Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Vilasrao deshmukh jayanti – राजकारणातील राजहंस

1 Mins read

Vilasrao Deshmukh jayanti – राजकारणातील राजहंस

Vilasrao deshmukh jayanti – आदरणीय कै.विलासरावजी देशमुख

 

 


26/5/2021

ग्रामपंचायत सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री .

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात दबदबा असणारे ,

राजकारणातील राजहंस , दिलखुलास , हसतमुख ,सुसंस्कृत व्यक्तिमत्व ,

कुशल नेतृत्व करणारे

आदरणीय कै.विलासरावजी देशमुख यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

 


महाराष्ट्राचे मंत्री असोत, राज्याचे मुख्यमंत्री असोत , काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च अशा वर्किंग कमिटीचे ( CWC ) सदस्य असोत किंवा केन्द्रीय मंत्री असो

अत्यंत व्यस्त असतांनाही सर्वसामान्याच्या मोबाईल मेसेज ला tnx – ok असा reply न चुकता तत्परतेने देणारे ,राजकारणातले “राजहंस “विरळे व्यक्तिमत्व,
प्रचंड लोकसंपर्काचा ‘धनी’ मित्राचा सदह्रयी मित्र,

कार्यकर्त्यांचा सक्षम नेता ,
सर्वसामान्यांचा ‘ जाणता राजा ‘
आणी आदर्श कुटूंब प्रमुख .

Vilasrao deshmukh jayanti विलासराव देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण बाबुळगावातच झाले.

ते पुढे पुणे शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी आले, मग त्यांनी गरवारे कॉलेजमधून बी.एस्सी पदवी मिळवली. पुण्याच्या लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. पदवी मिळवली.

त्यानंतर त्यांनी शिवाजीराव दुर्वे या सुप्रसिद्ध वकिलाकडे पुण्यात वकिलीस सुरुवात केली. काही काळ पुण्यात राहिल्यानंतर १९७१ मध्ये ते गावाकडे परतले.

तिथल्या न्यायालयात वकिली करत असताना सर्व मंडळीही परिचयाची ,तेव्हा कोणाला फी मागायची असा त्यांना प्रश्न पडे. त्यामुळे न्यायालयातील कामे

अशी ही कोणाची न फी घेताच आपण करतो तर मग आपण सामाजिक कामे मोफत केली तर अधिक चांगले नाही का असा विचार करून

विलासराव देशमुख हे सामाजिक कामाकडे वळले.


विलासराव देशमुख यांनी १९७४ मध्ये बाबूळ गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.

१९७४ ते १९८० दरम्यान त्यांनी लातूर पंचायत समितीच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला. उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस

अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील तरुणांना काँग्रेसच्या झेंड्याखाली संघटित

करून ते काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. लातूर येथून १९८० मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले व त्यात मतदारसंघातून

१९८५ आणि १९९० मध्ये पुन्हा निवडून आले ते लवकरच मराठवाडा भागातील काँग्रेसचे लोकप्रिय नेते झाले.तीन विषयात पदवी असलेले

Vilasrao deshmukh jayanti  विलासराव देशमुख हे वयाच्या २९ व्या वर्षी बाभळगावचे (लातूर) सरपंच झाले. राजकीय कारकीर्द सुरु झाली.

युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचा उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत

ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी

नंतर मागे वळून पाहिले नाही. दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.


इ.स. १९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता.

विलासराव देशमुख यांचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही कामात असले तरी त्यांना आलेले फोन स्वतः उचलायचे. परिवाराने अनेक वेळेस विलासरावांना

विनंती केली कि आमच्या करिता खाजगी नंबर ठेवा परंतु त्यांनी साफ इन्कार दिला होता.

त्यांना कला,संगीत,नृत्य,नाटक आणि सिनेमा या विषयात खास रुची होती. २००९ मध्ये सत्ता आल्यास आम्ही कर्जमाफी देऊ हा मुद्दा

विलासरावांनीच सुचविला यावरून त्यांची चाणाक्ष बुद्धिमत्ता लक्षात येते. Manjara Charitable Trust हे त्यांनी स्थापन केलेले आहे

आज त्यांची मुंबई मध्ये अनेक महाविद्यालये आहे. मराठवाडा मित्र मंडळ सुध्दा त्यांनी स्थापन केलेले आहे. उस्मानाबाद युवक कॉंग्रेस


असताना त्यांनी पाच सूत्री कार्यक्रम पक्षाला सुचविला. यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात पाय रोवण्यास सुरुवात केली. १९८० ते १९९५ पर्यंत

ते सलग तीनदा आमदार म्हणून राज्य विधानसभेवर निवडून आले. या कालावधीत त्यांनी गृह, सार्वजनिक प्रशासन, सहकार, उद्योग ,ग्रामीण विकास,

शिक्षण ,तंत्र शिक्षण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. विलासराव देशमुख यांचा कारभार अतिशय स्वच्छ व चोख होता.

त्यांच्या कार्यकाळातमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर कधी झाला नाही व कधी कोर्टाने त्यांना फटकारले नाही. हे त्यांचे विशेष सांगता येईल.

आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अनेक जनसामान्यांसाठी योजना राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे व त्यांना गरिबीतून वर काढण्याचे प्रयत्न

विलासराव देशमुख यांनी केलेले दिसून येतात. त्याच बरोबर राज्यातील उद्योग, सेवाक्षेत्र, पायाभूत सुविधा वाढवून महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे राज्य असले

पाहिजे असा त्यांचा कायम आग्रह असायचा. व त्या दृष्टीने अनेक चांगल्या योजनेचा आपल्या कार्यकाळात निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणीही केली.

विलासराव देशमुख यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्य माणसाचा त्यांचा असणारा संवाद ,त्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले ते नेते होते.

संकटात जो यशस्वी होतो तो खरा प्रशासक. विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संकटावर मात करत प्रशासनावर आपली

मजबूत पकड असल्याचे सिद्ध केले होते.त्यांची स्मृती राज्याला सतत प्रेरणादायी ठरेल.

” संपतील शब्द मात्र आपल्या कर्तुत्वाच्या गाथा अनंत राहतील” माणसे पदाने नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मोठी होतात हे

स्वर्गीय Vilasrao deshmukh jayanti   विलासराव देशमुख साहेब यांच्या जीवन प्रवासातून कळते.

विलासराव देशमुख


म्हटलं की डोळ्यासमोर एक रुबाबदार आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व ऊभे राहते. काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचे जवळचे स्नेही

उल्हास पवार यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी.

विलासरावांना मी पहिल्यांदा बघितलं ते १९७०साली. पुण्यात ते आय एल एस कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेत होते.

त्यावेळी आम्हाला युवक काँग्रेसमध्ये चांगल्या युवकांची गरज होती. याच काळात विलासराव भेटले आणि काँग्रेसशी जोडले गेले.

त्याही काळात त्यांचं ते निर्व्याज हसणं आणि नीटनेटकेपण लक्षात राहावं असं होत. त्यांना त्या काळात आम्ही बघितलं तसेच ते शेवटपर्यंत होते.

कधीही दुर्मुखलेले, गबाळे त्यांना बघितले नाही. कायम साधे पण उत्तम रंगसंगती असलेले कपडे आणि चेहऱ्यावर हसू असेच विलासराव होते. त्यांना तेव्हाही कलेची आवड होती.

अगदी एका दिवसात तीन सिनेमेही आम्ही बघितले होते. लॉ कॉलेजजवळ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय)

असल्यामुळे त्यांना सुभाष घई, शत्रुघ्न सिन्हा असे मित्र होते. तेव्हापासून कला क्षेत्रातल्या मित्रांशी त्यांचे नाते होते. पण तेव्हाही आणि मुख्यमंत्री

झाल्यावरपण त्यांनी कधीही कोणाला एकेरी हाक मारली नाही. व्यक्ती बरोबरीची असो किंवा लहान, अधिकारी असो किंवा साधा कार्यकर्ता

पण त्यांनी कायम आदरार्थी हाक मारली. त्यांच्या एका हाकेनेच समोरचा अक्षरशः विरघळून जाई. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात दोन

वर्षे वकिली करून ते लातूरला गेले. तिथे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमन ते टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री अशी त्यांची कारकीर्द घडली.


विलासराव देशमुखु Vilasrao deshmukh jayanti  मुख्यमंत्री झाले तरी स्वतःमधील मिश्कील स्वभाव त्यांनी जपला होता. कोणत्याही ठिकाणी

त्यांची मार्मिक टिप्पणी असायची. इतकेच नव्हे तर त्यांना नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत सामान्य नागरिकांशी बोलायला आवडायचं.

अगदी कितीही घाई असली तरी. फोनवर तर ते कोणालाही उपलब्ध असायचे. शब्दशः कोणालाही. एक नाशिकची पाच वर्षांची मुलगी

त्यांना फोन करायची आणि ते तिच्याशी आवर्जून बोलायचे. हा सिलसिला अनेक वर्ष सुरु होता. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा होता.

कोणत्या क्षणी काय करायला हवं याच नेमकं ज्ञान त्यांना होत.

२६ जुलैच्या महापुरात मुंबई, रायगड, महाडची परिस्थिती त्यांनी एकहाती हाताळल्याचे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. दुसरीकडे कलेचीही साथ सोडली नाही.


महाराष्ट्रात असो किंवा राज्याबाहेर पण नाट्य आणि साहित्य संमेलनाला ते हजर असत. मग आमंत्रण असो किंवा नसो. आपल्याला ते कायम

हसताना दिसले तरी जवळचा कार्यकर्ता पक्षातून फुटला की त्यांनाही वाईट वाटायचं. एकांतात ‘आपलं मीठ अळणी आहे का’ अशी खंतही बोलून दाखवायचे.

पण हे वाईट वाटणंही क्षणिक असायचे. बोलता बोलता पुन्हा विषय बदलायचे आणि नव्या उत्साहाने कामाला लागायचे.

ते आज नाही हे अजूनही मला पटत नाही. त्यांचा शेवट शेवटचा संवाद तर कधीच विसरता येणार नाही. ३१ जुलैला माझा वाढदिवस आणि

त्यांचा फोन हे एक समीकरण होत. २०१२साली मात्र त्यांचा फोन नाही तर ई-मेल आला. मलाही जरा आश्चर्य वाटलं ,पण कामात असतील असं वाटलं

आणि मी मनावर घेतलं नाही. साधारण त्यानंतर दोन-चार दिवसांनी त्यांचा फोन आला. मेल बघितला का विचारलं. मी हो सांगितलं पण त्यांचा

आवाज काहीतरी वेगळंच सांगत होता. तब्येत बरी नव्हती असं कानावर आलं होतं पण आवाजात उत्साह नाही तर क्षीणपणा होता.

मी त्यांना ‘साहेब कुठे आहात’ असं विचारलं पण त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. त्यांनी उत्तर टाळण्याची ही पहिलीच वेळ होती.

थोड्या वेळाने न राहवून मी वैशाली वहिनींना फोन केला तर त्यांनी आम्ही ब्रीजकँडी रुग्णालयात आहोत सांगितलं आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

मी लगेचच त्या दिवशी रात्री मुंबईला गेलो पण दुर्दैवाने त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने चेन्नईला नेले होते. मी चेन्नईलाही गेलो पण विलासराव भेटले नाहीतच.

आम्ही परतलो ते त्यांचं पार्थिव घेऊनच. महाराष्ट्रात आलो एका हुशार, मनस्वी, माणसं जोडण्याची कला असलेल्या नेत्याला महाराष्ट्र मुकला होता.

आणि माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली ती कायमचीच !


ग्रामपंचायत सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा राजकीय प्रवास तसा सोपा नव्हता . गल्लीपासून दिल्लीपर्यंत च्या राजकारणात दबदबा असणारे

राजकारणातील राजहंस , दिलखुलास ,हसतमुख , सुसंस्कृत व्यक्तिमत्व अशा या हुशार, कर्तृत्ववान कुशल नेतृत्व करणार्या

मा.स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 


लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
error: Content is protected !!