gwalior news today - shrimant madhavrao shinde
gwalior news today - shrimant madhavrao shinde
gwalior news today - shrimant madhavrao shinde

gwalior news today – श्रीमंत माधवरावजी शिंदे ( गाॅल्हेर )

gwalior news today - श्रीमंत माधवरावजी शिंदे ( गाॅल्हेर ) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

gwalior news today – श्रीमंत माधवरावजी शिंदे ( गाॅल्हेर )

 

gwalior news today – श्रीमंत माधवरावजी शिंदे ( गाॅल्हेर ) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

 

 

24/9/2021,

माधवराव शिंदे यांचा जन्म १० मार्च 1945 रोजी ग्वाल्हेरच्या शिंदे कुटुंबात झाला.शिंदे राज घराण्याची स्थापना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील

कन्हेरखेड गावच्या जनकोजी राव यांचा मुलगा राणोजी शिंदे यांनी केले. दौलतरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी बाईजाबाई यांनी साम्राज्य चालवले .

त्यानंतर मुलगा जनकोजीराव यांनी कारभार पाहिला.जनकोजीच्या निधनानंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी यशस्वीरित्या पुढे कार्य केले.

ताराबाई यांनी जयाजीराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले. जयाजीराव शिंदे यांनी संस्थांनाचे भारतात विलीनीकरणाला मान्यता दिली.

राज्य इतर राज्यात विलीन झाल्यामुळे मध्य भारताचे नवीन राज्य बनले. मध्यभारत मध्य प्रदेशात विलीन झाल्यावर जियाजीराव यांनी राज्य प्रमुख म्हणून काम केले .

नंतर जियाजीराव यांच्या पत्नी राजमाता विजयाराजे शिंदे या जनसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या अशाप्रकारे शिंदे घराण्याची राजकारणात वाटचाल सुरू झाली.

माधवराव शिंदे यांच्या आई विजयाराजेआणि वडील जियाजीराव शिंदे हे होत. ग्वाल्हेर राजघराण्याचे शाही पुत्र म्हणून माधवराव शिंदे यांचा जन्म झाला होता.

माधवराव शिंदे यांचे शिक्षण सिंधिया स्कूलमधून झाले. सिंधिया शाळा ग्वाल्हेरमध्ये त्याच्या कुटुंबियांनी बांधली होती.

त्यानंतर पुढील माधवराव शिंदे यांचे शिक्षण ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाले. ( gwalior news today )

माधवराव शिंदे यांचा विवाह माधवीराजे यांचेशी झाला. माधवराव शिंदे यांना दोन मुले. मुलगा ज्योतिरादित्य आणि मुलगी चित्रांगदा राजे .

ज्योतिरादित्य शिंदे हेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात सक्रीय आहेत. मध्य प्रदेशच्या निवडक राष्ट्रीय

राजकारण्यांमध्ये माधवराव शिंदे यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.

माधवराव शिंदे हे केवळ राजकारणासाठीच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रातही प्रसिद्ध होते.क्रिकेट, गोल्फ, घोडेस्वारी आणि सर्व काही आवडत

असूनही माधवराव शिंदे हे अतिशय साधेपणे जीवन जगत होते. माधवराव शिंदे हे चार बहिणी मध्ये एकुलते एक भाऊ होते.

वयाच्या 26 व्या वर्षी माधवराव शिंदे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जनसंघाचे सदस्यत्व त्यांना दिले होते .परंतु ते जास्त काळ या पार्टीत राहिले नाहीत.

माधवराव शिंदे यांच्या आई विजयाराजे शिंदे यांना आपल्या पुत्राने भाजपमध्ये यावे अशी खुप इच्छा होती .नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली.” सत्य”

काॅग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते कै.श्रीमंत माधवराव राजे शिंदे आजुन काळ जगले असते तर कदाचित देशाच्या राजकारणाला वेगळे वळण लागले असते.

” राजकीय पलटवारचा महानायक”

१९७१,१९७७,१९८० आणि १९९९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश राज्यातील “गुणा ” लोकसभा मतदारसंघातून निवडून आले तर

१९८४,१९८९,१९९१,१९९६आणि१९९८च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मध्यप्रदेश राज्यातील “ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

त्यांनी१९८४च्या लोकसभा निवडणुकीत “ग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पराभव केला.

त्या नंतर ते राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते.त्या नंतर ते पी.व्ही.नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात नागरी विमान वाहतूक मंत्री

आणि मनुष्यबळ विकास मंत्री होते.१९९६साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्या नंतर त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला

आणि काॅग्रेस पक्षाच्या बाहेर पडुन स्वत:चा मध्येप्रदेश विकास हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते

१९९६च्या निवडणुकीत लोकसभा निवडणून गेले पी.व्ही.नरसिंहराव यांनी काॅग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काॅग्रेस मध्ये परतले

आणि त्यांनी आपला पक्ष काॅग्रेस मध्ये विलीन केला १९९९च्या लोकसभा निवडणुकी नंतर ते काॅग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपध्याक्ष बनले.

लखनौ येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करायला दिल्लीहून विमानाने जात असताना श्रीमंत माधवराव शिंदे यांचे ३०सप्टेबंर २००१ रोजी विमान अपघातात निधन झाले.

असे थोर राजकरणातले “महानायक ” कै. श्रीमंत माधवराव राजे शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो ‌

1996 मध्ये त्यांनी मध्य प्रदेश विकास काँग्रेसची स्थापना केली. पण जेव्हा सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा परत ते मूळ पक्षात आले .

1999 मध्ये सोनिया गांधी बद्दल परदेशी मुद्दा उपस्थित झाला तेव्हा माधवराव शिंदे हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले गेले.

2002 पासून ते 14 वर्ष सलग चार वेळा खासदार म्हणून सक्रिय राहिले. ( gwalior news today )

माधवराव शिंदे यांचे पूर्वज सातारचेच (कण्हेरखेड) येथील.१७व्या शतकात महादजी शिंद्यांचे दिल्लीत वजन होते ,

तर चालू अलीकडच्या काळातही शिंदे कुटुंबीय आपला दबदबा टिकवून आहेत.

“स्व. माधवराव शिंदे यांना कण्हेरखे जि.सातारा बद्दल विशेष आस्था होती. त्यांनी सातत्याने आपल्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले.

त्यांचे या भूमीशी केवळ भावनिक नाते नव्हे तर रक्ताचे आणि मातीचे नाते होते. गावच्या भैरवनाथ मंदिराचा जीर्णोध्दार माधवराव शिंदे यांनी केला होता.

त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी आता गावाचा विकास साधणार आहे,अशी माजी ग्वाही केंद्रीय व्यापार व वाणिज्य राज्यमंत्री श्रीमंत ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली होती.

कण्हेरखेडचे ग्रामस्थ व महादजी शिंदे स्मारक समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या महाराजा श्रीमंत माधवराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण,

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व सांस्कृतिक भवनाचे उदघाटन अशा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने ते कण्हेरखेड येथे आले होते.

संपूर्ण देशावर मराठ्यांचे राज्य आणण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कण्हेरखेड गावाचे ऐतिहासिक महत्व आजही कायम आहे.

ना. माधवराव शिंदे हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय होते. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी आपली जन्मभूमी कण्हेरखेडच्या

विकासासाठी भरीव प्रयत्न केले. त्यांच्या अकाली निधनानंतर पक्षाची मोठी हानी झाली. त्यांच्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जबाबदारी पडली.

त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सरकार आणि पक्षात मोठमोठ्या जबाबदाऱ्या लीलया पेलल्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान

ते कण्हेरखेडला आले होते, ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांच्याकडे पाणीपुरवठा योजनेची मागणी करण्यात आली. त्यांनी त्यावेळी पुढे येताना पाणी योजना आणेल,

असा शब्द दिला होता. आज तो शब्द पाळला असून राज्य शासनाने 54 लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजनेतून कण्हेरखेडसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

या योजनेसाठी लोकवर्गणी म्हणून सहा लाख रुपये स्वत: शिंदे घराण्याने भरले आहेत. केवळ योजना शासन देणार नाही, तर कण्हेरखेडसाठी तातडीने

प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मी आताच जिल्हाधिकाऱ्यांना देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पानिपतच्या लढाईत वीर मरण आलेल्या

16 वीरांच्या स्मरणार्थ 16 खांबी स्मृतिमहाल उभारण्यात येणार आहे. गावातील ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी पर्यटन खाते आणि पुरात्तत्व

विभागामार्फत प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाणार आहे. ( gwalior news today  )

देशातील वलयांकित घराणे म्हणून शिंदे घराण्याची ओळख असून या घराण्याला पराक्रमाचा फार मोठा वारसा आहे.

माधवराव शिंदे यांनी काँग्रेस पक्षात अत्यंत चांगले काम केले आहे.रेल्वे मंत्री असताना त्यांनी आपल्या कामाचा खुप चांगला ठसा ऊमटवला.

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात ३० फेब्रुवारी २००१ मध्ये माधवराव शिंदे यांचे निधन झाले माधवराव शिंदे अजून काही काळ जगले असते

तर कदाचित देशाच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले असते .

कै.श्रीमंत माधवराव शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Also Visit : https://www.postboxlive.com

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
Our Philosophy
Our Philosophy चार्वाकवाद – आस्तिकवाद नास्तिकवाद
error: Content is protected !!
%d bloggers like this: