founder of Indian navy
founder of Indian navy
founder of Indian navy

founder of Indian navy – सरखेल कान्होजी आंग्रे

founder of Indian navy 4 जुलै इ.स.१७२९ सरखेल कान्होजी आंग्रे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

founder of Indian navy सरखेल कान्होजी आंग्रे

 

founder of Indian navy 4 जुलै इ.स.१७२९ सरखेल

कान्होजी आंग्रे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

 

 

 

2/7/2021,

founder of Indian navy कान्होजी आंग्रे यांचे मुळ गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील काळोसे व संकपाळ हे मूळ आडनाव. काळोसेतील आंगरवाडी या

भागामुळे त्यांना आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. कान्होजींचे वडील तुकोजी ह्यांना छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आरमारात २५ असामींची सरदारी होती असे म्हणतात.

मराठ्यांना जिंकण्यासाठी औरंगजेब १६८१च्या शेवटी महाराष्ट्रात आला. त्या वेळी कान्होजींच्या कोकणपट्टीतील कार्यास सुरुवात झाली.

१६९४ पासून ते १६९८ पर्यंत त्यांनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे बहुतेक सर्व किल्ले कान्होजिंनी परत घेतले.

छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यां ना ‘सरखेल’ हा किताब दिला. सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो.

आपले अखंड आयुष्य founder of Indian navy कान्होजिंनी इंग्रज ,पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमारा बरोबर लढण्यातच घालवले.

१६९६ मध्ये कान्होजी यांनी कुलाबा जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले. पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना मराठी आरमाराचा मुख्याधिकारी केले.

आणी सुवर्णदुर्गाची किल्लेदारी मिळवली. सिद्धीचे वास्तव्य जंजिरा येथे असल्यामुळे त्यांच्याशी झगडण्यातच आंग्र्यांना आपले जीवन कंठावे लागले.

छत्रपती संभाजी राजांच्या कारकीर्दीत आरमारी युद्धाचे प्रसंग अनेक घडले, त्यात कान्होजींचे शौर्य व कौशल्य चांगलेच दिसून आले.

कुलाब्याचा नौकाधिपती सिधोजी उर्फ भिवजी गुजर छत्रपती राजाराम महाराजांबरोबर जिंजीला गेल्यावर मागे कान्होजी आंग्रे यांनी कारभार केला.

सन १६९८ मध्ये सिधोजी मरण पावल्यानंतर त्याजागी कान्होजींची नेमणूक झाली. founder of Indian navy कान्होजी

अत्यंत शूर, मर्द व पराक्रमी असल्यामुळे त्यांना सुवर्णदुर्गी ठेवण्यात आले.

तेथे राहून कान्होजी यांनी खूप काळजी घेऊन ,डोळ्यात तेल घालून जंजिरा प्रांत राखला.

काही किल्ले व काही ठाणी पातशाहित गेली होती ती कान्होजीने परत मिळवली .

झाडीतून हिंडणे, स्वाऱ्या करणे, शिकार करणे असे खूप काम करून त्यांनी आपले कर्तुत्व दाखवून दिले.

कान्होजीचें कर्तृत्व, पराक्रम आणि स्वपराक्रमाने स्वतःचा एक स्वतंत्र ठसा इतिहासात उमटविला. founder of Indian navy आंग्रे अठराव्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते.

आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज ,पोर्तुगीज ,डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यातच घालवले .

त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे ताब्यात ठेवून

आपला व्यापारी माल युरोपमधे पाठवण्यासाठी युरोपियन लोकांना आवश्यकता वाटत होती.

कान्होजीने या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यत केला.

परकीय सत्तांनी कान्होजीवर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही

founder of Indian navy कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्यच राहिले.

१७०० व्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्र्यांनी अलिबाग या गावाची स्थापना केली.

त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.अंदमान बेटावरही कान्होजी आंग्रे यांचा तळ असल्याचा उल्लेख आढळून येतो.

अंदमानामधील बेटे ही भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही कान्होजींना दिले जाते.

स.१७०३ पर्यंत कान्होजी सरखेल असल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग ,सिंधुदुर्ग ही चार

मराठी आरमाराची ठाणी असून मलबार पासून गुजरातपर्यंत संबंध किनाऱ्यावर कान्होजी आंग्रे यांनी आपली दहशत बसवली.

मराठ्यांचा मोगल बादशहाशी तीव्र झगडा चालू असता कान्होजीने चांगला पराक्रम गाजवून शत्रूंना हतबल केले.

मराठ्यांची पुढे लहान मोठी राज्ये निर्माण झाली, त्यात आंग्र्याचे घराणे प्रमुख असून त्यांचे संस्थापक कांन्होजी आंग्रे हेच प्रमुख होत.

कान्होजी आंग्रे अंगाने मजबूत होते. त्यांचा चेहरा उग्र व डोळे पाणीदार होते. त्यांचे हुकुम कडक असून मोडणाऱ्यास जबरदस्त शिक्षा होत असे.

परंतु हाताखालच्या लोकांशी ते उदार बुद्धीने ,ममतेने, बरोबरीच्या नात्याने वागत .सर्व दर्यात साहसी कृत्ये करून खजिना मिळवून त्यांनी मराठ्यांचे सामर्थ वाढवले.

सुमारे पंचवीस वर्षपर्यंत पाच समुद्रकिनारी निकराने लढून कान्होजी यांनी आरमारी विजय संपादन केला. त्याला इतिहासात तोड नाही.

सर्व सत्ताने एकत्रित येऊन कानोजीवर चढाई केली पण प्रत्येक वेळी सर्वांचा पराभवच झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक रत्ने मिळवली त्यापैकीच एक म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे.

महाराजांनी बलाढ्य सागरी आरमार निर्माण केले ते कान्होजी आंग्रे सारख्या निष्ठावंत, पराक्रमी व्यक्तीमुळेच इंग्रज आणि पोर्तुगीज

आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्यच राहिले

पुढे ४ जुलै १७२९ मधे कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपर्यंत ‘सरखेल’ हे पद त्यांच्याकडेच होते.

वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी कोकणचा किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी

ठरलेले मराठी आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हेच होते.परकीयांकडे संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते .

तरीही कान्होजीच्या आरमाराशी टक्कर देण्याची कोणाचीही हिंमत नव्हती.

अशा या दर्यासारंग founder of Indian navy ‘सरखेल कान्होजी आंग्रे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
history of peshwa
history of peshwa – नाना फडणवीस यांचे पुण्यस्मरण
error: Content is protected !!
%d bloggers like this: