Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

Gowri Ganesha festival – मजबुरी का नाम, पांडुरंग-गणपती

1 Mins read

Gowri Ganesha festival – मजबुरी का नाम, पांडुरंग-गणपती

 

 

Gowri Ganesha festival – घंटा बजाव ! बेकारी बुजाव ! , भक्ती नको, भाकरी हवी

 

 

 

लेखक : ज्ञानेश महाराव

 

11/9/2021,

गणपती हा सकल कलांचा कलेश्वर! पण त्या कलांत राजकारणाची कला नाही. तथापि, ‘नटेश्वर’वर थक्क होऊन पाहत राहील, अशा कलागती सध्या राजकीय पक्षनेते करीत असतात.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ‘भाजप’ने ‘मंदिर खोलो’ मागणीची घंटा वाजवण्याचं जाहीर केलंय. त्यात गर्दी दिसल्यास अण्णा हजारेही आपल्या आंदोलनी घंटेसह सामील होतील.

”राजकीय सभा- मेळाव्यांना, हाणामाऱ्यांना ‘कोरोना’चे निर्बंध आडवे येत नाहीत. ते फक्त सण-उत्सवांच्या बंदीसाठीच आहेत का,” असा जाहीर सवाल ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे

यांनी राज्यातल्या ‘महाविकास आघाडी सरकार’ला विचारलाय. त्यांनीही Gowri Ganesha festival ‘मंदिर खोलो’साठी सरकारला १० सप्टेंबरची मुदत दिलीय. आंदोलनाच्या ह्या डबल-ट्रिपल बारची दखल

घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जरा धीर धरा’चा सल्ला विरोधकांना दिलाय. ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सज्ज राहा! हॉस्पिटलचे ऑडिट करा! बेड, व्हेंटिलेटर्स,

औषधं, ऑक्सिजन; ह्यात काही कमी नाही ना, ते तपासा!” अशा सूचना यंत्रणांना देत मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेचं गांभीर्य जनतेपर्यंत पोहोचवलं. त्याने ‘मंदिर खोलो’

आंदोलनाचे ताबूत थंडे पडण्याची शक्यता अधिक आहे.

Gowri Ganesha festival ‘मंदिरे खोलो’चा आवाज ‘भाजप परिवार’तर्फे वर्षापूर्वी पहिला ‘अनलॉक’ जाहीर झाला, तेव्हापासून दिला जात आहे. मदिरा चालू, मंदिरे बंद !

उद्धवा तुझा, कारभारच धुंद !

अशा घोषणांचे फलक उंचावत ‘भाजप’ने गेल्यावर्षीच्या २९ ऑगस्टला महाराष्ट्रभर ‘घंटानाद आंदोलन’ केलं होतं. त्यात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेव्हा आणि आता ‘शिवसेना’ हा पक्ष ‘महाविकास आघाडी सरकार’मध्ये प्रमुख घटक पक्ष आहे म्हणून; अन्यथा या मंदिरं उघडण्यासाठीच्या घंटानादात ‘शिवसेना’ ही ‘डॉक्टर बरोबर कंपाउंडर असलाच पाहिजे,’ या जिद्दीने सामील झाली असती. असो. आताही अण्णा हजारे यांनी Gowri Ganesha festival ‘दारूची दुकानं वर्षापूर्वी खुली केली आणि देऊळ बंद का,’ असा सवाल ‘ठाकरे सरकार’ला केला आहे.
‘कोरोना व्हायरस’ची संसर्गजन्य साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने गेल्या २३ मार्च २०२० पासून देशव्यापी टाळेबंदी जारी केली. यानंतरचे जवळपास १०० दिवस सर्व उद्योग, व्यवसाय, कार्यालये, दळणवळण पूर्णतः बंद होते. १ जुलै २०२० पासून ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात काही व्यवसाय-उद्योगांना निर्धारित वेळेसाठी आणि सुरक्षेच्या नियमावलीनुसार काम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्याच्याही आधी म्हणजे, ३ मे २०२० रोजी ‘राज्य सरकार’ने दारूच्या दुकानांना विक्रीसाठी मुभा दिली. कारण छुपेपणे दुप्पट-तिप्पट भावात दारूची विक्री होतच होती. त्याला आळा घालणं, हे सरकारचं कर्तव्य होतं. तथापि, दारू विक्रीवरच्या करातून सरकारला दरमहा शेकडो कोटी रुपयांचा महसूल मिळत असल्याने, दारूच्या काळाबाजाराला चाप लावण्याऐवजी सरकारने दारू विक्री खुली केली. या निर्णयावर तेव्हा टीका झाली. तेव्हा ‘भाजप’ व ‘हिंदुत्ववादी संघटनां’नी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली ‘मदिरा खुली करताय ना? मग मंदिरंही खुली करा!’ असा आग्रह धरून ‘ठाकरे सरकार’ला अडचणीत आणलं पाहिजे होतं. त्याने ‘मंदिर खोलो’साठीच्या घंटानाद आंदोलनातील ‘मदिरा- मंदिरा’चे फलक नाचवणं योग्य ठरलं असतं. तसं झालं नाही. म्हणूनच आता मदिरेचा दाखला देत केलं जाणारं मंदिरं उघडण्याचं आंदोलन, हे सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयाविरोधात चीड निर्माण करीत नाही. तर, ते ‘बाटली दिलीत ना ? मग आता ग्लास आणि चकनाही द्या,’ असा हट्ट धरणारं झालं आहे !

भक्ती नको, भाकरी हवी

अशीच उलट्या पिसाची अस्सल कलाकारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही अनपेक्षितपणे केली होती. गेल्या वर्षीच्या ३१ ऑगस्टला ‘विश्व वारकरी सेना’ने हजारो वारकऱ्यांसह पंढरपुरात ‘विठ्ठल मंदिर प्रवेश’चं आंदोलन केलं. त्याचं नेतृत्व ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं. यासाठी ”हिंदुत्वाच्या राजकारणाने जोर धरल्यापासून पूर्वी ‘काँग्रेस’च्या जवळ असलेला वारकरी समाज कायम ‘भाजप- शिवसेना’च्या सोबत राहिलेला आहे. हा वारकरी समाज ‘वंचित’कडे गेल्यास ते विचारांचे ध्रुवीकरण असेल,” असा युक्तिवाद केला गेला. तो पटणारा नव्हता. ॲड. प्रकाश आंबेडकर हे कडवे ‘संविधान’ समर्थक आणि लोकशाहीवादी आहेत. ते जात-धर्म-पंथ-संप्रदायवादी नाहीत. पण त्यांचा तिरस्कार करणारेही नाहीत. तथापि, वारकर्‍यांची अस्वस्थता जाणून घेऊन, ते केवळ ‘वारकऱ्यांच्या ध्रुवीकरणाचा उद्देश ठेवून मंदिर प्रवेशाचं आंदोलन करतील,’ असं तेव्हाही वाटलं नव्हतं.
Gowri Ganesha festival पंढरपुरात तेव्हा ‘कोरोना’ पेशंटची संख्या वाढत होती. ‘कोरोना महामारी’च्या कारणास्तव आताच्या २०२१च्या आषाढी एकादशीच्या प्रमाणेच २०२०चीही ‘पंढरीची वारी’ वारकऱ्यांनी कोणतीही खळखळ न करता, वास्तवाचं भान राखून स्वखुषीने रद्द केली. तेच वारकरी पंढरीत ‘कोरोना’ महामारीचा फेरा सुरू असताना ‘नको मज देवा, गुंतवू मायाजाळी’ म्हणत लाखोंच्या संख्येने मंदिर प्रवेशासाठी जमतील, असं वाटत नव्हतं. स्पष्टच सांगायचं तर, लोक जमतीलही, पण ते ‘वारकरी’ असतील याची खात्री देता येत नव्हती. हा बोगस गर्दीचा अनुभव प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा- विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला शून्यावस्थेत ठेवून घेतला होता. त्याप्रमाणेच झालं. आंदोलन प्रचंड गर्दीत झालं, पण मंदिर प्रवेश खुला झाला नाही. ‘शक्ती प्रदर्शन’ झालं आणि तीन महिन्यांनी झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या उमेदवाराचा अनपेक्षित पराभव झाला आणि ‘भाजप’चे समाधान अवताडे हे जिंकले.
असो. वारकऱ्यांना संप्रदायाच्या शुद्ध विचारात आणण्यासाठी, विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी पंढरीत जमवण्याची गरज नव्हती. त्यांच्या डोक्यातून ‘मंदिर-मशीदचं राजकारण’ काढण्याची आवश्यकता होती आणि आहे. देहूत ‘गाथा मंदिर’च्या माध्यमातून जे अवतारी थोतांड उभे केलंय, ते दाखवण्यासाठी तिथे वारकऱ्यांचा मोर्चा नेण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशकातल्या ‘काळाराम मंदिर प्रवेशाचा’ ऐतिहासिक सत्याग्रह (२ मार्च १९३०) केला. तो वर्ण्यवर्चस्ववाद्यांनी अस्पृश्य ठरवलेल्यांना देवखुळे बनवण्यासाठी नव्हता. तो सामाजिक विषमतेचं, जातीभेदाचं जाहीर प्रदर्शन घडवण्यासाठी होता. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांचे नातू ‘वारकऱ्यांची मंदिर प्रवेशाची हौस’ पुरवत असतील; तर ते वारकऱ्यांसह पंढरपूरकरांना ‘कोरोना’च्या जीवघेण्या जबड्यात लोटणारं ठरणार, हे अटळच होतं. तसंच झालं.
पंढरपुरात कोरोना’ग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आणि खाजगी हॉस्पिटल चालकांच्या कमाईत दर आठवड्याला पतसंस्थांत ९० लाखांची गुंतवणूक करेपर्यंत वाढ झाली. मंदिरं खुली करण्यासाठी वैचारिक आदळआपट करणारे मोर्चेवाले प्रकाश आंबेडकर असोत; अण्णा हजारेंसह घंटानादवाले ‘भाजप’ वा ‘मनसे’चे नेते-कार्यकर्ते असोत! त्यांना सत्याची खरोखरच चाड असेल, तर त्यांनी आपली ताकद ‘लॉकडाऊन’ चुकीच्या पद्धतीने लादल्यामुळे राज्यातल्या लाखो कामगार-कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्यात ; ज्यांना २५-४० टक्के पगार कपातीत ‘वर्क फॉर्म होम’ किंवा कामावर जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रोज दोन-तीन तासांचा प्रवास करावा लागतोय ; त्यांच्यासाठी सरकार काय करतंय, याचा जाब विचारण्यासाठी लावावी! शाळा- कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? त्यांनी ‘कोरोना-लॉकडाऊन बॅच’वाले अशी हेटाळणी उर्वरित आयुष्यभर ऐकायची का? छोटे धंदेवाले, दुकानवाले, मोठ्या दुकान- मॉलमधील कामगार, रोजंदारीवर काम करणारे कामगार, सिनेमा- सिरियल-नाटकातून, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतून काम करणारे कलावंत, तंत्रज्ञ; नोकरी गमावलेले पत्रकार व इतर कर्मचारी यांची अवस्था भयानक आहे.
अनेकांपुढे घराचे भाडे आणि कर्जाचे हप्ते कसे द्यायचे, हा प्रश्न आहे. बरेच जण आपल्या संघटनांकडून, कुणा पुढाऱ्यांकडून काही मदत मिळते का, याची त्रयस्थांमार्फत चाचपणी करतात आणि आपली इज्जत राखण्यासाठी गर्दीची वेळ टाळून मदत घेऊन जातात. त्यातही कुणी नजर रोखून पाहत राहिल्यास ‘गरजू मित्राला देण्यासाठी घेऊन जातोय,’ असं सांगत जीवनावश्यक वस्तूंचं ‘किट’ घेऊन सटकतात. ही मजबुरी आहे. लोकांना कष्टाची भाकर खायचीय ! त्यांना ‘महाविकास आघाडी सरकार’ विरोधक ‘मदिरा-मंदिर’च्या महामारीत गुंतवण्याच्या प्रयत्नात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लोकांच्या रोजीरोटीच्या मागण्यांना बगल देऊन ‘आधी आरोग्य, मग उत्सव’ हा डोस देणे सोपे जाते.

मजबुरी का नाम, पांडुरंग-गणपती

Gowri Ganesha festival ‘मोदी सरकार’च्या ‘नोटाबंदी’च्या तुघलकी निर्णयाने (८ नोव्हेंबर २०१६) छोटे-मध्यम उद्योगधंदे उद्ध्वस्त करून आधीच बेकारीत वाढ केलीय. त्यातून सावरत असतानाच ‘कोरोना- लॉकडाऊन’चा घाव चुकीच्या पद्धतीने घालण्यात आला. ‘लॉकडाऊन’ हा ‘कोरोना महामारी’ला रोखण्याचा, संपवण्याचा उपाय नाही, हे स्पष्ट झालं असतानाही लोकांच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी सरकारने अजूनही दाखवलेली नाही. ‘कोरोना, ही देवाची करणी आहे,’ असं सांगून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या चुकीच्या उपायांना झाकण्याचा प्रयत्न केला. उद्योगधंद्यांना गती येण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचं ‘पॅकेज’ जाहीर केलं. त्याचं काय झालं? बेकार केले गेले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या का? ते ‘विष्णू अवतारी’ प्रधानमंत्रीही सांगत नाहीत. ‘कोरोना’च्या दुसऱ्या जीवघेण्या लाटेनंतर देशात आणि महाराष्ट्रात ५००- १०००- २००० खाटांचं ‘कोविड सेंटर/ हॉस्पिटल’ उघडण्याचा आणि ‘ऑक्सिजनचे प्लांट’ उभारण्याचा सपाटा सुरू आहे. ते लोकांत भय वाढवण्यास पुरेसं आहे. ‘कोरोना प्रतिबंधक लस’ आल्यावर हे संकट संपेल, असा सर्वांचा अंदाज होता. तोही खोटा ठरलाय.
अनिश्चितता आणि भय, यांच्या कचाट्यात जनता सापडलीय‌. अशी परिस्थिती जगातल्या सर्वच देशांत आहे‌. पण अनेक छोट्या- मोठ्या देशांच्या सरकारांनी ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांचं होणारं नुकसान त्यांना आर्थिक मदत देत भरून काढलंय. आपल्याकडे फक्त ‘आत्मनिर्भर’ची ‘मन की बात’ झाली. केंद्र असो वा राज्य सरकार ; दोन्ही सरकारांना जनतेला कशाची गरज आहे, याची फिकीर नाही. ‘कोरोना’च्या भयाआडून मनमानी सुरू आहे. या विरोधात लोकांनी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची, घंटानाद करण्याची गरज आहे. हातांना कामाची, नोकऱ्यांची गरज असताना, त्यांच्या हातात घंटा देता ? लोकांना कष्टाची भाकरी हवीय ; शरणागत करणारी भक्ती नकोय ! हे ज्यांना सोयीने समजत नाही, ते ‘मंदिर- मशीद’ हा खेळ संपल्यामुळे आता ‘मदिरा-मंदिर’ यासारखे फसवे खेळ खेळणारच ! जनतेच्या आशा-आकांक्षांना मुंगीसारखं चिरडायचं, तर नशापान खुलं केलंच पाहिजे. त्यात देव-धर्माची नशा ही मदिरेपेक्षा भारी आणि व्यापक !
Gowri Ganesha festival ”लॉकडाऊन’ने देव- देवळाभोवती व्यवसाय करणाऱ्या लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय! तो मंदिरांचे निर्बंध हटवल्याने सुटेल,” ह्या ‘मंदिर खोलो’वाद्यांच्या फडणवीशी म्हणण्यात तथ्य आहे. तथापि, ह्या दगड- धोंड्यांच्या जागृत थोतांडाभोवती निर्माण झालेलं अर्थकारण ही अभिमानाने सांगण्यासारखी बाब नाही! भट- ब्राह्मणाचं पोट हे श्रद्धा-भक्तीच्या शेंडीत आणि जानव्याच्या ब्रह्मगाठीत बांधलेलं असतं. त्यातूनच श्रद्धास्थानं – तीर्थस्थानं निर्माण झालीत. मात्र त्याभोवती जो बाजार उभा राहतो, त्यातील विक्रेते राजीखुशीने भक्त-भाविकांना आपली गिऱ्हाईक बनवत नसतात. शिक्षण असून आणि मेहनत करण्याची तयारी असूनही नोकरीची संधी मिळत नाही ; मिळाली तर अचानक बेकारीची कुऱ्हाड कोसळली, म्हणून त्यांनी देवळाभोवती आपला धंदा मांडलेला असतो. त्यात आता ‘लॉकडाऊन’च्या बेकारांची भर पडलीय.
दगड्या देवाची पूजा-अर्चा करून भटा- ब्राह्मणांचा भिकार भिक्षुकीपणा संपत नाही ; तसा फोटो, हार, पूजेचं सामान विकल्याने आपला उद्धार होणार नाही, ह्याची जाणीव या विक्रेत्यांना असते. तरीही ‘मजबुरी का नाम पांडुरंग-गणपती’ म्हणत ते धंद्यासाठी रोजचे १५-१६ तास खपत असतात. आपल्या पुढच्या पिढ्यांना शिक्षण देत, वाट्याला आलेल्या मजबुरीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असतात. हा मजबुरीचा बाजार उठवण्याचं काम सरकारचं आहे आणि या विक्रेत्यांना पर्यायी काम देण्यास सरकारला भाग पाडणं, हे विरोधकांचं कर्तव्य आहे. यासाठी घंटानाद व्हायला हवा. ‘लॉकडाऊन’मुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. ते अरिष्ट टाळता येत नसेल ; तर किमान कामगारांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणाऱ्या व्यवस्थापनास उर्वरित सेवानिवृत्तीच्या वर्षांइतके पगार देण्यास भाग पाडा. त्यासाठी टाळ्या-थाळ्यांचा दणदणाट करा! या नोकऱ्या गमावताना हातात जे थोडेफार पैसे आले ; त्यात मौजमजा करण्यासाठी सरकारने दारू विक्री खुली केली आणि आता जे काही पैसे उरले असतील, ते देवळाभोवतीच्या बाजारात साफ व्हावेत, यासाठी देवळं खुली करण्याची मागणी केली जातेय, असं का नाही समजायचं ?

 

For Anytime everything more #intresting #authentic #trending #valuable #content #best visit on Homepage – Postbox India (Homepage – Postbox India (https://www.postboxindia.com)) & https://www.postboxlive.com

 

सद्-गती देण्यास जनता समर्थ

गुणवंताला संधी आणि गरजवंताला काम देणं, हे सरकारचं कर्तव्य आहे! माणसाचे ‘हात’ हे कष्टाची भाकर कमावून खाण्यासाठी आहेत. ‘स्वामी- स्वामी’, ‘बाप्पा- बाप्पा’ करीत टाळ्या वाजवत फिरण्यासाठी नाहीत. हे समजण्यासाठी ‘कोरोना’सारखं संकट कोसळण्याची आवश्यकता नाही. हेच शाहीर अमर शेख (जन्म : २० ऑक्टोबर १९१६; मृत्यू : २८ ऑगस्ट १९६९) स्वत:च्या ओळखीतून सांगताना म्हणतात-
जीवनावरती माझी श्रद्धा।
सत्यावरती असीम भक्ती –
सत्य जगाला सांगा या।
शब्द, चल ये गायला –
अशा निश्चयाने त्यांनी शोषित- वंचितांमध्ये स्वाभिमानाची, हक्कांची जाणीव निर्माण करून; त्यांना असत्य, अन्यायावर तुटून पडण्यासाठी सिद्ध-सज्ज केलंय. त्यासाठी माणसाच्या दोन हातांची थोरवी सांगताना अमर शेख काकुळतीने म्हणतात –
दुनिया दोन हाताची रे बाबा।
दुनिया दोन हाताची॥
दोन हातामधल्या या वीतभर।
भगवन् मंदिराची रे बाबा ॥१

एक हात गगनास गवसणी।
दुजा सागरा ओढून आणी॥
त्याच्या कर्तृत्वाची गाणी।
सांग कुणी गायची रे बाबा ॥२

दोन हात जर नसते तर मग।
उभे राहिले असते का हे जग ?
या उपाशी हाताची तगमग।
कुठवर साहायाची रे बाबा ॥३

सौंदर्य तुझे रिझवायाला । दगडामधुनी इतिहास निर्मिला॥
याच हातांनी देव घडविला।
काढून साक्ष कुणाची रे बाबा॥४

देवे केले काय न ठावे।
स्तुति स्तोत्र का त्याचे गावे ?
विश्वनाथ भरला दो हाती।
पूजा करूया त्याची रे बाबा॥५
दुनिया दोन हाताची… !
जनतेच्या ह्या दोन हातांना काम द्या ! सरकारी कर्मचाऱ्यांना ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीला ५-६ महिने आठवड्यात एक- दोन दिवस हजेरी लावली तरी, महिन्याचा पगार मिळालाय. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ने बेरोजगार केलेल्यांच्या ; अर्धवट पगारावर दिवस ढकलणाऱ्यांच्या; शिक्षण पूर्ण झालं तरी नोकरी-धंदा करण्याची हिंमत हरलेल्यांच्या मस्तकातील संतप्त चीड अजून सरकारच्या काना-मनापर्यंत पोहोचलेली नसावी. चूड लावल्याशिवाय बूड हलत नसेल तर, ते कर्तव्यतत्पर सरकारचं लक्षण नाही. ‘कोरोना’ लाटेच्या भयाआडून लोकांना निकामी केलं जातंय. ‘आयटी’तल्या बेकाराने सुक्या मासळीचा धंदा करावा आणि पत्रकाराने चहावाला व्हावं, ही इष्टापत्ती नाही. ती सरकारच्या विरोधातल्या नाराजीची घंटा आहे ! लोकांना भाकड भक्ती नकोय! हक्काची भाकरी हवीय! नोकरी हवीय!! Gowri Ganesha festival ती मिळवून देण्याची सद्बुद्धी गणरायांनी राज्यकर्त्यांना द्यावी. अन्यथा, सद्-गती देण्यास जनता समर्थ आहे !

 - ज्ञानेश महाराव

Leave a Reply

error: Content is protected !!