पेटीम चा शेअर दोन दिवसात ४० % घसरला !

दोष पेटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा वगैरे ना देणे बंद करा. 

 
पेटीम चा शेअर दोन दिवसात ४० % घसरला

मर्चंट बँकर्स आणि आयपीओ काढणारी पेटीएम यांची आहे समजा मिली भगत आहे ; पण समाज, देश, अर्थव्यवस्था , राष्ट्र , सामान्य गुंतवणूकदार यांचे हितसंबंध सांभाळायला शासन , कंपनी लॉ , सेबी कोठे आहेत

26/11/2021,

पेटीम” चा शेअर दोन दिवसात ४० % घसरला !

अर्थव्यवस्था / बँकिंग इत्यादी क्षेत्रातील प्रश्न अण्णांनी दिलेल्या “व्यक्ती केंद्री” नव्हे “सिस्टीम केंद्री” परिप्रेक्ष्यातून बघायला शिकूया ;

दोष पेटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा वगैरे ना देणे बंद करा


ज्या पब्लिक इश्यूच्या कागदपत्रांमध्ये १ रुपयाचा शेअर २१५० रुपयांना का विकत घ्यावा यासाठी पानेच्या पाने खर्ची घातली गेली ; ते समर्थन , ती आकडेवारी , ते ग्राफ्स काय गुंतवणूकदारांना फसवायला ?

आणि हि कागदपत्रे बनवणारे मर्चंट बँकर्स कोण ?

अमेरिकेतील / आणि जगातील टॉपचे इन्व्हेस्टमेंट बँकर्स : मॉर्गन स्टॅनली , जे पी मॉर्गन , सिटी बँक , गोल्डमन सॅक्स आणि त्यांना साथ द्यायला भारतातील टॉपच्या खाजगी बँका :

मर्चंट बँकर्स म्हणणार आम्ही जोखीम / रिस्क फॅक्टर्स देखील दिले आहेत ; आणि प्रत्यकाने गुंतवणूक स्वतःच्या जोखमीवर करावी हे आम्ही कानीकपाळी ओरडत असतो


मर्चंट बँकर्स आणि आयपीओ काढणारी पेटीएम यांची आहे समजा मिली भगत आहे ; पण समाज, देश, अर्थव्यवस्था , राष्ट्र , सामान्य गुंतवणूकदार यांचे हितसंबंध सांभाळायला शासन , कंपनी लॉ , सेबी कोठे आहेत

ते चालू लोक म्हणणार सगळे कायद्याला धरून होत आहे ; पण कायदे कोण बनवते ? ते असेच का बनवते ? तसेच का नाही बनवले ? हा प्रश्न आपण विचारणार कि नाही ?


हा मर्चंट बँकर्स पुरता मर्यादित मुद्दा नाहीये :

क्रेडिट रेटिंग एजन्सीज अनेक खाजगी इश्युअर कंपनीला ट्रिपल ए रेटिंग देते आणि कंपनी काही महिन्यात कोसळते (उदा आयएलएफएस ) , रेटिंग एजन्सी म्हणतात आम्ही फक्त आमचे मत देतो, शिफारस करत नाही

तीच गोष्ट चार्टर्ड अकाउंटंट फर्म्सची ; मोठ्या कंपन्यांचे ताळेबंद सगळे आलबेल आहे म्हणून हे सह्या करणार आणि काही दिवसानी कम्पनी कर्ज फेडण्यास असमर्थता . किंवा एखादा फ्रॉड उघडकीस येणार

हे सगळे मर्चंट बँकर्स, क्रेडिट रेटर्स , चार्टर्ड अकाउंट कोट्यवधी रुपये फिया घेतात कॉर्पोरट कडून ; आणि काही गडबड झाली कि फिदीफिदी हसत आम्ही काय करणार म्हणून विचारणार

कॉर्पोरेट / शेअर मार्केट / सगळ्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे निम्न वर्गातून आलेले त्यांचे समर्थक ; ज्यांच्या चड्या आतून फाटलेल्या असतात ; कसला अभ्यास , ना बौद्धिक प्रामाणिकपणा ; धन्य आहे सगळे !

कॉर्पोरट / वित्त भांडवलशाहीचे प्रच्छन्न समर्थन करणारे गरीब / निम्न मध्यमवर्गीय तेच आहेत जे दुसऱ्या बाजूला धार्मिक / जातीय उन्मादाला बळी पडतात. संजीव चांदोरकर