crime video : मुंबईतील धक्कादायक घटना. 

crime video : मुंबईतील धक्कादायक घटना. crime video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं. मुंबई : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत हा प्रकार घडला. गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलीस बोनेटवर चढला. तर चालकाने देखील संबंधित वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच चालत फरफटत पुढे नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. काही स्थानिकांनी गाडी थांबवत बोनेटवरुन पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवलं. नेमकं काय घडलं? The post crime video : मुंबईतील धक्कादायक घटना. appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
crime video :  मुंबईतील धक्कादायक घटना. 

crime video : मुंबईतील धक्कादायक घटना. 

 

crime video : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं.

मुंबई : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरीच्या डी. एन.
नगर पोलिस स्टेशन च्या हद्दीत हा प्रकार घडला. गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलीस बोनेटवर चढला. तर चालकाने
देखील संबंधित वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच चालत फरफटत पुढे नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड
व्हायरल होतोय. काही स्थानिकांनी गाडी थांबवत बोनेटवरुन पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवलं.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. संबंधित मराठी वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी
पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या

रंगाची हुंडाई क्रेटा कार तिथे आली. संबंधित कार चालकाने ही वीरा देसाई रोडकडून जेपी रोडच्या दिशेला उजवे वळण घेतली. पण तिथे
त्या मार्गाला नो एन्ट्री होती. पण तरीही कार चालकाने त्या दिशेला गाडी वळवली. यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस गुरव
यांनी गाडी चालकाला अडवलं.
पोलिसाने अडविल्यानंतरही कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात
होता. त्यामुळे गुरव यांनी त्याला थांबविण्यासाठी कारच्या बोनेटवर उडी मारली. तरीही कारचालक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता.
गाडी चालवत गाडीच्या बोनेटवर पोलीस असतानाही त्याने गाडी पळवली.त्याने आझाद मैदान येथून त्यांना गणेश चौकापर्यंत फरफटत नेलं.
विशेष म्हणजे स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारचालक तिथे थांबला. यावेळी कारचालक पोलिसाला उतरवत पळून गेला.

crime video :

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर पोलीस त्या कारचालकाच्या शोधात होते. या दरम्यान संबंधित गाडी ही जुहू गल्ली येथे आढळली. पोलिसांनी कार आणि
कार चालकाला ताब्यात घेतलं. संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा प्रत्यक्षदर्शीनी
व्हिडीओ बनवला. हा crime video व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

 

 

 

अंजनी मिश्रा

Postbox India

Also Visit : https://www.postboxlive.com

The post crime video : मुंबईतील धक्कादायक घटना.  appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything