Godse who killed Gandhi - गोडसे-गांधीच्या युतीचे नवे पर्व
Godse who killed Gandhi - गोडसे-गांधीच्या युतीचे नवे पर्व
Godse who killed Gandhi - गोडसे-गांधीच्या युतीचे नवे पर्व

Godse who killed Gandhi – गोडसे-गांधीच्या युतीचे नवे पर्व

Godse who killed Gandhi - गोडसे-गांधीच्या युतीचे नवे पर्व - दत्तकुमार खंडागळे

Godse who killed Gandhi – गोडसे-गांधीच्या युतीचे नवे पर्व

 

Godse who killed Gandhi – गोडसे-गांधीच्या युतीचे नवे पर्व – दत्तकुमार खंडागळे

 

 


Business Web Hosting

12/9/2021,

काही दिवसापुर्वी नव्याने हिंदू ह्रदय सम्राट व्हायला निघालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याची व सणांना परवानगी देण्याची मागणी केली. लागोपाठ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मंदिरं खुली करा, नाही तर रस्त्यावर उतरू ! असा इशारा सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या विधानाचे फारसे काही वाटले नाही कारण त्यांनी राजकारणाच्या खाऊ गल्लीत स्वत:चे दुकान ठेवले आहे. जो माल खपतोय तोच विकायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी झेंडा बदलला, भूमिका बदलली. मराठी माणसाचे हित, जीन्स पँंट घालून ट्रँक्टर चालवणारा शेतकरी वगैरे वगैरेंचे नवनिर्माण गुंडाळून त्यांनी आता हिंदुत्ववाद स्विकारला आहे. आता म्हणे ते हिंदुत्ववादी होणार आहेत. हिंदूत्वाची पताका खाद्यावर घेणार आहेत. पुर्वीच्या मुद्द्यावर लोक मतं देईनात म्हणून

Business Web Hosting

त्यांनी दुकानातला माल बदलून नवा माल विक्रीला ठेवला आहे. त्यांचे वागणे एका राजकारण्याला साजेसेच आहे. प्रबोधनकार ठाकरे त्यांचे आजोबा असले म्हणून काय झाले ? प्रबोधनकार पक्ष चालवत नव्हते, त्यांना निवडणूका जिंकायच्या नव्हत्या. त्यांचा लढा वेगळ्या कारणासाठी होता, यांचा वेगळ्या कारणासाठी आहे. त्यामुळे यांनी प्रबोधनकारांसारखे वागावे किंवा तशी भूमिका घ्यावी ही अपेक्षा चुकीची आहे. राजकारणाचा व्यापार करायला उतरलेला कुठलाही माणूस त्याचा फायदा बघेल की समाजाचा ? राज ठाकरे हे राजकारणातील व्यापारी आहेत. समाजात जो माल जास्त खपतोय त्याचेच ते दुकान लावणार. परप्रांतीय, मराठी अस्मिता, तीन रंगाचे झेंडे वगैरे मालाकडे गि-हाईक फिरकत नाही, गल्ला मोकळा राहतोय, माशा मारत बसावे लागतय. त्यापेक्षा माल बदलू, जे खपतय ते विकू अशी त्यांची मानसिकता आहे. त्यात चुकीचे काहीच नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या त्यांच्या दुकानाच्यादृष्टीने योग्यच आहेत. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पण लोकपालचा पार विसर पडलेल्या अण्णा हजारेंना मंदिराची आठवण व्हावी आणि त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा द्यावा हे जरा विशेष वाटले.


Business Web Hosting

खरेतर अण्णा हजारे नावाचा माणूस हा छुपा संघवाला आहे असे अनेक मित्र सांगायचे. अनेकवेळा अशा मित्रांसोबत खुप वादही घातला आहे. अण्णाच्या सामाजिक कामाच्या प्रभावाने व अण्णावरील श्रध्देने अण्णाच्या धोतरातली खाकी चड्डी कधी दिसली नव्हती. अण्णांची आंदोलने ही खरच पोटतिडकीतून चालू आहेत असे वाटायचे. अनेकवेळा अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आम्ही आंदोलने केली. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना या बाबाने दिल्ली पेटवून सोडली. अवघा भारत क्रांतीची भाषा बोलू लागला. भारतात आता फार मोठी क्रांती होणार अशी स्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनाने लोकपाल आला नाही पण देशाला एक नवा गांधी मिळाला. देशाला म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणायला हवे. संघाने उभ्या हयातीत गांधी स्विकारला नाही. त्यांना कधी Godse who killed Gandhi गांधीचे बरे वाटले नाही. प्रात:स्मरणीयांच्या यादीत त्याचे नाव घुसडले पण प्रत्यक्ष कृतीतून गांधींच्या पोटात रामपुरी चाकू घुसडण्याचे उद्योग सुरूच ठेवले व आजही आहेत. त्यांनी गांधीना यादीत घेतले पण स्विकारले नाही. अण्णा हजारेंच्या रूपाने त्यांना हवा तसा गांधी त्यांनी निर्माण केला आहे. माध्यमांच्या सहकार्याने प्रतीक्रांतीची हवा तयार करत या गांधीला त्यांनी जन्माला घातले. लोकपालचे खाटेवर बाळंतपण करून या गांधींना त्यांनी जन्माला घातले आहे.


Business Web Hosting

केंद्रातली सत्ता गेली आणि लोकपालचा जोकपाल झाला. नवे गांधी राळेगणच्या मठात ध्यानस्त व समाधीस्त झाले. त्यानंतर लोकपालचे आंदोलन गायब, लोकपालची मागणी करणारे गांधीही गायब. सांगलीतल्या एका कोंबड्याने “अण्णा अण्णा !” म्हणून साद घातली तरीपण अण्णा गायब. अण्णा उठायलाच तयार नाहीत. अण्णांच्यावर टिका करणा-या अनेकांशी वाद घालत आम्ही अण्णाची वकीली केली पण अण्णाच्या धोतरातला संघ लवकर ओळखू आला नाही. देशात सत्तांतर झाले आणि अण्णाच्या धोतरातली खाकी चड्डी हळूहळू दिसू लागली. चाणाक्ष व हूशार लोकांनी ती आधीच ओळखली होती पण आमच्या श्रध्दाळू डोक्याला अण्णा गांधीवादी नव्हेतर संघवादी आहेत हे उशिरा लक्षात आले. अण्णाची आंदोलने संघाच्या व भाजपच्या इशा-यावरची असतात याची जाणिव व्हायला वेळ लागला. लोकपालच्या आंदोलनात अण्णांच्या मागे भाजपानेच अख्खा मिडीया उभा केला होता. ते आंदोलन नव्हते तर सत्ता परिवर्तनाची एक स्ट्रँटेजी होती. तेव्हा लोकपालच्या आंदोलनात उतरलेली लाखोंची गर्दी अण्णांची नव्हतीच. संघ परिवारातील विविध संघटणांची ती गर्दी होती. त्यात रामदेवसारखे अनेक बुवा-बाबा सामिल होते. ते पण ‘इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय’ म्हणत होते. अध्यात्माच्या नावाखाली राजकीय पक्षाचे अजेंडे रेटणारे बुवा मंडळी यात जोरात सक्रीय होती. ते व त्यांची भक्तावळ या आंदोलनात पुर्ण ताकदीने उतरलेली होती. त्या सर्वांनी अण्णांच्या आडून सत्ता परिवर्तनासाठी ताकद पणाला लावली होती. केंद्रातले सरकार गेले आणि ही सगळी क्रांतीवादी, परिवर्तनवादी पिलावळ गायब झाली. आता ना कुणाला लोकपाल आठवतो ना पस्तीसचे पेट्रोल, ना काळा पैसा आठवतो. अण्णा राळेगणच्या मठात निवांत असतात. अध्येमध्ये परिवाराकडून हुकूम आलाच तर एखादे विधान करतात. जसे आत्ता, “मंदिरं खुली करा अन्यथा रस्त्यावर उतरेन !” म्हणाले तसे. बाकी सध्या अण्णा निवांत आहेत. देशात लोकपाल आलाय, देशातला सगळा भ्रष्टाचार संपलाय. देशात कुठेही, कुठल्याही कार्यालयात पैसे घेतले जात नाहीत. सरकारवाले पैसे खात नाहीत. अधिकारी पैसे खात नाहीत. अवघा देश गुण्या गोविंदाने जगतो आहे. त्यामुळे अण्णांनी तरी काय करावे ? मिठ उचलून आंदोलन करायची वेळ राहिली नाही पण खाल्ल्या मिठाला जागायला हवेच. त्यामुळेच नव्या गांधींनी मंदिरासाठी रस्त्यावर उतरायचा इशारा दिला आहे. सगळं सुरळीत असल्याने माहिती अधिकार कायद्याचीही आता गरज उरली नाही. त्यामुळे केंद्रात मोदींनी माहिती अधिकार कायद्याचीही तिरडी बांधली आहे. अण्णांना त्याचे काहीच वाटले नाही आणि का वाटावे ? कारण आता त्या कायद्याची गरज काय ? सगळा देश कसा सुजलाम-सुफलाम आहे. सगळं कसं झकास आहे.


Business Web Hosting

संघाचा हा नवीन गांधी मंदिरासाठी रस्त्यावर उतरणार आहे. गांधी जसे नवे भेटले आहेत तसे नथूरामही भेटला आहे. कदाचित आता नथूराम गोडसेही त्यांच्या हातात हात घालून आंदोलन करेल. संघाच्या या नव्या गांधीमुळे Godse who killed Gandhi गांधी-गोडसे हत्यावादही संपुष्टात येईल. या निमित्ताने गांधी गोडसे मैत्रीचे एक नवे पर्व देशात सुरू होईल. संघाचा हा नवा गांधी आणि संघाचा आत्मा असलेला नथूराम यांची नवी युती महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी मैदानात उतरेल. महाराष्ट्रात रामराज्य आल्याखेरीज ही युती शांत बसणार नाही असे वाटतय.

 

 

Postbox India

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
News Anchor
News Anchor – एका अँकरचा मृत्यू आणि.
error: Content is protected !!
%d bloggers like this: