाच्या कामासाठी वापरू शकतात. त्याचा स्वतःचा कामांचा ताण कमी व्हायला मदत होते. कर्मचारी हे त्यांचे व्यावसायिक ज्ञान आणि  कौशल्य विकसित करू शकतात. ज्याच्या जश्या क्षमता आहे ,कौशल्ये आहे तसे काम सोपवले की कार्यक्षमता ( Efficiency ) वाढते, उत्पादकता ( productivity ) वाढते. जबाबदारी आणि अधिकार  ह्यामुळे त्या कर्मचाऱयांना सुद्धा एक हुरूप येतो ,कंपनीबद्दल आपलेपणाची भावना रुजते . ह्या सगळ्यांचा  एकत्रित परिणाम म्हणजे कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते.

ह्यासाठी वरिष्ठानीं सगळं स्वतः करण्याची वृत्ती बाजूला ठेवली पाहिजे. मला सगळं येतं ,माझ्यासारखं कोणाला जमणार आहे का ? असं चालत नाही .प्रत्येक ठिकाणी स्वकेंद्रित राहिलो तर आपली प्रगती होईल पण कंपनीच्या वाढीसाठी ते योग्य नाही. आपल्या हातून नियंत्रण जाईल ही भीती पण चुकीची ,तुमच्यावर पण कधी तरी कोणी विश्वास दाखवला म्हणून आज तुम्ही त्या ठिकाणी आहात हे विसरून चालणार नाही.तुम्हाला जर वरच्या जागेवर जायचे आहे तर आपल्या कर्मचाऱयांना प्रशिक्षित करणं जरुरी आहे .सगळं मीचं करणारं हा हट्ट सोडून let’s learn to delegate.
कामे सोपवा आणि करून घ्या !

 

www.postboxindia.com

www.postboxindia.com

मेघना धर्मेश
9321314782

Leave a Reply

error: Content is protected !!