Drought in maharashtra - Rajarshi Shahu Chhatrapati and Drought and Plague Prevention Work
Drought in maharashtra - Rajarshi Shahu Chhatrapati and Drought and Plague Prevention Work
Drought in maharashtra - Rajarshi Shahu Chhatrapati and Drought and Plague Prevention Work

Drought in maharashtra – राजर्षी शाहू छत्रपती

Drought in maharashtra - राजर्षी शाहू छत्रपती आणि दुष्काळ व प्लेग निवारण कार्य ( १८९६ – ९९ )

Drought in maharashtra – राजर्षी शाहू छत्रपती

 

Drought in maharashtra – राजर्षी शाहू छत्रपती

आणि दुष्काळ व प्लेग निवारण कार्य ( १८९६ – ९९ )

 


iPage site builder banner

१८९६ साली भारतात ना भूतो ना भविष्यती असा मोठा दुष्काळ पडला. कोल्हापूर शहरात आणि

आजूबाजूच्या भागात प्लेगच्या साथीचीही लागण झाली. सन १८९६ – ९९ या काळात पडलेल्या

Drought in maharashtra दुष्काळानं संपूर्ण भारतात १०,००,००० लोक मृत्युमुखी पडले. पण त्यात

कोल्हापूर संस्थानातील एकही व्यक्ती नव्हती. कोल्हापूर संस्थान निव्वळ एकमेव संस्थान होतं, त्या

दुष्काळावर मात करण्यात तेथील राज प्रशासनाला यश आले होते.

या दोन्ही आपत्तींना तोंड देता देता अननुभवी अगदीच तरूण असलेल्या महाराजांची खूपच दमछाक होवू

लागली. पण प्रभावी प्रशासन, कार्यक्षम अधिकारी आणि अनुभवी योग्य सल्‍लागार यांच्या सहाय्याने त्यांनी

या दोन्ही आपत्तींना यशस्वीपणे तोंड दिले. संकट काळात राजा कसा असावा आणि त्याने जनतेला कशी

मदत करावी याचा एक आदर्शच शाहु महाराजांनी घालून दिला आहे. Drought in maharashtra दुष्काळात प्रशासनाने जनतेसाठी

जे जे करायला हवे ते ते त्यांनी केले. मुजोर नोकरशाहीचा विरोध असतानाही या काळात संस्थानचा खजिना

त्यांनी लोकांसाठी वापरला. नव्हे तर तो रिता केला. प्रथम त्यांनी तातडीचे अल्पकालीन उपाय योजले आणि

लगेचेच कायम स्वरूपी दीर्घकालीन योजनाही आखायला सुरूवात केली. दोन्ही उपाय त्यांनी ताबडतोब

अंमलात आणायला सुरूवात केली.


iPage site builder banner

पावसाने १८९६ पासूनच पूर्ण दडी मारली. भूजलसाठा संपला. जमीनी, डोंगरं भेगाळून पिवळेधमक

दिसू लागली. पेरलेल्या बियाण्यांवर पक्षी गुजराण करू लागले. जस जसा वेळ जावू लागला तस तशी

परिस्थिती आणखीनच बिकट बनत चालली. शेतकर्‍यांच्या घरातल्या कणग्या पार मोकळ्या होवून गेल्या.

हातांना काम उरले नाही. दररोजच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. लोक कामाच्या शोधात गावोगावी

भटकू लागले. काहींनी तर गावाला रामराम केला आणि शहराचा रस्ता धरला. जशा दुष्काळाच्या

बातम्या संस्थानातून शाहु महाराजांपर्यंत पोचू लागल्या तसे ते अस्वस्थ झाले.

त्यांनी आपल्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष निरनिराळ्या भागात जावून परिस्थितीची पहाणी करायला आणि

ताबडतोब त्याचा अहवाल दरबारला द्यायला सांगितले. या काळात छत्रपती शाहु स्वत: आपल्या राजवाड्यात

बसून सांगीवांगी माहितीवर विसंबून काम करणारे नव्हते. ते स्वत: जातीने आपल्या संस्थानात फिरू लागले.

ते लोकांशी संवाद साधत होते. त्यांची पीडा त्यांना कळत होती. जमेल तसे ते त्यावर तातडीने उपाय करत होते.

या अस्मानी संकटासमोर मानवी प्रयत्न टिकाव धरतील का ? अशी मनात पाल चुकचुकण्यासारखी परिस्थिती होती.

पण प्रयत्न सोडून चालणार नव्हते. हाच खरा कसोटीचा काळ होता. छत्रपती खंबीर होते. ते जनतेला आणि

आपल्या अधिकार्‍यांना सतत मार्गदर्शन करत होते. उभारी देत होते.

साठेबाजीवर घातला आळा


iPage site builder banner

दुष्काळात Drought in maharashtra लोकांना खायला धान्य आणि प्यायला पाणी लागते. कारण या दोन्ही गोष्टींचीच खरी उणीव

जनतेला जाणवत असते. या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला काही लोक टपलेलेच असतात. तसे ते त्या

काळातही होते. हळूहळू बाजारात धान्याचे दर दामदुप्पट होवू लागले. व्यापार्‍यांनी धान्य

गोदामातून दडवायला सुरूवात केली. काही काळासाठी दुकानातून धान्याचे साठेच नाहीसे होवू लागले.

अडलेल्या प्रजेला मोठ्या प्रमाणात नाडवले जावू लागले. त्यावर नियंत्रण मिळवणे आणि धान्ये भरपूर

प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

छत्रपती शाहु राजांनी धान्याचे भाव न वाढवण्याचे आणि जास्तीत जास्त धान्य लोकांना उपल्बध करून

देण्याचे व्यापार्‍यांना आवाहन केले. व्यापार्‍यांनी खरेदी किंमतीलाच धान्य विक्री करावी, असा आदेश

काढला. तसे केले तर व्यापार्‍यांना तोटा होवू शकतो आणि तोटा सहन करून व्यापारी धान्य विक्री करणार

नाहीत, याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी व्यापार्‍यांचा तोटा संस्थानाच्या कडून भरपाई

करून दिला जाईल असे ही त्या आदेशात नमूद केले.


iPage site builder banner

इतकेच करून ते थांबले नाहीत, तर गरजू प्रामाणिक व्यापार्‍यांना धान्य खरेदी करण्यासाठी दरबाराकडून

बीनव्याजी कर्ज देण्याचीही सोय त्यांनी केली. त्यामुळे धान्याचे भाव थोडे खाली आले. काही व्यापार्‍यांनी

एकत्र येवून एक स्वस्त धान्य दुकान सुरू केले. यातून इतरही काही व्यापार्‍यांनी प्रेरणा घेवून आपापल्या

भागात, गावात स्वस्त धान्य दुकाने सुरू केली. काहींनी खरेदी किंमतीला धान्य विकावयास सुरू केले.

धान्य आढाव्याची केली सुरूवात
संस्थानात धान्य किती उपलब्ध आहे ? ते किती दिवस पुरेल ? याचा आढावा अधिकार्‍यांना घेण्यास

सांगण्यात आले. सत्य परिस्थिती समजल्यावर छत्रपतींनी ब्रिटीश सरकारला सर्व परिस्थितीचा अहवाल

पाठविला आणि त्यांच्याकडून धान्याची मदत मिळवली. त्यावरच न विसंबून रहाता मधल्या काळात त्यांनी

म्हैसूरच्या महाराजांनाही धान्य पुरवठा करण्याची विनंती केली आणि त्यांच्याकडूनही धान्य मिळवले. या

धान्याचे वाटप त्यांनी सहकारी संस्था आणि शासकीय यंत्रणेमार्फत करण्यास सुरूवात केली. ते धान्य

लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोचते की नाही हे महाराज जातीने लक्ष घालून पहात असत. तसेच शेजारच्या इतर

संस्थानातून आणि प्रदेशातून व्यापार्‍यां मार्फत धान्य आणण्यात येतच होते ते वेगळेच.


iPage site builder banner

धान्य बाहेरून आणले, पण ते घेण्याची कुवत लोकांच्यात असावयास हवी. ती खिशात पैसे असल्याशिवाय

कशी येणार ? त्यासाठी लोकांच्या हातांना काम देण्याची गरज होती. धान्य पुरवले पण पाण्याचे काय ?

ते कसे आणणार ? त्याकाळात आजच्या सारखे टँकर नव्हते. रस्त्यांचे जाळे नव्हते. त्यामुळे गावोगावी

लोकांना पिण्याचे पाणी पुरवणे अवघड काम होते. त्याच बरोबर लोकांना काम देणे, रोजगार उपलब्ध

करून देणे ही पण समस्या होतीच. छत्रपती शाहु महाराजांनी या दोन्हीची सांगड घालण्याचा सुंदर आणि

खूप दूरवर परिणाम करणारा उपाय शोधून काढला.

त्यांनी लोकांना त्यांच्या जुन्या विहीरीतील गाळ उपसणे, विहीरी खोल करणे, त्या रूंद करणे अशा कामात

गुंतवून टाकले. जुने बंद पडलेले झरे, काही ठिकाणी गाळ काढल्याने मोकळे झाले. विहीरींना पाणी आले.

काही ठिकाणी खोली व रूंदी वाढल्याने विहीरींची पाणी साठवण क्षमता वाढली. ज्यांना विहीरी काढावयाच्या

होत्या आणि जे त्यासाठी श्रमदान करण्यास तयार होते, त्यांना संस्थानाकडून काही रक्कम देवून, अशा

नवीन विहीरी काढण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे थोडाफार पाण्याचा प्रश्‍न सुटला. पण यातून छत्रपतींनी

मात्र एक चांगला धडा घेतला. या कामांनी तात्पुरता प्रश्‍न सुटला तरी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण

होवू नये, यासाठी काही ठोस काम करण्याची आवश्यकता असल्याचे मनोमन जाणले. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

22 लाख तलाव बांधण्याचे काम हाती घेतले –


iPage site builder banner

दुष्काळी Drought in maharashtra कामामध्ये तात्पुरत्या कामाबरोबरच काही कायम उपयोगाची कामेही घेण्यात येवू लागली.

त्यात विहीरी खण्याबरोबरच नदी नाल्यांना बांध बांधणे, तलाव बांधणे, जुन्या तलावातील गाळ काढणे,

वाहतुकीसाठी रस्ते बांधणे, नदी नाल्यावर पुल बांधणे अशी कामे घेण्यात येवू लागली. संस्थानात

एकूण २२ लाख तलाव बांधण्याचे नियोजन करण्यात आले. संस्थानात पैसा आणि स्थानिक लोकांचे श्रमदान यातून ही कामे करण्यात येवू लागली.

त्याचबरोबर जुन्या तलावातील गाळ उपसून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यात आली.

विशेष म्हणजे यातील अनेक तलाव हे सिंचन तलाव असून त्यावर हजारो एकर जमीन ओलिताखाली

आणण्यात आली. आज ही हे तलाव हे सिंचनाचे काम इमानेइतबारे करतांना दिसत आहेत. या तलावामुळे

आणि बंधार्‍यामुळे गावातील जनावरांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. आपण पाण्याची सोय नेहमी आपल्या

दृष्टीनेच करण्याचा विचार करतो. इतर प्राण्यांचा – पक्ष्यांचा विचार आपण क्वचितच करतो.

शिशुसंगोपनगृहे सुरू केली…

iPage site builder banner

रस्त्यांच्या कामावर येणार्‍या तरूण स्त्री – पुरूषांच्या बरोबर त्यांची लहान मुलेही असत. ती

कामाच्या ठिकाणीच बाजूला झाडाझुडपाच्या सावलीला किंवा उन्हातच ठेवलेली असत. त्यांच्याकडे

पहायला कुणी मोठी व्यक्ती नसे. महाराजांनी हे दृष्य स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. त्यांना खूप वाईट वाटले.

त्यांनी अशा कच्च्याबच्च्यांची काळजी घेण्यासाठी कामाच्या ठिकाणीच शिशुसंगोपनगृहे सुरू केली.

या संगोपन गृहात मुलांची काळजी घेण्यासाठी संस्थानच्या खर्चाने आयांची नेमणूक केली.

त्या मुलांच्या दुधदुभत्याची, खाण्यापिण्याची आणि औषधांची व्यवस्थाही केली.

जनावरांसाठी चारा छावण्यांची संकल्पना जन्मास घातली…

लोकांना जसे जगण्यासाठी धान्य आवश्यक आहे, तसाच जनावरांसाठी चारा आवश्यक आहे.

दुष्काळात चार्‍याचे दुर्भिक्षही मोठ्या प्रमाणात निर्माण होते. संस्थानात फिरत असतांना चारा

पाण्याविना हालहाल होवून मरणारी अनेक दुभती जनावरे आणि बैल शाहू महाराजांनी पाहिले.

त्याने अपार दु:खी झालेल्या शेतकर्‍यांना कसा धीर देणार ?

या विवंचनेने ग्रासले असतांना महाराजांना कल्पना सुचली. ज्यांना केवळ चारा हवा होता त्यांना त्यांनी

संस्थानातर्फे स्वस्त दराने चारा उपलब्ध करून द्यायला सुरू केले. इतकेच करून ते थांबले नाहीत,

तर छत्रपती शाहु महाराजांनी असा फतवा काढला की ज्यांना स्वत:ची जनावरे सांभाळणे कठीण होत आहे

त्यांनी आपली जनावरे संस्थानाच्या छावणीत आणून सोडावीत आणि जेव्हा मालकाला ती परत

न्यावीशी वाटतील तेव्हा त्यांने ती घेवून जावीत.


iPage site builder banner

छावणीत आहेत तो पर्यंत त्या जनावरांचे संगोपन संस्थान करेल. छावणीत सोडलेली जनावरे परत नेत असतांना,

आपली जनावरे दुसर्‍यांनीच नेल्याचे अनेकांना कळले. अशा लोकांना नवीन जनावरे संस्थानातर्फे देण्याची

महाराजांनी व्यवस्था केली. तसेच, छत्रपतींनी संस्थानातर्फे अनेक विभागात जनावरांच्या छावण्या सुरू केल्या,

त्या छावण्यात लोकांना आपली जनावरे आणून सोडण्यास सांगितले. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थानाने घेतली.

ज्यांना आपली जनावरे छावण्यापर्यंत नेणे शक्य नव्हते त्यांना आजूबाजूच्या गावकर्‍यांना सवलत देण्यात आली.

निराधार आश्रमांची स्थापना

जो राजा Drought in maharashtra दुष्काळात जनावरांची इतकी काळजी घेतो तो वृध्द, अपंग, आंधळे, पांगळे, आजारी

रूग्ण व्यक्तींची काळजी घ्यायला कसा विसरेल. अशा दुबळ्या लोकांची काळजी घेण्यासाठी छत्रपती शाहु

महाराजांनी त्यांच्या संस्थानात सन १८९६ – ९७ या काळात एकूण ९ निराधार आश्रम चालू केले.

ते कोल्हापूर बरोबरच गारगोटी, बाजारभोगाव, कटकोळ, बांबवडा, पन्हाळा, गडहिंग्लज, वळीवडे

आणि तिरवडा येथे स्थापण्यात आले. त्यानंतर सन १८९९ – १९०० या काळात आणखीन २ निराधार

आश्रम वडगाव व शिरोळ येथे सुरू करण्यात आले.


iPage site builder banner

या आश्रमांमधून खरोखर गरजू आणि गरीब लोकांनी आसरा घेतला होता. या आश्रमामध्ये त्यांच्या

कपड्या पासून औषधपाण्यापर्यंत सर्व गरजा भागवल्या जात होत्या. या काळात जवळ जवळ ४८,७५०

लोकांनी या आश्रमांचा लाभ उठवला असल्याचे दिसून येते. पण जे या आश्रमापर्यंत पोचू शकत नव्हते त्या

गरजू अपंग, रोगी व्यक्तींचे काय ? महाराज त्यांनाही विसरले नव्हते. अशा लोकांनी त्यांचा शिधा त्यांच्या

घरी पोचता केला जात असे.

सावकारी पाशाला घातला आळा

दुष्काळ Drought in maharashtra म्हटले की खाजगी सावकारांचे सुगीचे दिवस असतात. या काळात शेतकर्‍याला जितका

नाडवता येईल आणि त्यांच्याकडून त्याच्या अशिक्षित पणाचा फायदा घेवून जितके काढून घेता येईल

तितके ते घेत असतात. असा शेतकरी नाडला जावू नये म्हणून छत्रपती शाहु राजांनी सहकारी सोसायट्या

आणि पतपेढ्यांमार्फत शेतकर्‍यांना कर्ज देण्याची सोय केली. जे शेतकरी वेळेत कर्ज फेडू शकत नाही त्यांचे

बैल आणि इतर दुभती जनावरे सावकार ओढून नेत. त्यालाही महाराजांनी फतवा काढून मज्जाव केला.

छत्रपती शाहु महाराजांना माहित होते लोकांच्या हातात पैसा असेल, तर ते आपले प्रश्‍न आपणच सोडवू शकतील.

म्हणून शेतकर्‍यांना शेतासाठी तगाई देण्याची योजना महाराजांनी आखली. त्याच बरोबर कर्मचारी आणि नोकर

लोक जे पगारावर काम करतात त्यांनाही दुष्काळाची झळ पोहचतच असते. तात्पुरत्या वाढत्या महागाईला

तोंड देणे त्यांनाही कठीण जाते. अशा अवस्थेत त्यांच्याकडून मनलावून काम करण्याची अपेक्षा तरी कशी

करणार ? हे ओळखून अशा कामगार नोकर वर्गासाठी धान्याच्या रूपात दुष्काळ भत्ता सुरू केला.

दुष्काळ निवारणासाठी संस्थानच्या प्रशासनात स्वतंत्र कचेरीची संकल्पना-


iPage site builder banner

दुष्काळ निवारणासाठी संस्थानच्या प्रशासनात स्वतंत्र कचेरी उघडणारे कदाचित छत्रपती शाहु महाराज’

एकमेव संस्थानिक असावेत. त्यांनी हुजुर कार्यालयातच ‘दुष्काळ निवारण विभाग’ सुरू केला आणि त्याचे

अधिकार म्हणून संस्थानाच्या दिवणांचीच नेमणूक केली. निव्वळ कोल्हापूरातच कचेरी काढून ते थांबले

नाहीत तर त्यांनी सर्व संबंधित मामलेदार कचेर्‍यांत सुध्दा खास दुष्काळ निवारण विभाग सुरू केला.

त्या विभागामार्फत लोकांना दुष्काळ निवारणासाठी लागणारी उपकरणे, हत्यारे, अवजारे आणि इतर

साधने पुरवली जात. या साहित्याच्या खरेदीवर एका वर्षात त्यावेळी २६,००० रूपयांहून अधिक खर्च

करण्यात आला होता. साधने किंवा उपकरणे नाहीत म्हणून लोकांना शेतीची, विहीरींची किंवा रस्त्याची

कामे देतांना अडचण येवू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जात असे हे यावरून दिसून येते.

भ्रष्टाचाराचे निर्मूलन
रोजगार हमी योजनेत आज चालतो तसाच भ्रष्टाचार त्यावेळी ही संबंधितांनी केला. जे सरळ सरळ सापडले

त्यांना महाराजांनी घरी पाठवले, पण जे गुल्दस्त्यात राहिले त्यांच्यावर वचक बसवण्याची संधी मात्र त्यांनी सोडली नाही.

या अनुभवातून छत्रपती शाहु महाराजांनी काही धडे घेतले आणि आपल्या रोजगार हमी कामाच्या पध्दतीत बदल केले.

जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेतली.


iPage site builder banner

आता त्यांनी असा आदेश दिला की कुणालाही त्याच्या रहात्या गावात दुष्काळाचे कामावर ठेवले जाणार नाही.

त्यांना लांबच्या गावात जावून काम करावे, याचे कारण होते ज्याला खरोखरच कामाची गरज असेल तो कामावर येईल.

तसेच स्थानिक लोकांकडून मस्टरमध्ये होत असलेले घोटाळेही कमी होतील. दुसरा निर्णय होता मजुरी अदा

करण्यासंबंधी. जसे काम केले जाईल त्या प्रमाणेच दाम दिला जाईल असे महाराजांनी जाहीर केले.

एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट जितके ब्रास काम करेल त्यानुसार त्यास मजुरी दिली जाईल.

शेतीशास्त्राचे स्वतंत्र अभ्यासक्रम राबवले

छत्रपती शाहु महाराज केवळ Drought in maharashtra  दुष्काळ निवारणाचे काम करून थांबले नाहीत. त्यांनी दीर्घकालीन

दुष्काळ निवारण योजना राबवण्याचे नियोजन करावयास सुरूवात केली. त्यांना पक्के ठाऊक होते की

आपला शेतकरी कष्टाळू आहे. पण त्याच्याकडे आधुनिक शेतीचे ज्ञान नाही. कारण पुरेसे शिक्षण नाही.

म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर भर दिला. त्यांनी १४ वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींसाठी

प्राथमिक शिक्षण मोफत केले. त्यांनी मुलांच्या शिक्षणाइतकीच मुलींच्या शिक्षणालाही प्राथमिकता दिली.

त्यातही त्यांनी गावपातळीवर दिल्या जाणार्‍या शिक्षणामध्ये शेतीशास्त्राचे स्वतंत्र अभ्यासक्रम राबवले.

जेणे करून शेतकर्‍यांच्या मुलांना व्यावसाईक शिक्षण प्राप्त होईल.

सुधारित शेती अवजारांचे एक ‘संग्रहालय’ स्थापन केले


iPage site builder banner

याच बरोबर महाराजांनी सुधारित शेती अवजारांचे एक ‘संग्रहालय’ स्थापन केले. त्याच्या माध्यमातून

शेतकर्‍यांना लागणारी अवजारे मोफत दिली जात. आधुनिक रासायनिक खते शेतकर्‍यांत वाटली जात.

या आधुनिक गोष्टींचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराजांनी तज्ज्ञ डेमॉन्स्ट्रेटर्स नेमले होते. लोकांचा विश्वास वाढावा

म्हणून महाराजांनी या आधुनिक वस्तुंचा वापर करून शेती कशी करावी हे दाखवण्यासाठी एक नमुना शेत तयार केले.

ते त्यांनी राजाराम हायस्कूलशी सलग्न केले. या सर्वांचा परिणाम लगेच दिसू लागला, शेतकरी या आधुनिक

पध्दतींचा वापर करून शेती करू लागले. देशात कितीही मोठा दुष्काळ पडला तरी कोल्हापूर मात्र बिनधास्त

असते. त्याचे कारण छत्रपती शाहु महाराजांनी राबवलेल्या या सर्व योजना आहेत.

1898 सालच्या अखेरीस प्लेग व एन्फ्लूएंजाची लागण आणि उपाययोजना


iPage site builder banner

प्लेगावर, एन्फ्लूएंजावर आजच्या काळात जशी नेमकी औषधे उपलब्ध आहेत तशी औषधे वीसाव्या

शतकाच्या सुरूवातीस उपलब्ध नव्हती. त्या काळी हे रोग महाभयंकर रोग समजले जात. एकदा प्लेगची साथ आली की कोल्हापूरसारख्या लहान संस्थानात 9 ते 10 हजार माणसे बळी जात. विशेष म्हणजे हे साथीचे रोग दरवर्षी न चूकता येत असत. या रोगावर औषधे माहीत नसत व जी औषधे माहीत असत त्यांचा पुरवठा नीट होत नसे. रूढी, खोट्या समजूती यांमुळे कोणीही रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यायला तयार होत नसे.

1889-99 या सालात प्लेगची लागण फार मोठ्या प्रमाणात संपूर्ण मुंबई इलाख्यात झाली होती. कोल्हापूर संस्थान त्याला अपवाद नव्हते. सुरूवातीला प्लेगची लागण 18 खेड्यांतून झाली. शिरोळ व गडहिंग्लजमध्ये प्लेगचा जोर जास्त होता. प्लेगच्या छायेत या 18 खेड्यांतील जवळजवळ 31,131 लोक वावरत होते. या प्लेगच्या संकटाचे निवारण करणे जास्त त्रासदायक होते.

कारण आधी सुरूवातीला लोकांच्या मनात ज्या भोळ्या, चूकीच्या समजूती होत्या त्या काढून टाकणे आवश्यक होते. त्यानंतर मग प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचा प्रश्न येत होता. प्लेगबद्दल शास्त्रशुद्ध माहीती देणारी पत्रके संस्थानाने विकत घेऊन लोकांमध्ये वाटली होती. कोल्हापूर शहरात देखील दोनदा प्लेगची लागण नजरेस आली होती. परंतू ताबडतोब उपाययोजना केल्याने मूळच उखडून गेले. दळणवळणाच्या वेगवेगळ्या मार्गांवर क्वॉरंटीन स्थापन करण्यात आली. ज्या भागात रोगाची लागण होती त्या भागातील लोकांनी कोल्हापूर शहराकडे येऊ नये यासाठीचे सर्व प्रतिबंधात्मक उपाय शाहूंनी आखले. याचा परिणाम फार चांगला झाला.


iPage site builder banner

आणखी उपाय म्हणून संस्थानातील सर्व जत्रा थांबवण्यात आल्या. दररोज रेल्वेने जे उतारू कोल्हापूर शहरात येत त्यांची वैद्यकीय तपासणी होत असे. पण तरीही काही माणसे अशी होती की, ज्यांना रोगाची संसर्गजन्यता आणि वाईट परिणाम माहीत नव्हते. महाराजांनी यावर उपाय शोधला. अशा लोकांना शोधून काढण्यासाठी 5 ते 15 रुपयांपर्यंतची बक्षिसे जाहीर केली. खेडेगावातील अधिकाऱ्यांना अशी सख्त ताकीद दिली होती की, जर त्यांना दिलेले हुकूम पाळले गेले नाहीत तर त्यांचे उत्पन्न बंद करण्यात येईल आणि अशा तऱ्हेची एक दोन उदाहरणेही घडली.

काहींना तात्पुरते कामावरून दूर करण्यात आले. इतरांनी त्याचा धडा घेतला. घराघरातून जास्त हवा खेळती ठेवण्यात आली. खेडेगावातील लोकांच्या घरावर पहारा ठेवण्यासाठी जास्त लोकांना कामावर घेण्यात आले. गरिबांना रानात झोपड्या बांधण्याचे साहित्य फुकट पुरवण्यात आले. इतरांना मात्र ते विकत दिले गेले. अठरा खेडेगावांत ज्यामध्ये प्लेगचा प्रादूर्भाव झाला होता त्या खेडेगावात एकही माणूस ठेवला गेला नाही. सर्वजणांना शेतात, रानांत झोपड्या बांधून राहण्याचा आदेश सुटला. पोस्टमननासुद्धा रोगग्रस्त भागात जाऊ दिले नाही.

लोकांचे लस टोचून घेण्याचे प्रमाण अत्यल्प होते. लस टोचून घेण्याकडे लोकांचा कल नव्हता. जेव्हा प्लेगचा प्रादूर्भाव शेवटच्या टप्प्यात होता त्या वेळेस महाराजांनी लोकांना लस टोचून घ्यायला उद्यूक्त केले. संस्थानच्या नोकरांना लस टोचून घेण्यासाठी तीन दिवसांची खास रजा देण्यात आली. श्रमाचे काम करणाऱ्यांना प्रत्येकी आठ आण्याचे बक्षीस देण्यात आले. त्यांच्या कुटूंबियांनाही असे बक्षिस देण्यात आले. जे नोकर नव्हते त्यांना चार आण्याचे बक्षीस देण्यात आले. इतरांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सर्वात आधी महाराजांनी स्वतःस लस टोचून घेतली.

1900 साली पडलेल्या Drought in maharashtra  दुष्काळात सुद्धा महाराजांनी फारच चोख व्यवस्था ठेवली होती. त्यावेळचे पॉलिटिकल एजंट जॅक्सन यांनी असे प्रशंसोद्गार काढले-

iPage site builder banner

“ आपल्या संस्थानात दुष्काळ कामाची तरतूद करण्याकडे आपण प्रत्यक्ष जे लक्ष पुरवीत आहात त्याबद्दल आपले प्रयत्न जे यशस्वी झाले आहेत त्याबद्दल मी आपले अभिनंदन करणे अत्यंत जरूरीचे आहे.”

‘द किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ ची स्थापना (1906)
त्यांना माहित होते की आपल्या राज्यात आणि देशात ८० टक्के लोक शेतावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेती सुधारली, तरच देश सुधारेल आणि त्याचे निसर्गाच्या लहरीवरचे अवलंबन कमी होईल. पुन्हा भविष्यात Drought in maharashtra दुष्काळ आला तर त्यावेळी आमचा शेतकरी आजच्या सारखा आगतिक होता कामा नये. तशा नैसर्गिक आपत्तींना तो तोंड देण्यास सदैव तयारच असला पाहिजे. या विचारांनीच त्यांनी ‘द किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली. या संस्थेमार्फत शेतकर्‍यांच्या मुलामुलींना सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, उपकरणे साधने आणि आधुनिक शेती पध्दतींची माहिती करून देण्याची त्यांची योजना होती.


iPage site builder banner

 

राजर्षी शाहू छत्रपती आणि दुष्काळ निवारण कार्य
डॉ. अनिलराज जगदाळे
जलोपासना, दिवाली विशेषांक, 2014 मधील लेख (७० टक्के भाग)

शाहू चरित्रातून काही संदर्भ यात एड केले आहेत.

शाहू राजांना विनम्र अभिवादन


iPage site builder banner

Advertisement

More Stories
moropant
moropant – आज मोरोपंतांचे पुण्यस्मरण (१७९४) अभिवादन
error: Content is protected !!
%d bloggers like this: