Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

happy mansoon – चातक आणि मान्सून

1 Mins read

happy mansoon – चातक आणि मान्सून

happy mansoon – चातक आणि मान्सून – सुनिल तांबे

 

 

 


iPage site builder banner

चातक पक्षाच्या दोन जाती आहेत. एक जात केवळ दक्षिण भारतात म्हणजे केरळ-तमिळनाडूच्या

परिसरात वस्तीला असते.
दुसर्‍या जातीचा चातक पूर्व आफ्रिकेत असतो. मे-जून च्या सुमारास तो अरबस्थानातून पाकिस्तान,

भारत, बांग्ला देश इथे स्थलांतर करतो.
हे पक्षी अरबी समुद्र पार करतात परंतु किनार्‍याने.
हे पक्षी थव्याने स्थलांतर करत नाहीत. एकटे-दुकटे येतात. आणि पाकिस्तान, उत्तर व मध्य भारत आणि बांग्ला देशात हजेरी लावतात.
कोणत्या प्रदेशात चातक कोणत्या दिवशी दिसला आणि happy mansoon मॉन्सून तिथे कोणत्या दिवशी पोचला याच्या नोंदी आहेत.

iPage site builder banner

पक्षी निरीक्षकांनी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नकाशाचा वापर करून त्या केल्या आहेत.
चातकाच्या स्थलांतरावर तपशीलवार संशोधनही सुरू आहे. त्यापैकी एक निबंध अलीकडेच वाचनात आला.
मॉन्सूनच्या happy mansoon वार्‍यांवर स्वार होऊन चातक भारतीय उपखंडात येतो. तो ज्या प्रदेशात पोचतो तिथे दोन ते चार दिवसांत मॉन्सून हजेरी लावतो, असं आढळलं आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग वा अन्य कोणतीही संशोधन संस्था happy mansoon मॉन्सूनच्या आगमनाचा जिल्हा वा तालुकानिहाय अचूक अंदाज देऊ शकत नाही. मात्र चातक पक्षी मॉन्सूनच्या आगमनाचा अचूक वेध घेतो.

मॉन्सून  happy mansoon हा चातक पक्षाचा प्रजननाचा काळ आहे. चातक आपली अंडी बारभाईंच्या घरट्यात घालतो. बारभाई त्याच्या पिलांना खाऊ-पिऊ घालतात, त्यांचं लालनपालन करतात. सप्टेंबर महिन्यात चातक भारतीय उपखंडातून पोबारा करतो. बहुधा परतीच्या मॉन्सूनवर स्वार होऊन. मोठी झालेली पिल्लंही आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे पूर्व आफ्रिकेत परतात. पुढच्या वर्षी मे-जून च्या सुमारास भारतीय उपखंडात येतात.

iPage site builder banner

बारभाई नसतील तर चातकांना अन्य कोणातरी पक्षाचा निवारा शोधायला लागेल.

Also Read : https://www.postboxindia.com/west-bengal-political-riots-before-after-sunil-tambe/

चातक पक्षी केवळ स्वाती नक्षत्रामुळे पडणार्‍या पावसाचे थेंब पिऊन आपली तहान भागवतो अशी समजूत आहे.

गंगा यमुना सरस्वती सात समंदर भरपूर
तुलसी चातक के मते बिन स्वाति सब धूर


iPage site builder banner

(गंगा, यमुना, सरस्वती आणि सात समुद्र यांच्यामध्ये भरपूर पाणी आहे परंतु चातकासाठी केवळ स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब वगळता बाकी सर्व पाणी म्हणजे धूळ आहे– संत तुलसीदास)

त्यामुळे चातकाला भक्तीमार्गात स्थान मिळालं. चातक तहानेने व्याकूळ होतो तेव्हा त्याच्या कूजनाने मेघांना पान्हा फुटतो. मेघ मल्हार या रागाचं मूळही चातकाशी जोडण्यात आलंय. पन्नालाल घोष यांनी बासुरीवर वाजवलेला मियां का मल्हार ऐकलात तर हे सूर आकाशालाच काय पण पर्वतालाही हलवू शकतील असं वाटेल.


iPage site builder banner

Leave a Reply

error: Content is protected !!