financial help for medical treatment in india
financial help for medical treatment in india
financial help for medical treatment in india

financial help for medical treatment – फुलपाखरु स्पर्श

financial help for medical treatment in india - करोना उपचारात, फुलपाखरु स्पर्श - समीर मणियार

financial help for medical treatment  –

 फुलपाखरु स्पर्श

 

 

financial help for medical treatment  –

करोना उपचारात, फुलपाखरु स्पर्श – समीर मणियार

 

 

 

 

रिश्ते हमारे तितली के जैसे होते है
जोरसे पकडो तो मर जाते है
छोड दो तो उड जाते है
और अगर प्यार से पकडो,
तो अपना रंग छोड जाते है
……….

सच सच बतलाना तितली
तू इतनी खुशियाँ कहॉ से लाती है
मैं चाहे जितने ढंग से जी लू
पर ये खुशियाँ कम पड जाती है

पालघर जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा आणि वाढणारे रुग्ण यांचा ताळमेळ बसत नाही. सहा वर्षापूर्वी आदिवासीबहुल नवीन पालघर जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आला. पण सुमारे ४० लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात १०० खाटांचे एकसुद्धा शासकीय सुसज्ज रुग्णालय उभे राहू शकलेले नाही.


Martha Stewart CBD Gummies Sampler

मनोर येथील प्रस्तावित रुग्णालयाचे काम रखडलेले आहे. तथापि हजार ते बाराशे कोटी रुपये खर्च करुन जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ताजमहाल बांधण्याचा उद्योग कोळगावला सुरु आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. तथापि, financial help for medical treatment in india काही संस्था संघटना, दानत असलेले संवेदनशील मनाचे व्यक्ती कोव्हिड सेंटर उभे करण्यासाठी पुढे येत आहे.

postboxindia.com
करोना उपचारात, फुलपाखरु स्पर्श

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू उपनगरी लोकल सेवेच्या नेटवर्कमध्ये सफाळे नवीन विकसित होणारे उपनगर, व्यापारी केंद्र आहे. सफाळ्यात सागरी, डोंगरी, जंगलपट्टीतील सुमारे ६५ गावातील हजारो लोकांचा संबंध येतो. अशा भागात करोना रुग्णसंख्या वाढत आहे. पारगाव, सफाळे, एडवण अशा तीन ठिकाणी नवीन कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यात सफाळे येथे इंग्लिश मेडियम स्कूल या ठिकाणी ५० खाटांचे कक्ष सुरु होत आहे. समुद्रकिनारी असलेल्या एडवणला असाच कक्ष सुरु होणार आहे.


Martha Stewart CBD Gummies Sampler

मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन सफाळे येथे जाण्यासाठी वरई फाटा येथून रस्ता येतो. त्या रस्त्यावर पारगाव येथे फुलपाखरु या स्वयंसेवी संस्थेच्या वास्तूत ३० खाटांचे कोविड केअर सेंटर आज शुक्रवारी सुरु झाले. financial help for medical treatment in india फुलपाखरु या वास्तूत १८ सर्वसाधारण खाटा, १२ अतिदक्षता खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

postboxindia.com
करोना उपचारात, फुलपाखरु स्पर्श

फुलपाखरुमुळे पारगाव, गिराळे, नावजे, दहिसर, साखरे, तांदुळवाडी, लालठाणे, विश्रामपूर, वसरे, खडकोली, घाटीम, नवघर, उचावली. पेनंद आदी गाव पाड्यांना फायदा होईल. तितली फाऊंडेशनच्या चेअरमन विजया माँतेरो यांची धाकटी कन्या व्हेनेसा हिच्या हस्ते कोव्हीड केअर सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यात रोटरी क्लब ऑफ पालघरचा पुढाकार आणि मनोरच्या आस्था हॉस्पीटलची वैद्यकीय टीम कार्यरत राहणार आहे.

रोटरीचे प्रकल्प प्रमुख अमित पाटील, जयेश आव्हाड, दीपेश ठाकूर, भगवान पाटील, प्रशांत पाटील, मिलिंद पाटील, विलास पाटील, डॉ. अविनाश सोनवणे, डॉ. जितेंद्र शिरनामे, दिनकर नाईक, पारगावच्या महिला सरपंच रुपाली रुपेश धिंडा, उपसरपंच अंकुश जाबर आणि फुलपाखरु संस्थेचे बाप्तीस मॉतेंरो आदी उपस्थित होते.


Martha Stewart CBD Gummies Sampler

अर्थात पारगावचे कोव्हीड केअर सेंटर सुरु होण्यासाठी या परिसरातील संवेदनशील मनाचे, सामाजिक भान असलेले प्रविणदादा राऊत, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांचीही मेहनत आहे.

financial help for medical treatment in india
करोना उपचारात, फुलपाखरु स्पर्श

करोना बाधित रुग्णांवर योग्यवेळी उपचार आवश्यक आहेत. त्याशिवाय कोव्हीड केअर सेंटरचा आनंददायी परिसर, सकारात्मक वातावरण, योग्य पोषण आहार, आवश्यक औषध मात्रा, तज्ञ डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफची गरज आहे. फिअर फॅक्टर रुग्णांच्या मनावर स्वार होता कामा नये.

तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर फुलपाखरु संस्थेच्या परीस स्पर्शाने करोना बाधित रुग्ण बरे होतील. आनंदी मनाने आपापल्या घरी कुटुंबात जातील. करोना चा विषाणु भयानक असला तरी फुलपाखरुचा स्पर्श रुग्णास झाल्यानंतर करोनावर मात करता येऊ शकते हे नजीकच्या काळात स्पष्ट होईलच.

financial help for medical treatment in india
financial help for medical treatment in india करोना उपचारात, फुलपाखरु स्पर्श

फुलपाखरु, तितली, बटरफ्लाय आणि व्हेनेसा ही एकाच नाजूक फुलपाखराची विविध भाषेतील नावे आहेत. परदेशात चार दशके आनंदी, सुखासमाधानाचे जीवन जगणारे मॉतेंरो कुटुंबातील ही वेगळी कहाणी आहे. धाकटी मुलगी व्हेनेसा ही स्पेशल चाईल्ड असल्याचे त्या कुटुंबियाच्या नजरेस आले. स्पॅनिश भाषेत फुलपाखरुस व्हेनेसा म्हणतात.


Martha Stewart CBD Gummies Sampler

पौराणिक आख्यायिका, ख्रिश्चन पुराणांमध्ये फुलपाखराला महत्व आहे. व्हेनेसाला पुन्हा सर्वसामान्य मुलांसारखे जगण्याचे आत्मभान, प्रबळ आत्मविश्वास आणि दांडगी इच्छाशक्ती निर्माण करण्याची मॉतेंरो दांपत्यांची असीम मेहनत फळाला आली. त्यातूनच तितली फाऊंडेशनचे फुलपाखरु नावाचा सामाजिक उपक्रम पारगावच्या निसर्गसंपन्न परिसरात दोन एकरात उभा राहिला आहे.

आपल्याकडे २ एप्रिल हा जागतिक वर्ल्ड ऑटिझम डे म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ सालापासून हा दिवस जाहीर केला. ऑटिझम अर्थात स्वमग्नता म्हणजे स्वत:तच रमून राहण्याची तीव्र स्वाभाविक वृत्ती असते. विशेषत: लहान मुलांमध्ये वाढत्या वयात दिसून येणारी ही वृत्ती आजार नसून कमीअधिक प्रमाणात त्रास देणारी समस्या ठरते. या समस्येची जाणीव पालकांना करून देण्यासाठी दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी ‘माय डिअर यश’ हा चित्रपट तयार केला.

मुका-बहिरा नायक आणि ऑटिस्टिक नायिका यांची गोष्ट सांगणारा अलीकडे ‘बर्फी’ सिनेमा गाजला होता. डिस्लेक्सिया आजाराबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. अमोल गुप्ते, आमीर खान, दर्शिल सफारी यांच्या भूमिकेने गाजलेल्या तारे जमीं पर सिनेमामुळे असा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो याची जाणीव लोकांना झाली. बविआचे संस्थापक लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव उत्तुंग ठाकूर यांचा येलो चित्रपट याच विषयाच्र प्रकाशझोत टाकणारा होता.


Martha Stewart CBD Gummies Sampler

ऑटिझम हा मुलांच्या विकास, वाढीशी संबंधित विकार आहे. यात मुलाच्या वेगवेगळ्या क्षमतांची असमान वाढ होते. म्हणजे काही बाबतीत त्याचा विकास वेगाने होतो तर काही बाबतीत विकासाची गती अतिशय धीमी असते. विशेषत: संवादाच्या क्षमतेत फारच गंभीर स्वरुपाच्या अडचणी असू शकतात. सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यात, मेंदूच्या कामात, ज्ञानेंदियांच्या कामात आणि पर्यायाने वागणुकीत समस्या असतात.

ऑटिझमचा विकार का उद्भवतो याची नेमकी कारणे आजही संशोधनातूनही सिद्ध झालेली नाहीत. या विकाराच्या तीव्रतेतही कमालीची विविधता आढळते. अतिशय तीव्र स्वरुपाच्या ऑटिझमपासून अतिशय कमी तीव्रतेच्या ऑटिझमपर्यंत. पालक सजग असतील तर याची लक्षणे अगदी कमी वयात म्हणजे पहिल्या वर्षातही लक्षात येऊ शकतात.

अगदी लहान वयात थेरपी सुरू झाल्यास, मुलात अभाव असलेल्या क्षमतांचा विकास होऊ लागतो. या क्षमतांच्या अभावातून पुढे निर्माण होऊ शकणारे सेकंडरी प्रॉब्लेम्स मग निर्माण होत नाहीत. संवादाची क्षमता ही यातली सर्वात महत्त्वाची क्षमता. ती जितक्या लवकर विकसित होईल तितके अधिक चांगले असते.

मूल हे जन्मदात्या आईबाबाचे पहिले कर्तव्य असते. विशेष मुलांशी स्वतहून वेळ काढणे यास आईबाबांचे प्राधान्य असायला हवे. दैनंदिन आवश्यक कामांनंतर आपल्याकडे असलेला वेळ त्यांच्यासोबत घालवणे आवश्यक आहे. विशेष मुलांसोबत काही खेळ उत्साहाने खेळायला हवेत. त्या माध्यमातून अशा मुलांशी मानसिक गट्टी उत्तम होऊ शकते. मित्रत्वाचा वेगळे नाते निर्माण होण्यास मदत होते.

परिणामी आपण जे बोलतो ते त्याला समजण्यासाठी एक उत्तम साधन होऊ शकते. विशेष मुलासोबत आईबाबाचे बाँडींग अधिक मजबूत होण्यास मदत होते. अशा मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याची भावना वाढीस लागते. आपले मूल या समस्येतून बाहेर निघू शकतो असा पालकांची दुर्दम्य विश्वास, तीव्र इच्छाशक्ती उपयोगी पडते. वेळोवेळी मानसिक समस्यांवर उपचार करणारे मनोविश्लेषक, मानसशास्त्रज्ञचा सल्ला, मार्गदर्शन उपयोगी पडते.

विशेष मुलांशी वागण्या बोलण्यात पालकांनी भेदभाव करता कामा नये. सामान्य मुलांप्रमाणे आणि त्यांच्या कुटुंबात आणखी मुले असतील तर त्यांच्यासमानच विशेष मुलांसोबत आपले वागणे असायला हवे. विशेष मुलांची संगोपनाची जबाबदारी कुटुंबातील अन्य घटकांवर न टाकता आईबापांनी उचलायला हवी.


Martha Stewart CBD Gummies Sampler

माया, ममता यामुळे विशेष मुले आणि आईवडिल यांच्यातील नाते अधिक सुलभ होते. विशेष मुलांसाठी चौरस आहार, त्यांच्या पोषणासाठी चांगला डाईट असणे आवश्यक आहे. यामुळे विशेष मुलांच्या मनात निर्माण होणारा आत्मविश्वास हा त्यांच्या कौशल्य गुण वाढविण्यास उपकारक ठरू शकतो. विशेष मुलांमध्ये काही व्यंग असू शकतात. ती समस्या समजावून घेतली पाहिजे. डाऊन सिंड्रोम, लर्निंग डिसेबिलीटी वा सेरेब्रल पाल्सी यातील काय हे पाहणे गरजेचे आहे. त्या मुलास फिजिओथेरपिस्ट अथवा ऑक्युपेशनल थेरेपिस्ट यापैकी एकाची निवड करता येते.

आपल्या विशेष पाल्याच्या मनात सुरक्षिततेची भावना, वातावरण निर्माण करणे आवश्यक असते. तरच असे मूल आपल्या आईबाबांच्या भावना समजून घेण्यात यशस्वी होईल. समाज, नातेवाईक अशा मुलांना सकारात्मक भावनेतून पाहत नाही. परिणामी अशा विशेष मुलांच्या मनातील न्यूनगंडाची अढी दूर होण्यास मदत होत नाही. विशेष मुलाला अडगळीत टाकले जाते ही भावना सर्वात आधी दूर करणे आवश्यक असते.

विशेष मुलाची लहानसहान गोष्टींबाबत प्रशंसा करणे. त्याला पाठिंबा देणे अशा कृतीमुळे विशेष मुलांच्या आत्मविश्वासाची पातळी अधिक वाढण्यास मदत होते. सहनशील, सोशिक, धैर्य ठेऊन वागण्याच्या आईबाबांच्या उक्ती, कृतीमुळे तसेच सतत हसतमुख सकारात्मक कृतीचा परिणाम विशेष मुलांचे मानसिक सशक्तीकरण होण्यात होतो.


Martha Stewart CBD Gummies Sampler

यातून फुलपाखरुचा जन्म झाला आहे. financial help for medical treatment in indiaविशेष मुलांसाठी स्वतंत्र निवासी शाळा असावी. त्या उद्दिष्टांसाठी प्रामाणिक मनुष्यबळ असेल तर अशी मुले सर्वसामान्य मुलांसारखी होऊ शकतात. पारगावच्या परिसरातील फुलपाखरु निवासी शाळा गतवर्षी फेब्र्रुवारीला सुरु झाली. त्यात सात विशेष मुले होती. फुलपाखरु उपक्रमाची क्षमता ४० विद्यार्थ्यांची आहे. ती भविष्यात २५० विद्यार्थ्यांची होईल. संख्येपेक्षा दर्जेदार शिक्षण, सामान्य मुलांसारखी सकारात्मक ऊर्जा, त्यांचा मनोविकास हे कामाचे उद्दिष्ट आहे. गेल्या मार्च महिन्यात करोनाची साथ आल्यामुळे खबरदारी म्हणून विशेष मुले आपापल्या घरी परतली.

फुलपाखरुची संकल्पना, या कामासाठीचे धैर्य, वाट्टेल ते कष्ट करण्याची तीव्र इच्छाशक्ती विजया माँतेरो यांच्याकडे आहे. त्यांचा अनुभव ऐकून माणूस सर्दच होतो. यामुळेच विशेष मूल असलेल्या धाकट्या कन्येचा आत्मविश्वास त्या निर्माण करु शकल्या. सामान्य मुलीसारखी ती वागते. मोबाईल, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे ती हाताळते. तिला कॉलेजला जायचे आहे.

मॉडेल, नायिका बनायचे आहे. बॉयफ्रेंडसोबत धमाल मस्ती करायची आहे. त्या कन्येने आपले स्वतचे भावविश्व निर्माण केलेले आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यांचे वेळाचे नियोजन ती करु लागली आहे. वाढदिवस साजरा करताना ती अत्यंत आनंदी असते. विजया मॉतेंरो, त्यांच्या यजमानाच्या असीम कष्टामुळे ईश्वरी साक्षात्कार झाला.

देवाने आम्हांला खूप काही भरभरुन दिले आहे. financial help for medical treatment in india सफाळे परिसरातील करोना रुग्णांवर फुलपाखरुत रास्त उपचार व्हावेत. ते बरे होऊन आपल्या कुटुंबात आनंदी समाधानाने जगावे. त्यांच्या व्यवसायधंद्यात, नोकरीत बरकत यावी अशी प्रार्थना मनोभावे परमेश्वराकडे त्या करतात. सकारात्मक विचारांचा अनमोल ठेवा येथून जाणाऱ्यांनी घेऊन जावा. शेवटी पैसा अडका याला महत्व नसून तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदी आयुष्यासाठी काय हातभार लावला ते महत्वाचे आहे. विजया मॉतेंरो यांना प्रसिद्धी नको असते. फुलपाखरुसाठी प्रविणदादा राऊत यांनी शक्य ती मदत केल्याचे ते प्राजंळपणे नमूद करतात.


Martha Stewart CBD Gummies Sampler

अर्थात फुलपाखरुचा इतिहास पाहिला तर करोना रुग्ण नक्कीच तेथे बरे होतील असा विश्वास निर्माण होतो. निष्पाप, निर्मळ मनाच्या व्हेनेसाने तीन वर्षांच्या चिमुरडीच्या हाती कातर देऊन फुलपाखरु केअर सेंटरची रिबीन कापली. हा धडा विचारी मनांना व सर्वांना शिकण्यासारखा आहे.

 

रंग बिरंगी प्यारी तितली
सबके मन को भाती तितली।
इस बगिया से उस बगिया में
उड़कर धूम मचाती तितली।।

कभी फूल का रस पीती तितली
दूर उड़ जाती तितली।
बैठ ऊंची डाली पर
अपने पंख नचाती तितली।।

रामू जीकेश गीता सीता
सबका मन भूलाती तितली।
पर जैसे ही हाथ बढ़ाते
झट से वह उड़ जाती तितली।।

बच्चों तितली रानी उड़ कर
देती है तुम को यह संदेश।
तोड़ बेड़िया शंख बजाओ
जिससे जागे भारत देश।।

करोनाच्या मुक्तीसाठी फुलपाखरुचा स्पर्श कामी येईल यात शंका नाही.

 

 

 

 

समीर मणियार

Advertisement

More Stories
first lady doctor in the India - first lady doctor rakhamabai raut
first lady doctor in the India – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत
error: Content is protected !!
%d bloggers like this: