Dr BR Ambedkar wife name
Dr BR Ambedkar wife name
Dr BR Ambedkar wife name

Dr BR Ambedkar wife name – रमाई डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची साऊली.

Dr BR Ambedkar wife name - रमाईंना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Dr BR Ambedkar wife name – रमाई डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची साऊली.

 

 

Dr BR Ambedkar wife name – रमाईंना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

27/5/2021,


महामानव डॉ. बाबासाहेबांच्या कठीण काळात पत्नी रमाबाईंनी त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोध्दारासाठी कार्य करू शकले.


त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी शोषलेल्या गरिबीच्या चटक्यांचा, प्रसंगी आपल्या ईच्छा-अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही.

रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब कुटुंबात झाला. त्यांची आई त्यांना प्रेमाने रामी म्हणायच्या.

रमा लहानपणापासूनच खूप समझदार, प्रेमळ आणि घरकामात खूप हुशार होत्या. बालपणीच त्यांचे आई-वडिल मरण पावले. लहानपणीच आई-वडिलांच्या

प्रेमाला पारखी झालेली रमा तिच्या भावंडासोबत मामाकडे मुंबईला राहायला आली.

त्या काळामध्ये अगदी अल्पवयात लग्न व्हायची. रामजी सुभेदार यांनी भिमासाठी Dr BR Ambedkar wife name रमाची निवड केली.

रमा अवघ्या नऊ वर्षांच्या असताना १९०७ मध्ये मुंबईतील भायखळा येथील भीमरावांशी विवाह झाला. रमाई रामजी बाबांची लाडकी सून रमा झाली.

महापुरूषांचे व्यक्तिमत्त्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते. असे म्हटले जाते की,प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो.

मग ती आई किंवा पत्नी असू शकते. बाबासाहेबांना रमाईंची साथ नसती तर कदाचित भिवाचा भीमराव झाले नसते. स्त्री ही जशी गृहिणी

तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही आहे. युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात, दारिद्र्यांच्या खोल दरीत

असलेला संसाराचा गाडा ओढणारी, सहचारिणी पत्नी रमाई म्हणजे चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही.

रमाईची मुले औषधांविना मरण पावली. रमाईने अपार कष्ट केले. शेणाच्या गोवऱ्या थापल्या. त्या विकून आलेला पैसा घरखर्चासाठी तसेच

बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी खर्च करीत. एक काडीपेटी महिनाभर चालवली. रमाईला शेजारच्या महिला दागिण्यांवरून चिडवित असत.

तेव्हा रमाई म्हणत, ‘माझा दागिणा म्हणजे माझं कुंकू. माझं सौभाग्य.ते असे आहे की ज्याची ख्याती साऱ्या विश्वाला ठाऊक आहे.

’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठेपणाचं असं नेमक्या शब्दात वर्णन करणाऱ्या रमाईंचं हृदय किती संवेदनशील असेल याची आपणास प्रचिती येते.

त्यांच्यातील या शोषिक वृत्तीमुळेच बाबासाहेब आंबेडकर घडू शकले. बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात Dr BR Ambedkar wife name रमाईंना नेसायला लुगडे नव्हते.


तेव्हा बाबासाहेबांनाच मिळालेला फेटा लुगडं म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी ही शोकांतिका. एक बॅरिस्टर आपल्या पत्नीला एक लुगडं घेऊन देऊ शकत नव्हते.

त्याच बाबासाहेबांमुळे आज दलित समाज चांगले वस्त्र अंगावर परिधान करीत आहे.रमाबाई खूप धार्मिक होत्या. रमाईंनी एकदा पंढरपूरला जाण्याचा हट्ट केला

तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले, ‘जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर लोटते तिथे जाण्यापेक्षा आपल्या उभयतांच्या पुण्याईने, स्वार्थत्यागाने,


दलितांच्या सेवेने आपण दुसरे पंढरपूर निर्माण करूयात. आज आपल्या पुढे ते दीक्षाभूमीच्या रूपात नागपूरमध्ये मोठ्या अभिमानाने आणि डौलाने उभे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाखातर रमाई लिहिण्या-वाचण्यास शिकल्या. त्यानंतर बाबासाहेबांच्या सोबतीने त्यासुद्धा

समाजजागृतीसाठी महिलांच्या सभांचे आयोजनकरीत असत. त्यांच्या समोर भाषणे देऊन दलित चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी त्यांना प्रेरीत करीत असत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेण्यासाठी दूरदेशी असताना रमाई आंबेडकरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गरिबीचे चटके सोसत संसार सांभाळला.

आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप हालअपेष्टा, दुःख ,गरिबी यावर मात केली. एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे

यासारखे जगात दुसरे दुःख नाही .रमाईची मुले औषधाविना मरण पावली.रमाईने अपार कष्ट केले. शेणाच्या गोवर्‍या थापल्या.

त्या विकून आलेला पैसा घरखर्चासाठी आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी खर्च केला. एक काडीपेटी त्या महिनाभर चालवत.

रमाईला शेजारच्या महिला दागिण्यांवरून चिडवित असत.तेव्हा रमाई म्हणत,’ माझा दागिना म्हणजे माझं कुंकू .माझं सौभाग्य असे आहे की

ज्याची ख्याती सार्या विश्वाला ठाऊक आहे.’स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती.

बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या

भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत.

स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा,

कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते

त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू.

ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू.

इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला.बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना झालेले मृत्यूसुद्धा रमाबाईंनी कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना

करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.

 घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत .

बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत.

मुलांसाठी उपास करत असत.


अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व

त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत करत.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. Dr BR Ambedkar wife name रमाईला

नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.

ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती.

डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा

समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.रमाबाईंनी अठ्ठावीस

वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या.

बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा.” असे त्या म्हणत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाखातर रमाई लिहिण्यावाचण्यास शिकल्या. समाज जागृतीसाठी महिलांच्या सभांचे आयोजन करू लागल्या.

भाषणे देऊन दलित चळवळीत सहभाग घेऊ लागल्या. रमाई आंबेडकरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गरीबीचे चटके सोसत संसार सांभाळला.

अशा पददलितांच्या आई ता. २७ मे १९३५ ला रमाई ता.२७ मे १९३५ ला जग सोडून जातात.

त्यावेळी प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा प्रसंग पुढीलप्रमाणे- रामू… रामू… असा प्रज्ञेच्या सूर्याने हंबरडा फोडला आणि धाय धाय मोकलून रडू लागला.

रामू तू मला सोडून गेली. तुला मी काहीही सुख दिले नाही. तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्या. फार मोठा त्याग केलास रामू तू. या घटनेचा

बाबासाहेबांच्या मनावर फार मोठा आघात झाला. रमा खरी धनवान आहे रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांच्या जीवनात कधीच भरून न येणारी

पोकळी निर्माण झाली होती. Dr BR Ambedkar wife name रमाईच्या आठवणीने बाबासाहेब व्याकुळ होऊन म्हणत असत- रमा खरी धनवान आहे.

तिची खूप उधारी आहे माझ्यावर. मी कधीच फेडू शकणार नाही. बाबासाहेबांच्या अथांग अंतःकरणात रमाईसाठी एक खास स्थान होते.

त्यांनी आपला ग्रंथ रमाईस अर्पण केला. त्यातील अर्पणपत्रिका अशी- जिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा,

त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता, आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा काळ होता. असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता.

जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले. आणि मजबरोबर तसलेही दिवस कंठले, म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण

ठेवण्यासाठी हा ग्रंथ तिच्या (रामूच्या) स्मृतीस अर्पण करीत आहे.

अशा पददलितांच्या आई माता रमाई यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

रमाई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर


Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
nagpur places to visit
nagpur places to visit – नागभूमीचा प्यारे खान
error: Content is protected !!
%d bloggers like this: