Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Gwalior – सिंधिया राज्याचे शेवटचे महाराजा

1 Mins read

Gwalior – सिंधिया राज्याचे शेवटचे महाराजा

Gwalior – सिंधिया राज्याचे शेवटचे महाराजा

 

 

 

 

16/7/2021

अलीजाह बहादूर श्रीमंत महाराजा जिवाजीराव शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा

आज अलीजाह बहादूर श्रीमंत महाराजा जिवाजीराव शिंदे यांची पुण्यतिथी. श्रीमंत जिवाजीराव शिंदे हे ग्वाल्हेर राज्याचे महाराज

आणि स्वातंत्र्यानंतर स्थापिलेल्या मध्य भारत राज्याचे प्रथम राज्यप्रमुख होते. अतिशय प्रतिभावान, राष्ट्र्भक्त, कुशल प्रशासक आणि

जनतेमध्ये अतिशय प्रिय असे जिवाजीराव महाराज होते.

ग्वाल्हेर ( Gwalior )राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे जिवाजीराव शिंदे हे आजोबा आणि सिंधिया राज्याचे शेवटचे महाराजा.

जिवाजीराव शिंदे यांच्या पत्नीचे नाव विजया राजे.त्या नेपाळच्या राजघराण्यातील राजकन्या होत्या . जिवाजीराव शिंदे यांना एकंदर चार आपत्ते होती.

पहिल्या उषाराजे, माधवराव शिंदे ,वसुंधराराजे आणि यशोधराराजे.

देशातील सर्वात शक्तिशाली सिंधिया राज्याचे शेवटचे राज्यकर्ते म्हणून जिवाजीराव प्रसिद्ध होते . जिवाजीराव सिंधिया गाॅल्हेर ( Gwalior ) राज्याचे महाराजा होते.

यानंतर ग्वाल्हेरचे राज्य मध्य भारतात विलीन केले गेले, जे नंतर मध्य प्रदेशचा एक प्रमुख भाग बनले. जिवाजीराव यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य केले.

त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या वेळी त्याच्या कोषागारामधून ५४ कोटी रुपये त्यांनी सरकारला दिले, त्याचबरोबर राज्य सरकारला

आपल्या कार्यालया साठीही आपल्या बहुमोल इमारती दिल्या आहेत.

मराठा सरदारांपैकी गाॅल्हेरच्या शिंदे घराण्याने सर्वाधिक प्रगती करून दाखविली आणि ग्वाल्हेरला उज्जैनहून लष्करमार्गे

आपली राजधानी बनविली.शिंदे घराण्याने एकीकडे दक्षिणेतील सुल्तान आणि दुसर्‍या बाजूला ब्रिटीशांशी चांगले राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते.

दक्षिणेच्या राज्यकर्त्यांकडून आणि ब्रिटीश सरकारकडून या कुटूंबाला प्राप्त झालेल्या पदव्यांचा आढावा घेतला तर या कुटुंबात

मुत्सद्दी आणि कौशल्य किती होते हे स्पष्ट होईल. शिंदे घराण्यातील लोकांनी युद्धामधे कधिही कोणत्याही बाजूचे समर्थन केले नाही,

परंतु त्यावेळी ब्रिटीशांशीही त्याचे चांगले संबंध होते.गेल्या दोन अडीचशे वर्षात या कुटुंबाच्या अखंड शक्तीमागील मुख्यत: दोन कारणे आहेत.

एक, या कुटुंबाचे दूरदर्शी व्यावहारिक राजकारण आणि दुसरे, आधुनिकतेचे धोरण. कुटुंबातील काही राज्यकर्ते, ज्यात स्त्रियांचे सुद्धा समान योगदान आहे.

राजस्थानच्या भाजपा सरकारमध्ये वसुंधरा राजे सिंधिया सध्या मुख्यमंत्री आहेत.

ब्रिटीश सरकारने जेंव्हा जिवाजीराव शिंदे यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की त्यांनी स्वतंत्र रहावे किंवा भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हावे.

परंतु सिंधिया कुटुंबाने भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे जीवाजीराव यांना मध्य भारताचे राजप्रमुख बनवले गेले.

ब्रिटिश सरकारने जेंव्हा भारत सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भारत देशात पाच मोठी संस्थाने होती. पाचवे सर्वात मोठे संस्थान म्हणजे ग्वाल्हेर.

तेथे जिवाजीराव शिंदे स्वातंत्र्यानंतरही राज्य करत राहिले. जिवाजीराव यांनी आपल्या व आसपासच्या छोट्या-छोट्या

राज्यात सामील होऊन मध्य भारत या नावाने नवीन राज्य स्थापन करण्याचा करार स्वीकारला. नव्या राज्याच्या प्रमुखांना ‘राजप्रमुख ‘असे म्हटले जात असे, तर मध्य भारताचा पहिला ‘राजप्रमुख’ असल्याचा अभिमानही जिवाजीराव शिंदे यांच्या नावावर आहे १९५६ मध्ये मध्यप्रदेशची स्थापना होईपर्यंत जिवाजीराव शिंदे हे राज्य प्रमुख म्हणून कार्यरत राहिले.
जिवाजीराव यांच्या पत्नी विजयाराजे सिंधिया यांनी निवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी भारताच्या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये मजबूत असे आपले स्थान राखले आहे.राजघराण्यापासून लोकशाहीपर्यंत आपले वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी झालेल्या या कुटुंबाला भारताचे एक प्रमुख राजकीय कुटुंब म्हटले जाऊ लागले.
या कुटुंबातील लोक वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये राहूनही यशस्वीपणे आपली वाटचाल करत आहेत.या कुटुंबातील लोक केवळ लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर सरंजामशाही म्हणून लोकशाहीमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत.पण दुसरीकडे हे देखील आहे की हे कुटुंब इंग्रजांच्या पाहुणचारात पुढे होते.त्याच्याकडे प्रचंड मोठ्या जेवणाच्या टेबलावर एक चांदीची ट्रेन होती.ही ट्रेन पाहुण्यांसाठी भोजन मदीरा आणि चटणी घेण्यासाठी
जयविलास पॅलेस मध्ये ठेवली होती. जी सतत चालू ठेवत असत आणि पाहुणे त्यातून हव्या ते पदार्थ घेत असत.
परदेशातही जिवाजीराजे शिंदे महाराजांची ख्याती होती आणि हे कुटुंब सर्व गोष्टींमधे अग्रेसर होते. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत ग्वाल्हेरच्या आधुनिकीकरणामध्ये जिवाजीराजे शिंदे यांनी अधिक काम केले.
ग्वाल्हेर( Gwalior ) राज्यातील महाराजा जिवाजीराव सिंधिया यांनी अवघ्या एका दिवसात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. महाराज जीवाजीराव सिंधिया यांनी मुंबईतील हॉटेल ताज येथे सागरच्या नेपाळ हाऊसमध्ये वाढलेली राजपूत मुलगी लेख्या दिव्येश्वरी यांची भेट घेतली. काही दिवसानंतर दोघांचे लग्न झाले.त्यांनी आपल्या पत्नीचे नाव विजया राजे असे ठेवले .विजयराजे ग्वाल्हेर राज्याच्या राणी बनल्या.या महाराणीने त्यांच्या वागण्याने आणि समर्पणाने सिंधिया कुटुंबाचा आणि मराठा सरदारांचा विश्वास जिंकला.
जिवाजीराव यांना जनतेचे शिक्षण, आरोग्य यांच्या बद्दल चांगलीच कळकळ आणि माहिती होती.
ग्वाल्हेर राज्यातील जिवाजीराव सिंधिया आपल्या लोकांबद्दल अत्यंत संवेदनशील होते. त्या काळात जेव्हा महिला शिक्षणाचा प्रसार फारच कमी होता, तेव्हा जीवाजीराव सिंधिया यांना ग्वाल्हेरमध्ये महिलांसाठी शाळा, महिला महाविद्यालय काढले.  स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेर विद्यापीठाच्या स्थापनेसाठी जीवाजीराव यांनी एक लाख रुपये दिले. ग्वाल्हेरमधील गजरा राजा मेडिकल कॉलेजसाठी जीवाजीराव सिंधिया यांनी जमीन व पैसे उपलब्ध करुन दिले होते.  एमआयटीएस हे राज्यातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय हे ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज जीवाजीराव सिंधिया यांची भेट आहे.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राजप्रमुखचा दर्जा दिला होता
सिंधिया राजघराण्याची लोकप्रियता लक्षात घेता, भारत सरकारने इंग्लंडच्या राजघराण्यानुसार जीवाजीराव सिंधिया यांना राजप्रमुख हा दर्जा दिला. त्यावेळी महाराज जीवाजीराव सिंधिया हे राजप्रमुख होते. म्हणूनच त्यांनी त्यावेळी मध्य भारताच्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली होती. मध्य भारताची पहिली विधानसभा( Gwalior ) ग्वाल्हेरच्या मोती महालमध्ये बसली होती.
राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी शासकीय आणि मौल्यवान इमारतींसाठी जिवाजीराव शिंदे यांनी ५४ कोटी रूपये दिले होते.
तसेच सरकारी कार्यालयासाठी असलेल्या बहुमूल्य इमारती राज्य सरकारकडे सुपूर्द केल्या. जीवाजीराव सिंधिया यांनी महाराजा बडा, व्हिक्टोरिया महाल, व्हिक्टोरिया महाविद्यालय, कमला राजा आणि पद्मा स्कूल येथील टाऊन हॉलसाठी इमारत दिली. कमलराजा महिला रुग्णालय, विभागीय कार्यालयासाठी मोती महल, महामंडळासाठी जलविहार महल हे राज्य सरकारला जीवाजी राव यांनी दिले होते.  ग्वाल्हेरच्या लोकांना विश्वास आहे की जीवाजीराव सिंधिया यांनी आपल्या लोकांसाठी जे केले ते शतकानुशतके लक्षात ठेवले जाईल.
माधवराव आणि ज्योतिरादित्य यांनी हीच परंपरा पुढे वाढविली व पुढे तशीच चालू ठेवली.
जिवाजीराव सिंधिया यांच्या निधनानंतर माधवराव सिंधिया त्यांचे उत्तराधिकारी झाले. तथापि, वय कमी असल्याने, विजयराजे सिंधिया यांनी त्या काळात सिंधिया घराण्याच्या परंपरा पुढे आणल्या. नंतर माधवरावांनी सर्व कारभार ताब्यात घेतला. आता जिवाजीराव सिंधिया यांचे नातू ज्योतिरादित्य सिंधिया राजवंशाची जबाबदारी आणि परंपरा पुढे घेऊन जात आहेत.
अशा या थोर जिवाजीराजे शिंदे यांचे १६ जुलै १९६१ मधे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले.

अलीजाह बहादूर जिवाजीराजे शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा

 
लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!