family power
family power
family power मुलाखत : मंत्र्याच्या पत्नींशी

family power – मुलाखत : मंत्र्याच्या पत्नींशी

family power - मुलाखत : मंत्र्याच्या पत्नींशी

family power – मुलाखत : मंत्र्याच्या पत्नींशी

 

family power – मुलाखत : मंत्र्याच्या पत्नींशी

 

 

 

 

   बाई पाहिजे गुणवंतराव बाई पाहिजे, नटरंग मधील हा संवाद आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला यशाचा मूलमंत्र सांगणारा आहे. आता असे मूलमंत्र कोण कसे घेते

हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर आणि नीत्तीमत्तेवर अवलंबून असते. प्रत्येक यशस्वी मंत्र्यामागे बाई असते, मग ती बायकोच असेल हे कोणी सांगू शकत नाही. साहेबांनी भाषणाला

सुरुवात झाल्यानंतर व्यासपीठावरील अनेक मंत्र्यांना दरदरून घाम फुटायला लागला, साहेब मिश्किलपणे म्हणाले. घाबरू नका अजून बातमी कन्फर्म नाहीये,

आणि सभेत एकच हशा पिकला. साहेबांचे आणि व्यासपीठावरील घामाघूम झालेल्या मंत्र्याचे नाव इथे सांगणार नाही कारण विषय तो नाही. सामान्य माणसाला मंत्री

आणि त्याच्या आजूबाजूच्या घुटमळणारया नातेवाईकांचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. मग आमदार निवासात कोण कोण येते आणि फार्म हाऊस वर कोण कोण

हजेरी लावतात यांच्या बातम्या बॉडीगार्ड, सुरक्षा रक्षक यांच्यापासून माध्यमे आणि सामान्य जनतेपर्यंत सहजच पोहोचतात. family power महाराष्ट्रातील मंत्री

मात्र या बातम्यांपासून दूर किनाऱ्यावर असतात. महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकीय संस्कृती आहे जी ईडी, सीबीआय च्या गैर वापरानंतर संपेल की काय असे दिसत होते.

सांगायचा मुद्दा असा की या सर्व मंत्र्यामागे त्यांच्या पत्नीची साथ त्यांच्या चढ उताराच्या काळात लाभलेली असते. फडणवीस यांच्या चढ उताराच्या काळात

त्यांच्या पत्नीची गायन कला  देखील फुलली आणि फळली. एखाद्या दिग्गज गायिकेला मिळत नाही असा सन्मान त्यांना महाराष्ट्राकडून मिळाला हे काय कमी आहे.

या झाल्या वर्तमानातल्या गोष्टी पण पाहायला गेले तर राजकारणात समस्त मंत्र्याच्या बायका आणि त्यांचे मंत्री यांचे नातेसंबंध आणि त्यांचे विचार जाणून घ्यायला

सर्वाना आवडते. family power साहित्यिक कडबोळी या सदराखाली डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी पंचवीस मंत्र्याच्या बायकांशी गप्पा मारून त्यांच्या

मुलाखती आणि त्यांच्या नात्यांवर जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. त्यांचे या विषयावरचे गप्पा मंत्र्याच्या पत्नीशी हे पुस्तक प्रचंड गाजले होते.

सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील 25 मंत्र्यांच्या पत्नीशी गप्पागोष्टी केल्या. त्यात बरीच रंजक माहिती आहे. सत्तेवरच्या माणसांची नावेही कशी अनुरुप वाटतात,

हे लक्षात येते. उदा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्नी नंदिनीदेवी यांच्या मुलाखतीत दिरांची नावे राजसिंह, जयसिंह, प्रतापसिंह, मदनसिंह, उदयसिंह अशी आहेत,

असा उल्लेख आहे. याचा अर्थ घरातच एवढे सिंह आहेत की संपूर्ण लायन्स क्लबच स्थापन करता येईल. दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाचे नाव विश्वविजय आणि

कन्येचे नाव धवलश्री आहे. तर पद्मसिंह पाटलांच्या मुलांची नावे राणा जगदिपसिंह व पृथ्वीराज अशी आहेत. उगाच मोहन, मधुकर, तुषार, आशुतोष, अबोली

अशी भावूक नावे नाहीत. त्यांच्या नावामध्येदेखील महत्त्वकांक्षेचा स्पर्श जाणवतो. अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या मुलांची नावे प्रतीक व राजवर्धन अशी आहेत.

कृषि राज्यमंत्री सुरसिंहराव जाधवराव यांच्या पत्नी दमयंती (यांनाही घरात दमयंतीराव म्हणतात की काय ? कोण जाणे !) यांचे माहेर तुळजापूरचे, देशमुखांचे घराणे

चाल्लुक्यवंशीय धैर्यशीलराव व फत्तेसिंगराव असे दोन बंधु त्यांचा विवाह पुण्यात पेशवाई थाटात झाला. तर विजयसिंह मोहिते-पाटलांच्या विवाहाला एक लाखावर

लोक हजर होते. त्यावेळचे लक्षभोजन अत्यंत गाजले. त्यांची बातमी लंडनच्या बी.बी.सी. वरुनही देण्यात आली. त्यांच्या पत्नीला पतीने राजकारणात जावं असं वाटत

नव्हतं. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा बिझनेस होता. राजकारणापेक्षा बिझनेस हे आपलं आवडतं क्षेत्र आहे, असं त्यांनी म्हटलयं. family power

(काही मंडळींचा राजकारण हाच बिझनेस असतो हा भाग अलहिदा.) वसंत चव्हाण यांच्या पत्नी निलीमा चव्हाण या मूळ दिल्लीच्या. त्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत.

वसंत चव्हाण हे मॅट्रिकला गुणवत्ता यादीत पहिल्या नंबरवर आले. एवढेच नव्हे, तर त्यांना जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिपही मिळालेली आहे. आपल्या उभयतांच्या

आवडीनिवडी पूर्णपणे भिन्न असल्यातरी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे निलीमा चव्हाण म्हणतात. छगन भुजबळ यांचा प्रेमविवाह झाला आहे,

ही बातमी चकितच करणारी आहे. कडक, कारण छगन भुजबळ यांचं एकूण दरारायुक्त व्यक्तिमत्व पाहता प्रेमाशी त्यांचा काही संबंध आला असेल,

असा संशय येत नाही ? नाजूक लडिवाळपणा वगैरे त्यांना कसा जमणार अशी शंका येते. त्यांचं प्रेमही अकाळविकाळ थयथयाटी असणार भुजबळ वरुन जिद्दी,

हट्टी वाटले असले तरी आतून प्रेमळ व सुरवभावी आहेत, असे त्यांच्या भावाची कन्या दुर्गा म्हणते. एकदा दुर्गा सहलीला जाणार होती तेव्हा तिला निरोप देण्यासाठी

भुजबळ धावत-पळत स्टेशनवर गेले. पण गाडी सुटली. तेव्हा त्यांनी महत्पयासाने ती गाडी दादरला गाठली व खिडकीतूनच चॉकलेट, खेळणी आदी वस्तू डब्यात

टाकल्या, हृदय आठवण तिने सांगितली आहे. गंमत म्हणजे शिवसेना नेते भुजबळांचा क्षणोक्षणी धिक्कार करित असले तरी भुजबळ हे शिवसेनेतर्फे नगरसेवक

म्हणून जेव्हा निवडून आले तो आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता असे त्यांच्या पत्नी मीना भुजबळ यांनी म्हटले आहे. family power

गणपतराव देशमुख त्यांच्या पत्नी रतन देशमुख यांनी ‘राजकारण म्हणजे घरे जाळण्याचे काम, शहाण्यांनी राजकारण करु नये, राजकारणाचा मला तिटकारा आहे.’

असे म्हटले असून त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण लक्षात कोण घेतो ? पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांचा विवाह करण्यामागे आचार्य अत्रे व सुभद्राबाई पगारे

यांचा सहभाग होता, ही माहिती उद्बोधक आहे. पद्मसिंहपाटील बॉक्सिंग चॅम्पियम, हॉर्स रायडर होते, अशीही माहिती त्यांच्या पलीने पुरविली आहे. बहुतेक

मंत्र्यांच्या पत्नींनी आपल्या अपत्यांनी वडीलांच्या नावावर प्रसिद्धी मिळवावी असे वाटत नाही, हे सांगितले आहे हे विशेष. दिलीप वळसे-पाटील यांच्या पत्नी किरण

यांच्याकडे चित्रकलेतील पदवी आहे. राजकारणातील व्यक्ती त्यांना पती म्हणून नको होती. एखादा सेनेतील (शिवसेनेतील नव्हे) अधिकारी पती असावा, असे त्यांना वाटायचं.

पण एकत्र कुटुंब पध्दतीत व वाडवडिलांचा मान राखायचा म्हणून त्यांनी राजकारणातील दिलीप वळसे-पाटील यांच्याशी विवाह केला. आपण पट्कन बोलतो तर

पती विचारपूर्वक बोलतात असा फरक आहे, असं त्या सांगतात. लग्नाला पंधरा वर्षे झालीतरी स्वतःचे घर नाही याची त्यांना खंत वाटते. त्यांची मुलगी पूर्वा हिला

लालुप्रसाद व राबडीदेवी अत्यंत आवडतात. (आता दिलीप वळसे-पाटील यांना लालूप्रसादांसारखा मेक-अप करावा लागेल.) family power अर्थमंत्री

जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील यांची ‘ज्यांचे नाव घेतल्या घेतल्या लोकांनी ओळखावे असा आपला पती असावा’ अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली असे म्हटले आहे.

एखाद्या वस्तूवर विक्रिकर वाढला की, लोकांना ती भाववाढ अर्थमंत्र्यामुळे झाली अशी ओळख पटत असावी. या मंत्र्यांच्या पत्नी एकमेकींना फारश्या भेटत नसाव्यात असे दिसते.

न जाणो त्यांच्यातही पंक्तीप्रपंच असेल. म्हणजे कॅबिनेट दर्जाच्या मंत्रीपत्नींचे कॅबिनेट महिला मंडळ व राज्यमंत्र्याच्या पत्नींचे साधे महिला मंडळ,

अशी विभागणी झाली तर कदाचित सुसंवाद साधेल. ललितमध्ये विद्युलेखा अकलुजकर यांनी- मराठी कवितेत चिमणीकडे जरा दुर्लक्ष झाले आहे,

कारण चिमणीवर फारशा कविताच नाहीत, म्हणून खंत व्यक्त केली आहे. नवकविंना हे समजले तर चिमण्यांवरच्या कवितेचा पूरच येईल. चिवचिव चिमणी,

अगं अगं चिवू असल्या बालगीतांपासून युनोच्या इमारतीवर नोटोची चिमणी, गिरण्यांच्या चिमणीत गुदमरली मानवता, अशा कवितांचा चिवचिवाट होईल.

अखेर चिमणीचं घर मेणाचंच, ते शब्दांच्या सरीत वाहून जाईल.

 

Postbox Editorial
postboxindia.com
www.postboxindia.com

 

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
social reformer raja ram mohan roy राजा राम मोहन रॉय
social reformer raja ram mohan roy – राजा राममोहन राॅय
error: Content is protected !!
%d bloggers like this: