vaccination
vaccination
vaccination

national vaccination day – लसीकरण अनिवार्य

national vaccination day - लसीकरण अनिवार्य आहे - आनंद शितोळे

national vaccination day – लसीकरण अनिवार्य

 

national vaccination day – लसीकरण अनिवार्य आहे – आनंद शितोळे

 

लसीकरण अनिवार्य आहे, त्यावर टीका भरपूर झालीय.


लसीकरण national vaccination day केंद्रावर सध्या होणारी गर्दी आणि गोंधळ, लोकांची घाई

यामुळे हि लसीकरण केंद्रे कोरोना हॉटस्पॉट होऊन तिथली लोक सुपरस्प्रेडर होण्याचा धोका आहे.

१. केंद्राची आणि राज्याची कुठल्याही वयोगटाची वेबसाईटवर नोंदणी असल्याशिवाय लसीकरण करू नये.

२. ज्याअर्थी पिनकोड टाकल्यावर लसीकरण कुठे उपलब्ध आहे याची माहिती येते त्याअर्थी राज्यांना

कुठल्या केंद्राला किती डोस दिलेत याची माहिती त्या कोविन साईटवर करण्याची सोय असावी

असा अंदाज आहे, सरकारी अधिकारी योग्य माहिती देतील.


३.सध्या लोकांना लस उपलब्ध असेल तरच नोंदणी करून वेळ मिळते. त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

अनेकदा दोन दोन तास लॉगीन करून लस कुठे उपलब्ध आहे ते शोधत बसावे लागते, त्यापेक्षा लॉगीन

करून लस घेण्याला इच्छुक असलेल्या व्यक्तींची नोंदणी करावी , त्याला पर्याय निवडायला सांगावेत

आणि त्याच्या पर्यायानुसार लस उपलब्ध झाल्यावर त्याला मेसेज जाईल अशी व्यवस्था करावी,

म्हणजे किती लसीची आवश्यकता आहे हेही समजेल.


४. प्रत्येक केंद्राची रोजची क्षमता गृहीत धरून तिथे किती डोस दिवसभरात देता येतील त्यानुसार

तिथे लस उपलब्ध नसेल तरी रोजचे बुकिंग नोंदवून घ्यावे.

५. यामुळे कुठल्या केंद्रावर किती लोकांनी नोंदणी केलीय याचा तपशील सरकारला उपलब्ध होईल

आणि त्यानुसार कुठल्या केंद्रावर रोज किती डोस पाठवणे आवश्यक आहे याचे पूर्वनियोजन शक्य होईल.

६. या आगाऊ नोंदणीमुळे राज्याला नजीकच्या काळात किती डोस आवश्यक आहेत याचीही माहिती

उपलब्ध होईल आणि त्यानुसार राज्यांना केंद्राकडे किंवा उत्पादकाला मागणी नोंदवून त्या

टप्प्यावर लसींचा पुरवठा शक्य होईल.


७. नोंदणीसाठी मोबाईल आणि आधार क्रमांक आवश्यक आहे. मात्र ज्यांच्याकडे आधार

नाहीये त्यांना नोंदणी कशी करायची हा प्रश्न आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे यंत्रणा उभी करता येईल.

अ ) स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत सदस्य किंवा वार्डात असलेल्या नगरसेवक/ लोकप्रतिनिधी

यांना जबाबदारी देऊन मतदान करताना जसे क्रमांक शोधायला बूथ केले जातात त्या पद्धतीने

साधारण दोन हजार लोकसंख्येला एक बूथ याप्रमाणे नोंदणी साठी राज्याची वेगळी वेबसाईट

उघडून त्यावर मतदार यादीतील क्रमांक टाकून नोंदणी करावी.


ब ) लोकांकडे आधार नसेल , मतदान यादीत नाव नसेल पण मोबाईल नंबर नक्कीच असेल.

नोंदणी केल्यावर त्याला तिथेच टोकन क्रमांक कागदावर मिळावा.

क ) या टोकन क्रमांकानुसार जवळच्या केंद्रावर लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे

त्याप्रमाणे लस आल्यावर टोकन क्रमांक नुसार national vaccination day लसीकरण करावे.

ड ) वेबसाईटवर नोंदणी केलेले आणि टोकन घेऊन आलेले असे दोन्ही प्रकारचे लोक सकाळी

आणि दुपारी ठराविक टक्केवारी नुसार बोलावले आणि त्यांना त्यानुसार वेळ दिली /

एसएमएस पाठवला किंवा त्यांनी त्या मदतकेंद्रावर चौकशी केली तरी वेळ समजू शकेल.

ई ) यामुळे लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी, झुंबड होणार नाही आणि संसर्गाचा धोका टळेल,

शिवाय लसीकरण कर्मचारी शांतपणे काम करू शकतील.


या मदतकेंद्रासाठी राज्य सरकारने नियोजन केल्यास स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या

पक्षाचे कार्यकर्ते संगणक प्रिंटर घेऊन बसवले तर हि नोंदणी प्रक्रिया शक्य होईल.

या ऑफलाईन नोंदणी ( कोविन साईट ऐवजी राज्य सरकारच्या साईटवर , आधार नसलेल्या लोकांसाठी )

केल्यावर नजीकच्या काळात त्या त्या प्रभागात, गावात, लसीकरण केंद्रावर किती आणि

कधी लसींचा पुरवठा लागणार आहे हे नियोजन शक्य होईल आणि त्यानुसार राज्याला

लसीचा पुरवठा नियोजन सोपे होईल.


८. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर सक्रीय होऊन या मोहिमेत सरकारला

संसाधने, मनुष्यबळ यांची मदत केल्यास जास्तीत जास्त लोकांची नोंदणी होऊन त्यानुसार त्यांना

वेळ देऊन national vaccination day लसीकरण शक्य होईल.

९. मोठ्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, औद्योगिक वसाहती यांच्या संघटना, व्यवस्थापन यांना

लसीकरणाची आवश्यक यंत्रणा उभारणे शक्य असेल तर त्या त्या ठिकाणी तिथल्या कर्मचार्यांचे

लसीकरण केल्यास इतर लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी कमी होईल.

१०. लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाने गर्दी कमी होऊन संसर्गाचा धोका कमी होईल हे साध सूत्र आहे.

११. हे national vaccination day लसीकरण आहे, लग्नाचे बुफे जेवण नाही जिथे पुन्हा मिळेल

कि नाही म्हणून लोक १० गुलाबजाम आणि १२ रोट्याचा डोंगर ताटात घेऊन येतात. माणसाला

एकदा लस घेतल्यावर पुन्हा ठरलेल्या वेळेलाच डोस मिळणार आहे, त्यामुळे कुणी वशिला

लावून दोनदा घेईल हि भीतीही नाहीये.


१२. प्रत्यक्ष लसीकरण झाल्यावर अनेकदा लसीकरण केंद्रावर नंतरची नोंदणी होतच नाहीये

किंवा योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळे नावात बदल, लिंगबदल असे प्रकार घडतात. लसीकरण

केल्याची नोंदणी न झाल्यास दुसरा डोस घेण्यासाठी पहिला डोस घेतल्याचा कोणताच पुरावा

नागरिकाकडे नसेल तर त्याला दुसरा डोस कसा मिळेल ? हा प्रकार ऑनलाइन नोंदणी

करून लस घेतलेल्या लोकांसोबत घडलेला आहे.


आनंद शितोळे

Advertisement

More Stories
Tennis Courts - Martina Navratilova and Chris Evart
Tennis courts- एक अनोखी दास्तान – समीर गायकवाड
error: Content is protected !!
%d bloggers like this: