संस्कृती प्रकाशन
संस्कृती प्रकाशन
संस्कृती प्रकाशन

वाचाल तर वाचाल

शिवपत्नी महाराणी, भद्रकाली ताराराणी

वाचाल तर वाचाल. 

पुस्तकाचे नाव :- शिवपत्नी महाराणी
सईबाई
लेखक :- डॅा. सुवर्णा नाईक
निंबाळकर
प्रकाशन :- संस्कृती प्रकाशन
किंमत :- ₹ २५०/-
पृष्ठे :- २०८

‘महाराणी सईबाई’ यांचे चरित्र म्हणजे नाईक निंबाळकर घराण्याची सुकन्या, भोसल्यांची सून, राजमाता जिजाऊ साहेबांची सून, छ.शिवाजी महाराजांची पत्नी व छ. संभाजी राजांच्या मातोश्री अशा विविध अंगाने लेखिकेने सईबाईंच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ २६ वर्षाचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते. त्यात १९ वर्ष त्या छत्रपती शिवाजी राजांसोबत होत्या पण इतिहासांत त्यांच्या विषयी फार नोंदी आल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात त्यांचे स्थान मोठे होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये झाली. पण त्यांचा अकाली मृत्यू झाला.
या पुस्तकात सईबाईंचे माहेर, सासर भोसले घराणे, सईबाईंचे बालपण, छत्रपती शिवाजी महाराज व सईबाईंचे सहजीवन, जिजाऊ साहेब व सईबाई राणीसाहेब यांचे प्रेमळ संबंध, सईबाई राणीसाहेबांचा परिवार व मुलींचे विवाह, सईबाईंचे महानिर्वाण अशा प्रकरणात त्यांच्या चरित्र मांडणीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न लेखिकेने उपलब्ध साधनसामग्रीवर दिलेला आहे.
डॅा. सुवर्णा निंबाळकर यांनी भोसले घराण्यातील राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी सईबाई, महाराणी येसूबाईमहाराणी ताराराणी अशा चार कर्तृत्ववान महिलांवर संशोधनपर चरित्रपर लेखन केले आहे. आपण ते जरूर वाचायलाच हवे..!!!
आपल्या संग्रही हवीतच ही ऐतिहासिक चरित्र..!!

विशेष टीप :- शिवस्पर्श प्रकाशनाची आणि डॅा.आ.ह. साळुंखे व प्रा. मा.म.देशमुख तसेच पुरोगामी चळवळीच्या लोकांनी वाचायलाच हवीत अशी इतर अनेक पुस्तके आमच्याकडे उपलब्ध. जरूर मागवा

परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा. 


पुस्तकाचे नाव :- भद्रकाली ताराराणी
लेखक :- डॅा. सुवर्णा नाईक निंबाळकर
प्रकाशन :- संस्कृती प्रकाशन
किंमत :- २६०/-
पृष्ठे :- २५८

महाराष्ट्रातील ऐतिहासिक कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये ताराराणींचे कार्य अढळ पदावर आहे. जगातील सर्वश्रेष्ठ लढवय्यी, झुंजार व कर्तबगार स्त्री म्हणून ताराराणींची ओळख आहे. वयाच्या अवघ्या २५ शीत वैधव्य आलेले असताना ताराराणींनी स्वराज्य सांभाळले. औरंगजेबासारख्या क्रूर व कपटी सम्राटाशी त्यांनी समर्थपणे दिलेला लढा आपण कधीच विसरू शकणार नाही. स्वराज्यप्रेम, न्याय, प्रामाणिकपणा, नि:पक्षपातीपणा या मूल्यांसाठी त्या सतत संघर्ष करत होत्या. महाराणी ताराबाई या अत्यंत तेजस्वी, तडफदार होत्या. वैधव्याचे दु:ख गिळून ताराराणींनी पदर खोचून हाती तलवार घेतली.
या पुस्तकात मराठेशाहीचा उदय, ताराराणीचे बालपण व उदय, जिंजीहून सुटका, महाराणी ताराराणीचे युध्दतंत्र, पन्हाळ्यावरील आक्रमण व संघर्ष, मोगल-मराठा संघर्ष, बादशहा विशाळगडाकडे, सिंहगडाचा पाडाव, राजगडास वेढा, किल्ले तोरणा, औरंगजेब आजारी, भद्रकाली कोपली, मोगल साम्राज्यावर प्रहार, औरंगजेबाचा मृत्यू, ताराराणी, इंग्रज आणि सिध्दी, शाहूराजांचे दक्षिणेत आगमन, राज्याचा वारसदार कोण ?, ताराराणी व शाहूराजे यांचा रणसंग्राम, करवीर राज्याचे सत्तांतर, वारणेचा तह, रामराजांचा राज्याभिषेक अशा एकूण २९ प्रकरणातून भद्रकाली ताराराणी आपल्या हृदयात एक अढळ स्थान प्राप्त करतात..!!
डॅा. सुवर्णा निंबाळकर यांनी भोसले घराण्यातील राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी सईबाई, महाराणी येसूबाई व महाराणी ताराराणी अशा चार कर्तृत्ववान महिलांवर संशोधनपर चरित्रपर लेखन केले आहे. आपण ते जरूर वाचायलाच हवे..!!!
आपल्या संग्रही हवीतच ही ऐतिहासिक चरित्र..!!

विशेष टीप :- शिवस्पर्श प्रकाशनाची आणि डॅा.आ.ह. साळुंखे व प्रा. मा.म.देशमुख तसेच पुरोगामी चळवळीच्या लोकांनी वाचायलाच हवीत अशी इतर अनेक पुस्तके आमच्याकडे उपलब्ध. जरूर मागवा

परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा. 

-ॲड.शैलजा मोळक
मी वाचक-लेखक # वाचन संस्कृती
शिवस्फूर्ती मीडिया सेंटर व शिवस्पर्श प्रकाशन पुणे
पुस्तके मागवण्यासाठी संपर्क :-
9823627244

9404302705

More Stories
होळकर आणि ध्वज
होळकर आणि ध्वज 
error: Content is protected !!