hiroji indulkar
hiroji indulkar
hiroji indulkar

hiroji indulkar – रायगड किल्ल्यावरील हा चमत्कार

hiroji indulkar - शिवाजी महाराजाच्या रायगड किल्ल्यावरील हा चमत्कार तुम्ही पाहिला ऐकला आहे काय ?

hiroji indulkar – रायगड किल्ल्यावरील हा चमत्कार

 

 

hiroji indulkar – शिवाजी महाराजाच्या रायगड किल्ल्यावरील हा चमत्कार तुम्ही पाहिला ऐकला आहे काय ?

 

 

कोणी कोणी हा चमत्कार पाहिला ऐकला आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला तो राजदरबार आणि नगारखाना उभारताना अप्रतिम स्थापत्यशैली आणि वास्तुशास्त्राचा

अभ्यास करून हीरोजिंनि एक आश्चर्यकारक गोष्टी निर्माण केली होती. रायगड किल्ल्यावरील राजदरबाराच्या नगारखान्या जवळून अतिशय लहान आवाजात

बोल्लेल, अगदी पुटपुटलेल देखील महाराजांच्या सिंहासना पर्यंत ऐकायला जायच.

३५० वर्षापूर्वी निर्माण केलेली ही गोष्ट खरच एक नवल आहे. 

 

 

रायगड किल्ला बांधणी करणारे हिरोजी ईंदुलकर – hiroji indulkar

हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य हिरोजी इंदुलकरांकडे होते .

हिरोजी इंदुलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले .रायगडाचे बांधकाम हा त्यांच्या कौशल्याचा पुरावा आहे .आता जो रायगड पाहायला मिळतो तो फक्त शिवकाळातच असू शकतो. आणि त्या शिलालेखा प्रमाणे आजही रायगड पाहायला मिळतो.

अगदी सुरूवातीच्या काळापासून हिरोजी ईंदुलकर किल्ले बांधकामात तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. hiroji indulkar  हिरोजी ईंदुलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले.

शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील प्रासाद, उद्याने, राजपथ ,स्तंभ ,गजशाला ,नरेंद्रसदन बारा महाल अशा अनेक इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकाम करण्याचे काम त्यांच्या हाती दिले होते .आणि त्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली होती. गड,किल्ले बांधण्याचे काम हिरोजी आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेत होते.हिरोजीने बांधकाम करत असताना किल्ला निम्म्यावर बांधत आणला आणि पैसे संपले .हिरोजीना समजेना काय करावे ,महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे ,किल्ला तर पूर्ण केला पाहिजे तर पैसा शिल्लक नाही. हिरोजीने अपूर्ण काम पूर्ण केले .आपला राहता वाडा ,आपली जमीन विकून बायका-मुलांसह रायगडावर राहायला आले .पैसा नसल्यामुळे ते झोपडी करून राहू लागले .आणि मराठ्यांची राजधानी त्यांनी पूर्ण बांधून काढली.त्यात वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या.

. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवराय म्हणाले “हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला तुम्हाला काय हव आहे”…त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान

झुकवून म्हणाले” महाराज उभं स्वराज्य तुम्ही पदरात टाकलं, आम्हाला आणखी काय हवंय.”

महाराज म्हणाले “नाही काही तरी मागितलेच पाहिजे” कारण गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजीराजे

बेहद्द खुश झाले होते. त्यावेळी हिरोजी म्हणाले “महाराज एक विनंती आहे. रायगडावर आम्ही जगदीश्वराचे मंदिर उभारले आहे .त्या जगदीश्वराचा एका पायरीवर आमचे नाव कोरण्याची अनुमती आम्हाला द्या “

महाराजांना कळेना हे कसले मागणे.. पगार वाढ नाही मागितली ,देशमुखी नाही मागितली , पाटीलकी नाही मागितली ,वतन नाही मागितले ..मागून मागून काय मागितले तर दगडावर नाव कोरायची परवानगी? महाराजांनी विचारले हिरोजी असे का ????*

आणि – हिरोजी hiroji indulkar उत्तर देतात,

” राजे.. ज्या ज्या वेळी रायगडावर असाल, त्या त्या वेळी जगदीश्वराच्या दर्शनाला तुम्ही याल, दर्शनाला जाल त्या – त्या वेळी तुमची पाउले त्या पायरीवर पडत जातील.. आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरीवर माझे नाव कोरलं असेल ..तर त्या त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील ..” असे होते स्वराज्याचे शिलेदार आणि मावळे म्हणूनच स्वराज्य घडले .

महाराजांनी हिरोजीला सांगितले की या गडावर कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही तुमचे नाव लिहावे ,आणि तुमच्या स्मृती जतन कराव्यात. म्हणूनच हिरोजी ईंदुरकरांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले कि हिरोजी ईंदुलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल. सर्वश्रेष्ठ अभियंत्याने स्वतःचे घरदार घाण ठेवून रायगड बांधला .मोबदला काय तर एका पायरीवर स्वतःचे नाव लिहिण्याची अनुमती मागितली , का तर राजांची चरणधूळ त्या नावावर अभिषेक करत राहील म्हणून.

मराठ्यांनी इतिहास घडिवला. शिवरायांनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बळावर  विश्वास दिला राजानी- “आपले राज्य उभा करण्याचा, राजांना छत्रपती व्हायचं म्हणून नाही ..तर तमाम मराठ्यांचे राज्य निर्माण करायचे , रयतेच राज्य, गरीबांच राज्य तयार करायच आहे “…ही काळजी इथल्या माणसा – माणसांमध्ये होती.

त्या पायरीचा फोटोही इथे देत आहोत.

या आपल्या शिलालेखात त्यांनी “सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलक ” असे म्हणून आपण महाराजांचे निस्सीम भक्त आणि सेवक आहोत हेच दाखवून दिले.

आजच्या तरूण अभियंत्यांनी रायगडावर अथवा ईतर गडावर जाऊन हिरोजी ईंदुलकरांची कार्यप्रणाली अनुभवावी.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
job or business
job or business – नोकरी का व्यवसाय ? असा निवडा मार्ग
error: Content is protected !!
%d bloggers like this: