Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

honesty is the best policy – न्हावा – शेवा पोलीस स्टेशन

1 Mins read

honesty is the best policy – न्हावा – शेवा पोलीस स्टेशन

 

honesty is the best policy – प्रामाणिक तपास आणि न्याय

 

 

12/5/2021,

 

सध्या कोरोना आणि लॉकडाऊन संबंधित प्रतिबंध यामुळे आधीच नागरिक हतबल आहेत, त्यात कोरोना फ्रंटलाईन कर्मचारी आणि

प्रशासन व्यवस्थेवर एक वर्षांपासून ताण आहे, या सर्व मानसिक ताण तणाव आणि रोजगाराचे प्रश्न यामुळे सामान्य गरीब माणसाचे प्रचंड हाल होत आहेत.

भारतातच न्हवे तर संपूर्ण जगात नकारात्मक वातावरण वाढत आहे, अशा वेळी सामान्य माणसाला आणि त्याच्यावर आलेल्या संकटाला

 

वेळीच ओळखून त्याला मदत करण्याची honesty is the best policy भावना आज ब्रेक द चेन मध्ये प्रत्येकाला जाणवतेच असे नाही.

पोलीस प्रशासनावर तर अनेकदा आरोप झालेत कधी चिरी मिरी तर कधी लाच, काहीत तथ्य असते काहीत फक्त खोटे आरोप,

काही समाज द्रोही / समाज कंटक आपल्या स्वार्थासाठी पोलिसांमधील प्रतिमा जाणीवपूर्वक बिघडविण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात,

त्यामुळे सामान्य माणसाला पोलीस स्टेशन बाबतीत नकारात्मक भावना मोठ्या प्रमाणावर असते. इथे न्याय मिळेल याची शाश्वती वाटत नाही.

त्यामुळे सामान्य माणूस सहसा इथे न्याय किंवा तक्रार करायला घाबरतोच.

या बाबतीत एक अनुभव असाही , सुरुवातीच्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये प्रवासादरम्यान माझे पाकिट हरवले, बिहार मधील एका कंत्राट कामगाराला

ते सापडल्याने त्याने माझा नंबर शोधून काढून मला कामोठे पोलीस स्टेशनला भेटायला बोलावले पण त्या गरीब व्यक्तीने ते पाकीट पोलीस स्टेशनला जमा केले न्हवते.

 

मी स्टेशन बाहेर त्याला भेटून ते त्याच्याकडून घेतले, मी त्याला त्याच्या honesty is the best policy प्रामाणिक पणाचे बक्षीस सुद्धा दिले.

आणि शेवटी विचारले ” आप ने पाकीट पुलिस स्टेशन मी जमा क्यो नही किया, यावर तो गरीब भाबडा फक्त हसला. तिथून जाताना मी ही

गोष्ट तेथे असणाऱ्या पोलिसांना सांगितली, यावर त्यांनी मला त्याला बक्षीस देण्याचा सल्ला दिला आणि दुर्लक्षित करत लगेच निघून गेले मला

थोडे भलतेच अपेक्षित होते, कारण बक्षिस तर मी आधीच त्याला दिले होते. मला असे वाटत होते हे माझे वयक्तिक मत आहे, त्या पोलिसांनी

त्याला त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मला अपेक्षित होती, कदाचित ती थाप जर त्याला मिळाली असती तर भविष्यात पुन्हा कोणाचे पाकीट

सापडल्यास तो बिनदिक्कत पोलीस स्टेशन मध्ये जमा करू शकतो, तोच काय कोणीही.

 

आता दुसरी बाजू अशी की नुकताच काल दिनांक 11/05/2021 रोजी न्हावा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ ढाकने दिवसपाळी

कर्तव्यावर असताना न्हावा- शेवा पोलीस स्टेशन हद्दीत रोडच्या बाजूला मो. मेराज अन्सारी, रा. राज्य – झारखंड नावाच्या व्यक्तीचे पॉकेट (Wallet) सापडले होते.

त्यामध्ये 12800/- रुपये रोख रक्कम व आधार कार्ड आणि डेबिट कार्ड होते यावरून त्यांना समजले सदरचे पॉकिट हे कंटेनर चालकाचे असावे,

याबाबत त्यांनी तेथील हॉटेल च्या आजूबाजूला पॉकेट कुणाचे आहे का ? याबद्दल चौकशी केली परंतु संबंधित व्यक्ती सापडली नाही.

त्यानंतर त्याच रोडच्या बाजूला असलेल्या हॉटेल मालक यांना त्यांनी संपर्क करून संबंधित व्यक्ती आल्यास पोलीस ठाण्यात त्यांच्याशी

संपर्क साधण्यास कळविले होते. तसेच पोलीस ठाणे अंमलदार यांना देखील माहिती दिली होती.

 

आज १२/५/२०२१ रोजी सकाळी संबंधित व्यक्ती न्हावा- शेवा पोलीस स्टेशनला आली व ती कंटेनर चालक असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरचे पॉकेट त्यांचे असल्याची खात्री केली आणि पोलिस ठाण्यातील सहकारी समक्ष मोहम्मद अन्सारी यांच्या ताब्यात देऊन त्याला परत करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी honesty is the best policy आपल्याला पोलिसांबद्दल आदर असल्याचे व्यक्त केले आणि हसतमुख होऊन ती निघून गेली.

एपीआय अभिजित शरद मोरे, एसीपी सावंत, सिनियर पीआय भाटे यांनी कॉन्स्टेबल नवनाथ ढाकणे यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले.

कोविड च्या काळात एखाद्या गरिब नागरिकासाठी हा प्रामाणिक पणा किती विश्वासपूर्ण आणि मोलाचा होता याची प्रचिती येते.

पाकिटातील रक्कम किती आहे ?  किंवा किती मोठी केस आहे ? यापेक्षा सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला न्याय कसा देता येईल

आणि विश्वास कसा निर्माण करता येईल हे महत्वाचे.

पोलिसांनी सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करावे याचे प्रामाणिक उदाहरण न्हावा शेवा पोलिसांनी निर्माण केले.

दोन्ही घटनेतील दुवा विश्वासाचा आहे. न्हावा शेवा पोलीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन.

 

 

Postbox India

 

Leave a Reply

error: Content is protected !!