Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

dr rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत

1 Mins read

dr rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत

dr rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

 

21/9/2021,

मराठमोळ्या dr rakhmabai डॉ.रखमाबाई राऊत या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डाॅक्टर खरे तर पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांचे नाव घेतले जाते.परंतु आनंदीबाई यांचे लवकरच आजारपणात मृत्यू झाल्याने त्या वैद्यकीय व्यवसाय करू शकल्या नाहीत . dr rakhmabaiरखमाबाईंनी मात्र त्याकाळात वैद्यकीय सेवा करून समाजकार्याचा वसाही जपला .ज्या काळात महिलांना दुय्यम स्थान दिलं जात होतं, अशा काळात रखमाबाई राऊत यांनी परिस्थितींवर मात करुन यशाचं शिखर गाठलं.

dr rakhmabai रखमाबाई राऊत यांना रुक्माबाई या नावानंही ओळखलं जातं. ब्रिटीश काळातील त्या पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. त्यांनी रुग्णांची सेवा केलीच पण भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही संघर्ष केला होता. बालविवाह प्रथा बंद होण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेलं आहे.
रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबईत झाला. रखमाबाई यांच्या आईचा बालविवाह झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी dr rakhmabai रखमाबाईंच्या आईचं म्हणजे जयंतीबाईंचं लग्न झालं होतं, 15 व्या वर्षी रखमाबाईंचा जन्म झाला. 17 व्या वर्षी वडिलांचे निधन झालं. जयंतीबाई अवघ्या 17 वर्षाच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं आणि रखमाबाईंच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. पुढे जयंतीबाईंनी डॉ. सखाराम राऊत यांच्याशी दुसरं लग्न केलं.

doctor rakhmabai - पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत माहिती

doctor rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत माहिती

आईप्रमाणेच रखमाबाई यांचाही बालविवाह झाला. रखमाबाईंचा वयाच्या 11 व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी विवाह झाला. मात्र त्यांनी माहेरी राहून वैद्यकीय शिक्षण घेतलं.
मार्च 1884 मध्ये दादाजी यांनी मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली आणि dr rakhmabai रखमाबाईंनी त्यांच्यासोबत राहावं म्हणून मागणी केली. त्यावेळी, दादाजी यांच्यासोबत राहा किंवा तुरुंगात जा,असे कोर्टाने सांगितलं. अर्थात, रखमाबाईंनी तो निर्णय नाकारला आणि न्यायालयीन लढाई दिली. न्यायालयीन लढाई जिंकून रखमाबाईंनी सुमारे 35 वर्षे यशस्वीरित्या वैद्यकीय सेवा दिली. त्याचसोबत, बालविवाहाच्या प्रथेविरोधात आणि महिलांच्या एकांतवासा संदर्भात लेखनही केलं.

doctor rakhmabai - पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत संपूर्ण माहिती

doctor rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत संपूर्ण माहिती

एक बुद्धिमान, बाणेदार, धाडसी आणि सेवाव्रती असं रखमाबाईंचं व्यक्तिमत्त्व होतं. आज स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती असे शब्द खूप सहजपणे वापरले जातात आणि ते महत्त्वाचेही आहेत. परंतु सव्वाशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने आपल्या ज्ञानाच्या तुलनेत खूपच सामान्य असलेल्या नवऱ्याला नाकारणं ही त्या काळात क्रांतिकारी घटना होती.

ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून कोर्टाच्या निर्णयावर टीका करण्यात आली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली. मात्र रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम राऊत मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु ह्या प्रचंड धावपळीमुळे व मानसिक ताणामुळे वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी, १८ एप्रिल १८८५ रोजी त्यांचं निधन झालं

doctor rakhmabai - पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत information

doctor rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत information

त्यानंतर दादाजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. मुख्य न्यायाधीश फेरेन ह्यांच्यासमोर आलेल्या ह्या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ह्यावेळी मात्र हायकोर्टाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. न्यायमूर्ती फेरेन यांनी, निकालाच्या दिवसापासून एका महिन्याच्या आत रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी राहण्यास जायला हवं, असा निर्णय दिला.

परंतु dr rakhmabai रखमाबाई आपल्या निर्णयापासून ढळल्या नाही. २३ वर्षांच्या dr rakhmabai रखमाबाई तोपर्यंत सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे जात होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद चिघळत गेला. देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या आणि न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक, तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी उभी राहिली. विदेशातील ‘लंडन टाइम्स’, ‘सेंट जेम्स् गॅझेट’ अशा अनेक प्रमुख वर्तमानपत्रांतून हा विषय गाजू लागला. इंग्लंडमध्येसुद्धा सामाजिक धुरिणांचा चर्चेचा विषय बनला. तेथील विचारवंत महिलांनी dr rakhmabai रखमाबाईंना सहकार्य करण्याचं आश्वासन पत्राद्वारे दिलं. ‘लंडन टाइम्स’चे बिशप ऑफ चाल्टरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व व्हॉइसरॉय ऑफ हिंदुस्थान ह्यांच्या कानावर ही बातमी घातली. परिणामी हा खटला प्रिव्ही कौन्सिलसमोर पुन्हा नव्याने चालविण्याचं ठरलं. या खटल्याच्या खर्चासाठी प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी ‘रखमाबाई ए हिंदू लेडी डिफेन्स कमिटी’ या संस्थेची स्थापनाही केली.

doctor rakhmabai - पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत इतिहास

doctor rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत इतिहास

५ जुलै १८८८ मध्ये हा वाद मिटवण्यात आला. त्यानंतर इंग्लंडमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक विषयाचा अभ्यास फक्त चार महिन्यांत पूर्ण करून रखमाबाईंनी ऑक्टोबर १८९० मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन’ ह्या कॉलेजात प्रवेश घेतला. लांब हाताचा ब्लाऊज, पांढरी साडी, कपाळावर मोठं कुंकू, असा त्यांचा पोशाख. १८९१ व १८९२ मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘रॉयल हॉस्पिटल’मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी शवविच्छेदन व अॅनेस्थेशिया ह्या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर डब्लिन येथील ‘रोटांडो’ हॉस्पिटलमध्ये मिडविफ्री व स्त्रीरोगतज्ञ हा शिक्षणक्रम पूर्ण केला. नॅशनल डेंटल हॉस्पिटलमध्ये दंतचिकित्सेचं शिक्षण घेतलं. तसंच ‘बाळंतपणातील शस्त्रक्रिया’ ह्या विषयात ‘लंडन कॉलेज ऑफ मेडिसिन’ येथे त्यांनी परीक्षेत ऑनर्स मिळविला. अशा विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर १८९४ मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. परंतु लंडन विद्यापीठाला वैद्यकीय पदवी देण्याचा अधिकार नव्हता. dr rakhmabai रखमाबाई खचल्या नाहीत त्यांनी पुढील परीक्षेसाठी ‘जॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजस् ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ एडिंबरा’ येथे प्रवेश घेतला. येथे त्या उत्कृष्ट मार्कांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या नि त्यांच्या नावापुढे एम्.डी. आणि एल्.आर.सी.पी. अँड एस् ( Licential of the Royal Collage of Physicians & Surgeons ) ही उपाधी लागली. ‘डॉ. रखमाबाई सखाराम राऊत’ ह्या नावाने त्या डिसेंबर १८९४ मध्ये भारतात परतल्या.

doctor rakhmabai - पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत योगदान

doctor rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत योगदान

मुंबईत परतल्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात रखमाबाईंनी मुंबईतील ‘कामा’ हॉस्पिटलमधून केली. मुंबई, दिल्ली, राजकोट, सुरत इत्यादी ठिकाणी त्यांनी लंडनमधील ‘डफरीन’ या संस्थेच्या सहकार्याने हॉस्पिटलची उभारणी केली. १८९६ मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने त्यांना ‘इंग्रज ए हिंद’ हा बहुमान दिला.
dr rakhmabai डॉ. रखमाबाईंनी वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिलं, तसंच सामाजिक कार्यातही. १९१७ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलं. विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ या नावाने आश्रमाची स्थापना केली. १९३२ मध्ये त्यांनी गावदेवी मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्यांनी कामाठीपुरातील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने आयोजित केली. वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या, आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत धडपडणाऱ्या dr rakhmabai रखमाबाईंनी २५ सप्टेंबर १९५५ मधे वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
ऊर्जेची अखंड ज्योत निमावली! स्त्रीशक्ती विचारांचं घोंघावणारं वादळ रुढार्थाने शमलं. पण त्यांनी दिलेला लढा सर्वकालिन महिलांसाठी आदर्श बनून राहिला.

doctor rakhmabai - पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत कार्य

doctor rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत कार्य

Also Visit : https://www.postboxlive.com

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

 

doctor rakhmabai - पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत योगदान

doctor rakhmabai – पहिल्या भारतीय महिला डाॅक्टर रखमाबाईं राऊत योगदान

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!