how to face interview
how to face interview
how to face interview

how to face interview – इंटरव्ह्यू ला जाण्याआधी हे करा प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस

how to face interview - इंटरव्ह्यू ला जाण्याआधी हे करा प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस

how to face interview – इंटरव्ह्यू ला

जाण्याआधी हे करा प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस

 

 

how to face interview – इंटरव्ह्यू ला जाण्याआधी प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस

 

 

 

 

मुलाखतीचा दिवस !
ज्या दिवसासाठी आपण मनापासून तयारी केली ,तो महत्वाचा दिवस म्हणजे प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस !

ह्या मुलाखतीच्या दिवसाला सकारात्मक पणे कसं सामोरं जायच ते ह्या लेखात बघूया.

मुलाखतीच्या आदल्या दिवशी शांत झोपा. how to face interview मुलाखतीच्या दिवशी नीट खाऊन

घरून निघा.आपल्यातला उत्साह आणि चैतन्य दिवसभरासाठी टिकवून ठेवायचा आहे ,हे विसरू नका.

मुलाखतीसाठी फ़ॉर्मल कपडे (पोशाख )निवडा.गडद ,चमकदार असे कपडे टाळावेत .नीट इस्त्री केलेले

कपडे आणि त्यानुसार शूज/सँडल्स असावेत. आपले मोजे स्वच्छ आहेत ह्याची पण खात्री करून घ्या.

आपणं आता कॉर्पोरेट जगात प्रवेश करणार आहोत हे लक्षात ठेवा.आपले सर्व कागदपत्रे ,प्रमाणपत्रे,

ओळखपत्रे आणि बायो-डेटा फाईल /फोल्डर मध्ये नीट क्रमाने लावून घ्या. आपले पासपोर्ट आकाराचे ३-४ फोटो

सुद्धा सोबत ठेवा . महत्वाच्या गोष्टींच्या झेरॉक्स ठेवायला विसरू नका .

रहदारी आणि इतर गोष्टींचा विचार करून मुलाखतीच्या दिवशी कसं जायचं हे निश्चित करा. मुलाखतीच्या

वेळेच्या १५-२० मिनटे आधी तिथे पोहचा. हवं असेल तर जरा फ्रेश व्हा .रिसेप्शन डेस्कला आपण आल्याची

माहिती द्या . त्यांच्याकडे मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची यादी असते. त्यात आपले नाव आहे कि नाही

हे तपासून घ्या. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा ताण न घेता शांतपणे प्रतीक्षा क्षेत्रातं बसा. हल्ली बऱ्याच ऑफिस

मध्ये सीसीटीव्ही असल्यामुळे तुम्ही जेव्हा आपला नंबर येई पर्यंत बाहेर प्रतीक्षा करता,तेव्हा तुमच्या नकळतपणे

मुलखात घेणारे तुमचे /तुमच्या देहबोलीचे निरीक्षण करत असतील. तुम्हाला पारखण्याची ती पण एक युक्ती असेल.

तेव्हा फोन वर गप्पा मारणे ,गेम्स खेळणे असं न करता स्वतःला रिलॅक्स कसं करता येईल ते बघा . आपला सेल फोन बंद ठेवा.

 

Also Visit : https://www.postboxlive.com


आपल्याला मुलाखतीसाठी बोलावल्यावर आपले कपडे व्यवस्थित करून महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावर एक स्मित घेऊनच केबिनमध्ये प्रवेश करा. केबिनमध्ये उपस्थित असणाऱ्यांना अभिवादन करून ,आपल्याला बसण्यास सांगितल्यावर धन्यवाद म्हणून खुर्चीत बसा . आपल्या बसण्यात ताठपणा असुदे , घरी खुर्चीत आरामात बसलोय असं पण आपल्याला बसायचं नाही आहे.
इथे लक्षात घ्या कि आपल्याला चेहर्यावर कोणताच ताण (जरी प्रत्यक्षात मनात प्रचंड टेन्शन असलं तरी) दाखवायचा नाही तर हलकसं हसू राहू द्यायचं आहे. मुख्य म्हणजे आपण रिलॅक्स आहोत हे आपल्या देहबोलीतून कळलं पाहिजे. त्यासाठी आपल्या हाताशी,बोटांशी खेळणं ,पाय हलवणं हे सगळं टाळावं . ज्या कंपनीत आपण मुलाखतीसाठी जातोय त्या कंपनीची आधीच व्यवस्थित माहिती करून घ्या .आपल्या कामाच्या स्वरूपाची कल्पना असेल तर उत्तम .आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर शांतपणे ,न घाबरता ,ताण न घेता स्पष्ट शब्दात उत्तर द्या. आपला आत्मविश्वास बोलताना दिसला पाहिजे. आय-कॉन्टॅक्ट करून मुद्द्याला धरून उत्तर द्या. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यास तसं स्पष्ट सांगा . प्रश्न नीट ऐका.प्रश्न विचारात असताना मध्येचं त्यांना काहीतरी विचारून व्यत्यय आणू नका. कारण नसताना जास्त बोलू नका .त्यामुळे आपल्याबद्दल चुकीचा संदेश जाऊ शकतो .जर एखादा प्रश्न आपल्याला कळला नसेल तर तसं सांगा . कृपया , प्रश्न परत सांगता का असं न घाबरता पण नम्रपणे सांगा.
how to face interview – मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला सुद्धा संधी मिळते कंपनीबद्दल प्रश्न विचारायची .तेव्हा अगदी थोडक्यात प्रश्न विचारा.पगाराबद्दल पाहिल्याचं भेटीत चर्चा करू नका. कामाच्या वेळा ,सुट्ट्या हे सर्व लगेच विचारलं तर त्यांना असं वाटू शकतं कि कामा पेक्षा हे जरुरी आहे का ? प्रश्न विचारायचे नाही असं सांगू नका , कारण तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला कंपनी मध्ये आणि कामासाठी स्वारस्य आहे हे त्यांना कळतं.
मुलाखत झाल्यानंतर धन्यवाद म्हणायला विसरू नका. संपूर्ण मुलाखतीत आपण सकारात्मक राहणं जरुरी आहे. मुलाखतीच्या वेळेस दाखवलेला आपला आत्मविश्वास,व्यावसायिकपणा (Professionalism) ,नम्रता आणि सच्चेपणा हे गूण नोकरी मिळवण्यासाठी नक्कीच मदत करतील. तर,मित्रानो ,वाट कसली बघताय ? लागा तयारीला . शुभेच्छा !!

 

 

 

 

मेघना धर्मेश
Success Mantra | [email protected]

 

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
acharya atre
acharya atre – आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
error: Content is protected !!
%d bloggers like this: