essay on stress management
essay on stress management
essay on stress management

essay on stress management – ताण – तणावाचे व्यवस्थापन – २

essay on stress management - ताण - तणावाचे व्यवस्थापन - २

essay on stress management – ताण – तणावाचे व्यवस्थापन – २

 

 

essay on stress management – ताण – तणावाचे व्यवस्थापन – २

 

 

 

 

 

पैशाच्या /यशाच्या पाठी लागायचं की  आपले प्राधान्य काय आहे हे  ठरवायचे? ताण -तणावामुळे आपल्याला मानसिक समाधान/सुख  मिळणार नाही आणि आपण सुखी असण्यापेक्षा कायम वैतागलेले / थकलेले/चिडलेले राहू  ,नाही का ? आयुष्याची धावपळ, जगण्यातली स्पर्धा ह्या सगळ्यात ताण -तणाव हा आपला आयष्याचा एक भाग होऊन जातो. कामाच्या आघाडीवर आपणं बऱ्याच गोष्टी  नीट  plan  केल्या ,स्वतःला शिस्त लावली,वेळेचं व्यवस्थापन केले तर अर्धी बाजी  जिंकलीचं  म्हणा ना . आता आपल्याला हे बघायचे आहे की आपण अजून काय केले म्हणजे  आपणं ताण -तणावावर चांगल्या प्रकारे मात करू शकू ? – essay on stress management 

असं म्हणतात ना मन चंगा तो सब  चंगा ! म्हणजेच आपल्याला बाकी गोष्टीं बरोबर आपल्या मनाची सुद्धा काळजी  घयायला  हवी, जपणं म्हणजे protect नव्हे तर त्याला जास्तीत जास्त strong कसं बनवता येईल ते बघणं . आपणं स्वतःला जपतो म्हणजे एका प्रकारे सावरतोच ना ? तणावाचा त्रास होवू  न देता परिस्थीतिचं  भान ठेवून  वागणे / निर्णय घेणे/प्रतिसाद देणे हे जर आपणं मनाने खंबीर असू तर तरचं शक्य आहे. दुसरं आपले शरीर काय सांगतंय ते ऐकण्याचा प्रयत्न करा ,ते पण  थकतं असेल कि नाही ? आपला आहार कसा आहे. ? आपली जीवनशैली ( Life Style ) योग्य आहे का ? आपले नाते -संबंध कसे आहेत ? अश्या ह्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला ताण -तणावाशी सामना करणयास मदत करतील ते बघूया.

essay on stress management :

१. मन

 • मनाचे स्वास्थ जपायलाचं हवे ,त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा (meditation) करू शकता ,प्राणायाम आणि इतर योगासने  हे  पण खूप महत्वाचे आहेत. ” करा योग् रहा निरोग “.

 • Break हे ताजेतवाने होण्यासाठी जरुरी  आहे .

 • आपल्या आवडी जपा ,छंदासाठी वेळ  काढा.( बागकाम ,संगीत)

 • हसा, मन मोकळं करा .

 • साफ-सफाई करा. (आवरता आवरता मन पण नकळत आवरले जाते -म्हणजेचं नकोसे विचार हळूहळू नाहीसे होतात.)

 • चांगले विचार, चांगले कृत्ये  , उभारी देणारी पुस्तके, साथ देणारी दोस्त मंडळी ह्यांची सोबत असू देतं.

२. शरीर

 • तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करा .

 • इतर कुठलीही activity  दररोज करा .उदाहर्णार्थ  चालणे/पळणे /सायकल चालवणे.

 • एखादा मैदानी  खेळ जमत असेल तर नक्की खेळा .

 •  Lift टाळा आणि जिन्याचा  वापर करा.

३. आहार

 • आपले रोजचे खाणे हे  घरचे ताजे असावे. खाण्यात सलाड असेल तर उत्तम .

 • शकयतो बाहेरचे /तेलकट खाणे टाळावे .

 • मधल्या खाण्यासाठी हलकं-फुलकं खाण  नक्कीचं चांगले .

 • अति चहा / कॉफी नकोच.ग्रीन टी तब्येतीसाठी फायदेशीर असतो.

 • फळं आणि इतर महत्वाचे  जीवनसत्त्वे  आहाराचा भाग असू देतं . जंक फूड नकोच .

 •  दिवसाला १० ते १२ ग्लास पाणी पिणं फायदेशीर  ठरेल.

४ . जीवनशैली ( Life Style )

 • व्यसनांपासून दूर रहावे .

 • झोप आणि आराम महत्वाचा ,हे विसरू नका. सलग ६-७ तास झोप अत्यावश्यक आहे.

 • खोट्या /अवास्तव अपॆक्षा आणि rat race ला आपण दूर ठेवले पाहिजे.

 • आपल्या खाण्याच्या , उठण्याच्या /झोपण्याच्या  वेळा पाळा.

 • विचारांना अध्यात्मिक बैठक असेल तर बरयाच गोष्टी सोप्या होतात.

 • ज्याने तुम्हाला चांगलं वाटतं ते करा (   Feel good factor ).

५.  नाते -संबंध

 • वैयक्तिक / व्यावसायिक नाते – संबंध  जपा .

 • कुणाला गृहीत धरू नका . 

 • स्वतःसाठी वेळ द्या  (एकटे असणं आणि एकटेपणा दोन वेगळ्या गोष्टी आहेत)

 • स्वसंवाद ,चिंतन  दिवसभरात १० मिनिटे का होईना जरुरी आहे  .

आपला नेहमीचा तक्रार करणारा स्वभाव जरा बाजूला ठेवा. असुरक्षितता ,भीती, न्यूनगंड,अपराधीपणाची भावना, ईर्षा, अहंकार, राग, द्वेष ह्यापलीकडे जाऊन जरा इतर सकारात्मक  गोष्टी म्हणजेच  निष्ठा ,हसणं ,आत्मविश्वास ,कृतज्ञता , समजून घेणे ,उमेद ह्यांना आपल्या आयुष्यात महत्व द्यायला सुरवात करा. निसर्ग हा एक उत्तम ताण कमी करणारा आपला सखा असतो हे  लक्षात ठेवा. प्रगती हवी आहे तर ती आपण इच्छाशक्तीच्या जोरावर ,जीवघेणी स्पर्धा बाजूला ठेऊन मिळवू शकतो ताण -तणाव करून  गायब ,पण त्यासाठी take it easy  !!

 

postboxindia.com
www.postboxindia.com
मेघना धर्मेश
9321314782 | [email protected]

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Peshwa empire Gangabai
Peshwa empire – एक दुर्लक्षित पेशवीण – गंगाबाई
error: Content is protected !!
%d bloggers like this: